गिरिमित्र संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रस्तावना[संपादन]

गिरिमित्र संमेलन हे महाराष्ट्रातील तमाम डोंगरभटक्यांचे एक सामायिक व्यासपीठ. चार भिंतीबाहेर डोंगरदऱ्यात भटकणारे, कडे-सुळके आरोहण करणारे आणि इतिहासाचा मागोवा घेत सह्याद्रीच्या डोंगररांगात भटकणाऱ्या सर्व भटक्यांना एकत्र आणणारे ठिकाण. दरवर्षी एखाद्या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारीत संमेलन जुलैच्या दुसऱ्या शनिवार-रविवारी महाराष्ट्र सेवा संघ, मुंलुंड (प.) मुंबई येथे होत असते. आत्तापर्यंत 19 संमेलने संपन्न झाली आहेत.

पूर्वपीठिका[संपादन]

गिर्यारोहकांचे जग खरतर चार भिंतीबाहेरचे. खुल्या आकाशात मुक्तपणे विहरणा-या पक्ष्याप्रमाणेच तो डोंगरात, गड किल्ल्यांवर, जंगले नद्या ओलांडीत स्वच्छंद भटकत असतो. चौकटीतल्या आयुष्यात तो कधीच बंदिस्त नसतो. पण ही भटकंती सुरू असते ती मात्र निसर्गाचा मान राखीत, त्याचे अलिखित नियम पाळीत, गिर्यारोहणातील सुरक्षेचे मूलभूत तत्त्व अंगी बाणवित. त्यामुळेच या विस्तीर्ण अवकाशात विहरणाऱ्या सर्वच डोंगरवेड्यांना कोठे तरी एकत्र आणणे गरजेचे होते. एकत्र येऊन अनुभवांची देवाण-घेवाण करावी, नवनव्या गोष्टींची माहिती घ्यावी, येणाऱ्या अडचणींवर उपाय शोधावेत यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होणेही तितकेच गरजेचे होते. पूर्वी असे काही प्रयत्न झाले होते, पण त्यांना म्हणावे तसे यश आले नव्हते. महाराष्ट्रात गिर्यारोहकांच्या जवळपास दीड दोनशे संस्था आहेत आणि हजारो गिर्यारोहक गिर्यारोहणाचा छंद जोपासत आहेत. या सर्वाना एकत्र आणणे तसे कठीण काम होते. पण त्या बाबतीत पुढाकार घेतला मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघाने आणि गिर्यारोहाकांशी झालेल्या संवादातून गिरिमित्र संमेलनाची संकल्पना पुढे आली. त्यासाठी सर्वोतोपरी सहाय्य केले ते सेवा संघाचे श्री. चंद्रशेखर वझे, श्री. रवींद्र लाड, श्री. डी व्ही कुलकर्णी, श्री.अरुण भंडारे आणि श्री. प्रदीप नाटेकर आदी प्रभूतीनी. एकत्र येण्याची संकल्पना जरी पटली असली तरी एकत्र येऊन काय करावे याचा आराखडा नव्हता. तेव्हा धनंजय मदन, प्रदीप केळकर, प्रशांत ठोसर, गिरीश जाधव, समीर परांजपे आदी मंडळी वारंवार भेटू लागली. डोंगरात विविध कारणांनी भटकंती करणाऱ्या सर्वांसाठी उपयुक्त ठरतील असे सर्वसमावेशक कार्यक्रम करायचे ठरले. या सर्व संकल्पनांना आणि भटक्यांना एकत्र आणून संमेलनास मूर्त स्वरूप देण्यात हृषीकेश यादव यांची भूमिका महत्त्वाची ठरली. दिशा ठरली पण नाव ठरले नव्हते, महाडच्या डॉ राहुल वारंगे यांनी "गिरिमित्र संमेलन" हे नाव सुचविले आणि पहिल्या संमेलनाची तारीख ठरली. दिनांक १४ जुलै २००२ रोजी डोंगरवेड्यांचे अनोखे संमेलन मूर्त स्वरूपात साकार झाले. सुरुवातीस संमिश्र प्रतिसाद मिळाला. संमेलनाची संकल्पना, आखणी, आयोजन सर्वांनी मिळून केले होते. परिसंवाद, दृकश्राव्य सादरीकरण, मुलाखत असे याचे स्वरूप होते. दुसऱ्या संमेलनापासून ठराविक एक संस्था जबाबदारी घेऊन संमेलनाचे आयोजन करू लागली. संमेलनासाठी दरवर्षी एक मध्यवर्ती संकल्पना ठरवून त्याआधारे कार्यक्रमाचे आयोजन होऊ लागले.

