"धनंजय थोरात" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: धनंजय थोरात हे एक सामाजिक कार्यकर्ते आणि पुणे युवक काँग्रेसचे अ... |
No edit summary |
||
ओळ ६: | ओळ ६: | ||
पुढच्या निवडणुकीच्या वेळी धनंजयचा मतदारसंघ बदलला गेला. येथे तो एका कुप्रसिद्ध स्थानिक कुप्रसिद्ध गुंडाबरोबर निवडणूक लढला आणि पडला. तेव्हा त्याला पुण्याच्या आर.टी.ओ. कमिटीचा सदस्य म्हणून नियुक्ती मिळाली. तेथेही त्याने निःस्वार्थीपणे काम केले. |
पुढच्या निवडणुकीच्या वेळी धनंजयचा मतदारसंघ बदलला गेला. येथे तो एका कुप्रसिद्ध स्थानिक कुप्रसिद्ध गुंडाबरोबर निवडणूक लढला आणि पडला. तेव्हा त्याला पुण्याच्या आर.टी.ओ. कमिटीचा सदस्य म्हणून नियुक्ती मिळाली. तेथेही त्याने निःस्वार्थीपणे काम केले. |
||
धनंजय थोरात हे समाजकारण, साहित्य, कला, क्रीडा या क्षेत्रात सहजतेने वावरणारे जगन्मित्र कार्यकर्ते होते. कविवर्य [[सुरेश भट]] यांचा पुण्यातील पहिला जाहीर कार्यक्रम त्यांनीच आयोजित केला होता. पुण्यातील सांस्कृतिक महोत्सव, नवरात्र उत्सव आदींच्या नियोजन संयोजनामध्ये त्यांनी सक्रिय भाग घेतला. |
|||
थोरात यांव्या अकाली मृत्यूनंतर त्यांच्या स्मरणार्थ पुण्यात कै. धनंजय थोरात स्मृती प्रतिष्ठान स्थापन झाले. या प्रतिष्ठानतर्फे इ.स. २००८पासून दरवर्षी सामाजिक कार्यकर्त्याला धनंजय थोरात आदर्श कार्यकर्ता पुरस्कार आणि कलावंतांना किंवा खेळाडूंना अन्य पुरस्कार देण्यात येतात. |
|||
आजवर हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती ''':'''- गुन्हेगारांच्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनाचे कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ (२०१५), उदय जगताप (२०१४), अभिनेते नंदू पोळ (२०१४), अपंग पुनर्वसन कार्यातील ज्येष्ठ कार्यकर्त्या नसीमा हुरजूक (२०१०), शिल्पकार प्रमोद कांबळे (२०१५), अमरावती जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब देशमुख (२०११), रा.ना. चव्हाण प्रतिष्ठानचे रमेश चव्हाण (२०११), सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजा दांडेकर (२०१५), येरवड्यातील सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ चव्हाण (२०१०), राम बांगड (२०१६), डॉ. [[रावसाहेब कसबे]] (२०१६), सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी नारायण (२०१२), स्त्री-भ्रूणहत्या विरोधी चळवळीतील कार्यकर्त्या वर्षा देशपांडे (२०१२), लोककलाकार वसंत अवसरीकर, (२०११), पं. विजय सरदेशमुख (गायक, २०१६), गायक विद्याधर कोपरकर (२०१२), मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे सय्यदभाई, (२०११), अंध-अपंगासाठी कार्य करणार्या सायली गुजर (२०१४), बचत गट आणि ग्रामीण विकासाच्या क्षेत्रातील कार्यकर्त्या डॉ. सुधा कोठारी (२०१०), कवी सौमित्र तथा किशोर कदम (२०१०), वगैरे. |
|||
१२:४१, ३ सप्टेंबर २०१६ ची आवृत्ती
धनंजय थोरात हे एक सामाजिक कार्यकर्ते आणि पुणे युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांचे वडील स.ग. थोरात हे स्वातंत्र्य सैनिक होते आणि सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते होते. धनंजयच्या आई प्राथमिक शाळेतील विद्यार्थीप्रिय शिक्षिका होत्या.
धनंजयचे शिक्षण पुण्याच्या शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये झाले. शाळेत असतानाच त्यांनी काँग्रेस पक्षाच्या कामात सक्रिय भाग घ्यायला सुरुवात केली. निवडणुकांदरम्यान स्लिपा लिहिणे, त्या घरोघरी वाटणे, पक्षाची पत्रके वाटणे, सभेची तयारी करणे आदी किरकोळ कामांमध्ये धनंजयने स्वतःला झोकून दिले होते.
