Jump to content

"नंदू होनप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: नंदू होनप (मृत्यू : मुंबई, १७ सप्टेंबर, इ.स. २०१६) हे एक मराठी संगीतक...
(काही फरक नाही)

१८:३२, २२ सप्टेंबर २०१६ ची आवृत्ती

नंदू होनप (मृत्यू : मुंबई, १७ सप्टेंबर, इ.स. २०१६) हे एक मराठी संगीतकार आणि व्हायोलिनवादक होते.

पु. ल. देशपांडे अकादमीत मिनी थिएटरमध्ये चाललेल्या 'सूरसाधना' या कार्यक्रमात शैलेश भागवत यांचे सनईवादन आणि नंदू होनप यांचे व्हायोलिनवादन अशी जुगलबंदी सुरू होती. कार्यक्रम ऐन टिपेला गेल्यानंतर होनप यांनी त्यांचे अत्यंत लोकप्रिय असे, 'निघालो घेऊनि दत्ताची पालखी' हे गीत वाजविले. त्यानंतर पुढे 'दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा' व्हायोलिनवर वाजविण्यास सुरूवात केल्यानंतर, त्यांचे भान हरपले आणि अशी सूरसमाधी लागली असतानाच, ते अचानक कोसळले. तो हृदयविकाराचा तीव्र धक्का होता. त्यातच होनप यांनी अखेरचा श्वास घेतला.

होनप हे कॅसेटच्या जमान्यात भक्तिसंगीताला उभारी देणारे कलावंत होते. 'निघालो घेऊनि दत्ताची पालखी', 'अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली', 'स्वामी कृपा कधी करणार' अशी शेकडो गाणी आणि ९६ चित्रपटांना संगीत अशी त्यांची कारकीर्द आहे. गीतकार आणि कवी प्रवीण दवणे यांची अनेक गाणी त्यांनी संगीतबद्ध केली होती.

अजित कडकडे, रवींद्र साठे, अनुराधा पौडवाल, गुलशन कुमार अशा गायकांना घेऊन त्यांनी एकापेक्षा एक अभंग, भजनांचा सांगितिक नजराणाच संगीतरसिकांना दिला. संगीतकार म्हणून होनप यांनी सर्वाधिक भक्तीगीतांना स्वरसाज चढवला असला, तरी त्यांनी संगीताचे अनेक प्रकार हाताळले. लावणी, भारुडं, स्तोत्र, मंत्र, भावगीते, प्रेमगीते आदींनाही त्यांनी संगीत दिले.

नंदू होनप यांच्या व्हायोलीनची साथ असलेली हिंदी चित्रपट गीते

  • दगाबाज रे…
  • सावन आया है…
  • सुन रहा है ...
  • सुनो ना संगे मरमर…