"गिरिमित्र संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: गिरिमित्र संमेलन हे महाराष्ट्रातील गिर्यारोहकांना आणि संस्थां... |
(काही फरक नाही)
|
००:०५, ३ सप्टेंबर २०१६ ची आवृत्ती
गिरिमित्र संमेलन हे महाराष्ट्रातील गिर्यारोहकांना आणि संस्थांना एकत्र आणणारे, गिर्यारोहकांचे व्यासपीठ आहे. महाराष्ट्रभरातल्या गिर्यारोहकांना एकत्र आणण्याच्या कामी मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघाने पुढाकार घेतला आणि गिर्यारोहकांशी झालेल्या संवादातून संमेलनाची संकल्पना पुढे आली.
पहिले गिरिमित्र संमेलन २००२ साली झाले. त्यानंतची संमेलने कोणत्यातरी मध्यवर्ती संकल्पने(थीम)वर भरवली गेली. (१) गिर्यारोहणातील नवीन वाटा, (२) महाराष्ट्रातील गिर्यारोहणाची ५० वर्षे, (३) गिर्यारोहणातून अभ्यास, (४) सह्याद्री, (५) गिर्यारोहणातून संवर्धन, (६) गिर्यारोहण आणि सामाजिक बांधिलकी अशा काही मध्यवर्ती संकल्पना या संमेलनांमागे होत्या.
२०१६ साली ९-१० जुलै या कालावधीत मुलुंड-मुंबई येथील ‘महाराष्ट्र सेवा संघा’त झालेल्या १५व्या गिरिमित्र संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना ‘महिला आणि गिर्यारोहण’ अशी होती. देशातील महिला गिर्यारोहकांच्या अर्ध्वयू अशा गिर्यारोहक चंद्रप्रभा ऐतवाल या संमेलनाच्या अध्यक्षा होत्या. ज्येष्ठ महिला गिर्यारोहक संतोष यादव संमेलनाच्या उद्घाटक होत्या.
त्याचबरोबर अंशू जामसेनपा, सुमन कुटियाल, मालवध पूर्णा या महिला गिर्यारोहक ह्या १५व्या गिरि मित्र संमेलनाच्या विशेष अतिथी होत्या. महाराष्ट्रातील अनेक डोंगर भटक्या महिला या संमेलनात सहभागी झाल्या होत्या. विशेष म्हणजे या संमेलनाच्या अयोजनाची बहुतांशी जबाबदारी महिला गिर्यारोहकांच्याच खांद्यावर होती.