आयाराम गयाराम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आयाराम गयाराम म्हणजे भारतीय आमदार-खासदारांचे वारंवार पक्ष बदलणे.

हा शब्दप्रयोग केव्हा अस्तित्वात आला?[संपादन]

हरियाणा विधानसभेच्या गयालाल नावाच्या एका सदस्याने इ.स. १९६७ साली एक दिवसात तीन वेळा पक्ष बदलला. गयालाल पहिल्यांदा काँग्रेसमधून राष्ट्रीय आघाडी पक्षात गेले, परत काँग्रेसमध्ये आले आणि नऊ तासांत पुन्हा राष्ट्रीय आघाडीत परतले. ते जेव्हा पहिल्या वेळी राष्ट्रीय आघाडीतून काँग्रेसमध्ये आले, तेव्हा ही माहिती वृत्तपत्रांना देताना कॉंग्रस नेते राव वीरेंद्रसिंग हे गयालाल यांना पत्रकारांसमोर घेऊन आले आणि त्यांनी जाहीर केले की, गयाराम आता आयाराम झाले आहेत. ह्या विधानाने त्या काळी अनेक विनोदांना आणि व्यंगचित्रांना जन्म दिला.

आयाराम गयाराम केव्हा थांबले?[संपादन]

निवडून आल्यानंतर सहा महिन्यात पक्ष बदलणाऱ्या सभासदाला अपात्र ठरवणाऱ्या, इ.स. १९८५मध्ये झालेल्या भारतीय राज्यघटनेच्या ५२व्या दुरुस्तीनंतर आयाराम गयाराम कमी झाले.

स्वगृही परतणे[संपादन]

वसंतदादा पाटलांच्या 'पाठीत खंजीर खुपसून' शरद पवारांनी जे पु.लो.द. सरकार स्थापन केले असे म्हटले जाते, त्यात शंकरराव चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे मंत्री होते. (खुद्द वसंतदादाही 'सिंडिकेट काँग्रेस'चे होते,) शंकरराव आणि विखे-पाटलांनी वेगळा पक्ष काढला होता. केंद्रातल्या 'जनता पक्षा'च्या सरकारात यशवंतराव चव्हाण सामील झाले होते. पुढे ते सरकार कोसळले आणि १९८० च्या निवडणुकीत इंदिरा गांधींनी राजकीय 'कम बॅक' केला तेंव्हा पु.लो.द. मधून शंकरराव चव्हाण आणि सुशीलकुमारांनी अलगद काढता पाय घेऊन 'स्वगृही' प्रवेश केला. वसंतदादा आणि यशवंतरावही यथावकाश 'स्वगृही' परतले. यशवंतराव चव्हाणांच्या कॉंग्रसमध्ये परतण्याच्या कृुतीचे त्यांनी स्वगृही परतणे असे समर्थन केले होते. तेव्हापासून हा शब्दप्रयोग अस्तित्वात आला.

घरवापसी[संपादन]

धर्मांतरित हिंदूंना परत हिंदू धर्मात आणण्याच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला ते घरवापसी म्हणतात.

कुंपणावर बसणे[संपादन]

धड या राजकीय पक्षात ना त्या पक्षात अशा स्थितीत बसून राहणे या कृतीला कुंपणावर बसणे म्हणतात. असे कुंपणावर बसणारे यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्रातले पहिले नेते..