"आयाराम गयाराम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: आयाराम गयाराम म्हणजे भारतीय आमदार-खासदारांचे वारंवार पक्ष बदलण...
(काही फरक नाही)

२३:०४, ४ ऑक्टोबर २०१६ ची आवृत्ती

आयाराम गयाराम म्हणजे भारतीय आमदार-खासदारांचे वारंवार पक्ष बदलणे.

हा शब्दप्रयोग केव्हा अस्तित्वात आला?

हरियाणा विधानसभेच्या गयालाल नावाच्या एका सदस्याने इ.स. १९६७ साली पंधरा दिवसात तीन वेळा पक्ष बदलला. गयालाल पहिल्यांदा काँग्रेसमधून राष्ट्रीय आघाडी पक्षात गेले, परत काँग्रेसमध्ये आले आणि नऊ तासांत पुन्हा राष्ट्रीय आघाडीत परतले. ते जेव्हा पहिल्या वेळी राष्ट्रीय आघाडीतून काँग्रॆसमध्ये आले, तेव्हा ही माहिती वृत्तपत्रांना देताना काँग्रस नेते राव वीरेंद्रसिंग हे गयालाल यांना पत्रकारांसमोर घेऊन आले आणि त्यांनी जाहीर केले की, गयाराम आता आयाराम झाले आहेत. ह्या विधानाने त्या काळी अनेक विनोदांना आणि व्यंगचित्रांना जन्म दिला.

आयाराम गयाराम केव्हा थांबले?

निवडून आल्यानंतर सहा महिन्यात पक्ष बदलणाऱ्या सभासदाला अपात्र ठरवणाऱ्या, इ.स. १९८५मध्ये झालेल्या भारतीय राज्यघटनेच्या ५२व्या दुरुस्तीनंतर आयाराम गयाराम कमी झाले.