मध्यवर्ती संकल्पना[संपादन]

    1. पहिले संमेलन -
    2. दुसरे संमेलन -
    3. तिसरे संमेलन - 1 ऑगस्ट 2004 : गिर्यारोहणातील नवीन वाटा
    4. चौथे संमेलन - 3 जुलै 2005 : महाराष्ट्राची गिर्यारोहणातील 50 वर्षे
    5. पाचवे संमेलन - 23 जुलै 2006 : सह्याद्री
    6. सहावे संमेलन - 15 जुलै 2007 : महाराष्ट्रातील संस्थात्मक गिर्यारोहण (रौप्य महोत्सवी 10 गिर्यारोहण संस्था)
    7. सातवे संमेलन - 12-13 जुलै 2008 : गिर्यारोहणातून निसर्गसंवर्धन
    8. आठवे संमेलन - 11-12 जुलै 2009 : गिर्यारोहणातून सामाजिक बांधिलकी
    9. नववे संमेलन - 10-11 जुलै 2010 : चरण वै मधु विदंती (Wandering one Gathers Honey)
    10. दहावे संमेलन - 16-17 जुलै 2011 : वेध भविष्याचा (दशकपूर्ती संमेलन)
    11. अकरावे संमेलन -
    12. बारावे संमेलन -
    13. तेरावे संमेलन -
    14. चौदावे संमेलन -
    15. पंधरावे संमेलन -
    16. सोळावे संमेलन -
    17. सतरावे संमेलन -
    18. अठरावे संमेलन -

www.girimitra.org


पहिले गिरिमित्र संमेलन २००२ साली झाले. त्यानंतची संमेलने कोणत्यातरी मध्यवर्ती संकल्पने(थीम)वर भरवली गेली. (१) गिर्यारोहणातील नवीन वाटा, (२) महाराष्ट्रातील गिर्यारोहणाची ५० वर्षे, (३) गिर्यारोहणातून अभ्यास, (४) सह्याद्री, (५) गिर्यारोहणातून संवर्धन, (६) गिर्यारोहण आणि सामाजिक बांधिलकी अशा काही मध्यवर्ती संकल्पना या संमेलनांमागे होत्या.

२०१६ साली ९-१० जुलै या कालावधीत मुलुंड-मुंबई येथील ‘महाराष्ट्र सेवा संघा’त झालेल्या १५व्या गिरिमित्र संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना ‘महिला आणि गिर्यारोहण’ अशी होती. देशातील महिला गिर्यारोहकांच्या अर्ध्वयू अशा गिर्यारोहक चंद्रप्रभा ऐतवाल या संमेलनाच्या अध्यक्षा होत्या. ज्येष्ठ महिला गिर्यारोहक संतोष यादव संमेलनाच्या उद्घाटक होत्या.

त्याचबरोबर अंशू जामसेनपा, सुमन कुटियाल, मालवध पूर्णा या महिला गिर्यारोहक ह्या १५व्या गिरि मित्र संमेलनाच्या विशेष अतिथी होत्या. महाराष्ट्रातील अनेक डोंगर भटक्या महिला या संमेलनात सहभागी झाल्या होत्या. विशेष म्हणजे या संमेलनाच्या अयोजनाची बहुतांशी जबाबदारी महिला गिर्यारोहकांच्याच खांद्यावर होती.