पुढे त्याच्या कामाचा धडाका असाच चालू राहिला आणि पुण्यात युवक काँग्रेस ही चळवळ सक्रिय झाली आणि एके दिवशी धनंजय पुणे शहर युवा काँग्रेसचा अध्यक्ष झाला. त्यानंतर त्याने पुण्यातील तळागाळातील लोकांशी संपर्क वाढवला. काँग्रेसचे तत्कालीन पुढारी जयंतराव टिळक, विठ्ठलराव गाडगीळ, बाळासाहेब भारदे बॅ. अ.र. अंतुले, विलासराव देशमुख, सीताराम केसरी यांच्याही तो परिचयाचा झाला. त्याचा फायदा असा झाला की त्याला पुणे महापालिकेच्या गुरुवार पेठेतील शितळादेवी चौक या मतदार संघातून महापालिकेच्या निवडणुकीचे तिकीट मिळाले. जनसंपर्क आणि प्रभावी प्रचार यामुळे ही अटीतटीचे लढत त्याने जिंकली आणि धनंजय थोरात पुण्याचे नगरसेवक झाले. पदाच्या पहिल्याच टर्ममध्ये त्यांना स्थायी समितीचे सदस्यत्व मिळाले. तेथेही त्यांनी तडफदारपणे काम केले.
पुढच्या निवडणुकीच्या वेळी धनंजयचा मतदारसंघ बदलला गेला. येथे तो एका कुप्रसिद्ध स्थानिक कुप्रसिद्ध गुंडाबरोबर निवडणूक लढला आणि पडला. तेव्हा त्याला पुण्याच्या आर.टी.ओ. कमिटीचा सदस्य म्हणून नियुक्ती मिळाली. तेथेही त्याने निःस्वार्थीपणे काम केले.
धनंजय थोरात हे समाजकारण, साहित्य, कला, क्रीडा या क्षेत्रात सहजतेने वावरणारे जगन्मित्र कार्यकर्ते होते. कविवर्य सुरेश भट यांचा पुण्यातील पहिला जाहीर कार्यक्रम त्यांनीच आयोजित केला होता. पुण्यातील सांस्कृतिक महोत्सव, नवरात्र उत्सव आदींच्या नियोजन संयोजनामध्ये त्यांनी सक्रिय भाग घेतला.
थोरात यांव्या अकाली मृत्यूनंतर त्यांच्या स्मरणार्थ पुण्यात कै. धनंजय थोरात स्मृती प्रतिष्ठान स्थापन झाले. या प्रतिष्ठानतर्फे इ.स. २००८पासून दरवर्षी सामाजिक कार्यकर्त्याला धनंजय थोरात आदर्श कार्यकर्ता पुरस्कार आणि कलावंतांना किंवा खेळाडूंना अन्य पुरस्कार देण्यात येतात.
आजवर हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती :- गुन्हेगारांच्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनाचे कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ (२०१५), उदय जगताप (२०१४), अभिनेते नंदू पोळ (२०१४), अपंग पुनर्वसन कार्यातील ज्येष्ठ कार्यकर्त्या नसीमा हुरजूक (२०१०), शिल्पकार प्रमोद कांबळे (२०१५), अमरावती जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब देशमुख (२०११), रा.ना. चव्हाण प्रतिष्ठानचे रमेश चव्हाण (२०११), सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजा दांडेकर (२०१५), येरवड्यातील सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ चव्हाण (२०१०), राम बांगड (२०१६), डॉ. रावसाहेब कसबे (२०१६), सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी नारायण (२०१२), स्त्री-भ्रूणहत्या विरोधी चळवळीतील कार्यकर्त्या वर्षा देशपांडे (२०१२), लोककलाकार वसंत अवसरीकर, (२०११), पं. विजय सरदेशमुख (गायक, २०१६), गायक विद्याधर कोपरकर (२०१२), मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे सय्यदभाई, (२०११), अंध-अपंगासाठी कार्य करणार्या सायली गुजर (२०१४), बचत गट आणि ग्रामीण विकासाच्या क्षेत्रातील कार्यकर्त्या डॉ. सुधा कोठारी (२०१०), कवी सौमित्र तथा किशोर कदम (२०१०), वगैरे.