"मामासाहेब देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: मामासाहॆब देशपांडे तथा श्रीपाद दत्तात्रेय देशपांडे (जन्म : १९१४;... खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर ! |
(काही फरक नाही)
|
२२:२१, १५ ऑक्टोबर २०१६ ची आवृत्ती
मामासाहॆब देशपांडे तथा श्रीपाद दत्तात्रेय देशपांडे (जन्म : १९१४; मृत्यू : फाल्गुन कृष्ण नवमी, दि. २१ मार्च १९९०) हे एक दत्तसंप्रदायाचे अध्वर्यू, ज्ञानेश्वरीचे अपूर्व भाष्यकार, दूरदृष्टीचे महात्मा आणि एक मराठी लेखक होते.
मामांनी आपली संपूर्ण हयात जनता जनार्दनाची नारायणभावाने सेवा करण्यात खर्ची घातली. आपल्या ज्योतिष व वैद्यकी या दोन विद्यांचा विनामोबदला उपयोग करून लाखो जीवांना सौख्याचा मार्ग दाखविला. त्यांनी लोकांवर उपकार करण्यात कधीच आपला-परका असा भेद केला नाही.ज्ञानेश्वरीच्या अतिशय कठीण समजल्या जाणाऱ्या सहाव्या अध्यायातील अभ्यासयोगावर फारच थोड्यांनी आपले विचार मांडलेले आहेत. या विषयावरील मामांचेच विवरण जगभर प्रमाण मानण्यात येते. आचार्य अत्रे . मामासाहेब देशपांडे यांच्याकडे येऊन आवर्जून ज्ञानेश्वरीचे मार्गदर्शन घेत असत.
मामांनी आपल्या हयातीतच 'श्रीपाद सेवा मंडळ' या संस्थेची संरचना केली होती. परंतु रीतसर नोंदणी मात्र मामांच्या देहत्यागानंतर झाली. सौ. शकुंतलाताई आगटे व शिरीषदादा कवडे यांच्या समर्थ मार्गदर्शनानुसार सध्या जगाच्या पाचही खंडांमध्ये श्रीपाद सेवा मंडळाचे कार्य विस्तारलेले आहे.
१९८८-८९ साली मामा देशपा डे यांचे अमृतमहोत्सवी वर्ष भारतभर साजरे झाले. पुणे, सांगली, बेळगांव, भिलाई, नागपूर, कोल्हापूर, मुंबई, पंढरपूर, वर्धा, पणजी, डोंबिवली, कऱ्हाड इत्यादी ठिकाणी मामांचे सत्कार समारंभ झाले. विविध मान्यवर, संत-सत्पुरुष, पीठाधिपतींनी आवर्जून येऊन मामांच्या गौरवपर भाषणे केली. मामांवर ' पैल मेरूच्या शिखरी, कैवल्यलेणे, अमृतकण आणि कौस्तुभ ' असे चार गौरवग्रंथही प्रकाशित झाले. अमृतमहोत्सवी वर्ष विविध कार्यक्रम आणि सत्कारांनी गाजले होते..
गुरुचरित्र
मामासाहेब देशपांडे यांनी श्रीगुरुचरित्राची सर्वजनसुलभ व संपादित पारायणावृत्ती तयार केली आहे. या 'श्रीगुरुचरित्र नित्यपाठ' नावाच्या ग्रंथाच्या आजवर दहापेक्षा जास्त आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत. या गुरुचरित्रात मूळ चरित्रापेक्षा पेक्षा ओवीसंख्या कमी असून नियमही थोडे सोपे आहेत, हे याचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
ज्ञानेश्वर चरित्र
'श्रीज्ञानदेव विजय' हे चोवीसशे ओव्यांचे अद्भुत चरित्र मामांनी रचले आहे. आजवर ज्ञानेश्वरांचे असे पारायणासाठी चरित्र उपलब्धच नव्हते. या सुरेख व रसाळ चरित्रग्रंथाने ही उणीव भरून काढलेली आहे
श्रीवामनराज प्रकाशन
प्रवचनांमधून सांगितलेले ज्ञान हे तेवढ्यापुरतेच राहते. त्यातले सगळे काही लोकांच्या लक्षात राहत नाही. पण त्याच उपदेशाचे संकलन जर पुस्तकरूपाने प्रकाशित झाले तर मात्र त्याचा लाभ अनंत काळपर्यंत होत राहतो. याच संपन्न जाणिवेतून पू. मामांनी ‘ श्रीवामनराज प्रकाशन ’ नावाने एक संस्था स्थापन करून ज्ञानेश्वरांच्या व इतर संतांच्या वाङ्मयाचा सखोल अभ्यास पुस्तकांच्या माध्यमातून ना नफा तत्त्वावर सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिलेला आहे. आजमितीस सव्वा दोनशे पुस्तके प्रकाशित करून ना नफा तत्त्वावर, सवलतीच्या दरात त्यांची विक्री करणारी श्रीवामनराज प्रकाशन ही एकमात्र आध्यात्मिक प्रकाशन संस्था म्हणून विख्यात आहे. ज्ञानेश्वरांचे वाङ्मय जगातील सर्व भाषांमध्ये भाषांतरित करण्याचा मामा देशपांडे यांचा एक संकल्पही हळूहळू पूर्ण होत आहे. या ग्रंथांच्या माध्यमातून जगाच्या पाचही खंडांमध्ये मराठी संतांच्या वाङ्मयाचा सखोल अभ्यास होत आहे
9जन्म: