Jump to content

"आपटा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ५: ओळ ५:

==उपयोग==
==उपयोग==
आपटा हे झाड बहुगुणी औषधी वनस्पती आआःए. याची पाने, शेंगांच्या बिया, फुले व झाडाची साल औषध म्हणून वापर केला जातो. सालीपासून दोरखंड बनवतात. झाडापासून डिंकही मिळवला जातो. या झाडापासून टॅनिन मिळते.. पानांचा उपयोग विडी बनविण्याकरिता केला जातो.
आपटा (बाउहिनिया रेसिमोसा) हे झाड बहुगुणी औषधी वनस्पती आहे. याची पाने, शेंगांच्या बिया, फुले व झाडाची साल औषध म्हणून वापर केला जातो. सालीपासून दोरखंड बनवतात. झाडापासून डिंकही मिळवला जातो. या झाडापासून टॅनिन मिळते.. पानांचा उपयोग विडी बनविण्याकरिता केला जातो.

आपट्याचे अश्‍मंतक हे नाव दोन अर्थांनी महत्त्वाचे आहे. अश्‍मंतक म्हणजे दगडाचा, खडकाचा नाश करणारा. त्याची मुळे जमिनीत खोलवर जातात. खडकाच्या फटीत शिरून वाढतात, कालांतराने फटी मोठ्या होऊन खडक दुभंगतात, अक्षरशः फुटतात. त्यामुळे खडकाळ, मुरमाड, उघड्या, बोडक्‍या टेकड्यांवर आणि माळांवर वनीकरणासाठी हे एक आदर्श झाड आहे. अश्‍मंतक याचा दुसरा अर्थ "मूतखडा (किडनी स्टोन) होऊ न देणारा किंवा तो जिरवणारा, मूत्रावाटे बाहेर काढण्यास मदत करणारा होय.' धन्वन्तरी निघण्टूमध्ये आणखी औषधी उपयोग असे दिले आहेत.

अश्‍मनंतकः कषायस्तु हिमः पित्तकफापहः।
मधुरः शीतसंग्राही दाहतृष्णाप्रमेहजित्‌ ।।

पित्त आणि कफदोषांवर गुणकारी; दाह, तृष्णा आणि प्रमेह यांवर विजय मिळवणारा.

==धार्मिक महत्व==
==धार्मिक महत्व==

२२:३३, १७ ऑक्टोबर २०१६ ची आवृत्ती

आपट्यास संस्कृत मध्ये अश्मंतक असे म्हणतात. आपटा पानझडी वनांत आढळणारी झाडे. प्रामुख्याने भारत, श्रीलंका व चीन या देशात आपट्याची झाडे आढळून येतात. ही झाडे जंगलात आढळतात.

रचना

आपट्याचे झाड सरळ न वाढता वेडेवाकडे वाढत असते. याला भरपूर फांद्या असतात. याची पाने जुळी असतात, ती काळसर हिरव्या रंगाची असतात. याच्या शेंगा या लंबगोल व चपट्या आकाराच्या असतात.

उपयोग

आपटा (बाउहिनिया रेसिमोसा) हे झाड बहुगुणी औषधी वनस्पती आहे. याची पाने, शेंगांच्या बिया, फुले व झाडाची साल औषध म्हणून वापर केला जातो. सालीपासून दोरखंड बनवतात. झाडापासून डिंकही मिळवला जातो. या झाडापासून टॅनिन मिळते.. पानांचा उपयोग विडी बनविण्याकरिता केला जातो.

आपट्याचे अश्‍मंतक हे नाव दोन अर्थांनी महत्त्वाचे आहे. अश्‍मंतक म्हणजे दगडाचा, खडकाचा नाश करणारा. त्याची मुळे जमिनीत खोलवर जातात. खडकाच्या फटीत शिरून वाढतात, कालांतराने फटी मोठ्या होऊन खडक दुभंगतात, अक्षरशः फुटतात. त्यामुळे खडकाळ, मुरमाड, उघड्या, बोडक्‍या टेकड्यांवर आणि माळांवर वनीकरणासाठी हे एक आदर्श झाड आहे. अश्‍मंतक याचा दुसरा अर्थ "मूतखडा (किडनी स्टोन) होऊ न देणारा किंवा तो जिरवणारा, मूत्रावाटे बाहेर काढण्यास मदत करणारा होय.' धन्वन्तरी निघण्टूमध्ये आणखी औषधी उपयोग असे दिले आहेत.

अश्‍मनंतकः कषायस्तु हिमः पित्तकफापहः। मधुरः शीतसंग्राही दाहतृष्णाप्रमेहजित्‌ ।।

पित्त आणि कफदोषांवर गुणकारी; दाह, तृष्णा आणि प्रमेह यांवर विजय मिळवणारा.

धार्मिक महत्व

आपट्याच्या झाडाची पाने सोने म्हणून दसरा या सणाला एकमेकांना वाटली जातात.

अश्मन्तक महावृक्ष महादोष निवारण |
इष्टानां दर्शनं देही कुरु शत्रुविनाशनम् ||

अर्थ: आपट्याचा वृक्ष हा महावृक्ष असून तो महादोषांचे निवारण करतो.इष्ट(देवतेचे) दर्शन घडवितो व शत्रुंचा विनाश करतो.[ संदर्भ हवा ]

बाह्य दुवे

आपट्या बद्दल अतिशय छान माहिती इथे उपलब्ध आहे