Jump to content

"शंकरराव गायकवाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: शंकरराव गायकवाड हे महाराष्ट्रातले एक प्रसिद्ध सनई वादक होते. नभ...
(काही फरक नाही)

००:३४, ३० ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती

शंकरराव गायकवाड हे महाराष्ट्रातले एक प्रसिद्ध सनई वादक होते. नभोवाणीवर प्रथम सनईवादन करण्याचा मान शंकरराव गायकवाड यांना मिळाला होता. फैजपूर येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाच्या उद्‌घाटनप्रसंगी शंकररावांचे सनईवादन ऐकून महात्मा गांधी प्रसन्‍न झाले होते. इ.स. १९६२ साली महाराष्ट्र सरकारने आयोजित केलेल्या संगीत महोत्सवाचे उद्‌घाटन शंकररावांच्या सनईने झाले होते.

शंकररावांच्या सनई वादनाच्या अनेक ध्वनिमुद्रिका आहेत. त्यांमध्ये ‘उगीच का कांता गांजिता’ ही आणि ‘चंद्रिका ही जणू’ यांना अपरंपार प्रशंसा मिळाली.

शंकररावांच्या पिढीत प्रभाशंकर गायकवाड आणि प्रमोद गायकवाड यांच्यानंतर आलेली नम्रता गायकवाड ही पाचव्या पिढीतल्या तरुण सनई वादक आहे. तिने पुण्यामधील २०१५ सालच्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवात सनईवादन करण्याचा मान मिळवला आहे..