Jump to content

"रविमुकुल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: रविमुकुल हे टोपण नाव असलेले एक मराठी चित्रकार आहेत. त्यांचे मूळ न...
(काही फरक नाही)

००:०७, २० ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती

रविमुकुल हे टोपण नाव असलेले एक मराठी चित्रकार आहेत. त्यांचे मूळ नाव विकास मुकुंद कुलकर्णी आणि गाव सोलापूर. त्यांच्या टोपण नावातले ‘र’ हे अक्षर त्यांच्या रमेशमामांवरून घेतले. विश्वासने चित्रकलेची प्रेरणा या मामांकडून घेतली. हे मामा अकाली गेले, म्हणून त्यांच्या नावातला ‘र’ आला. वि हे अक्षर त्यांच्या विश्वास नावातले. ‘मु’ म्हणजे वडिलांच्या मुकुंद नावातले आणि कुल हा कुलकर्णीचा शॉर्टफॉर्म.

रविमुकुल यांनी श्रीमान योगीसारख्या अनेक गाजलेल्या पुस्तकांची मुखपृष्ठे रंगवली.

रविमुकुल यांनी लिहिलेली पुस्तके

  • लेखी बोले (साहित्यसृष्टीतील बर्‍यावाईट प्रवृत्तींचा उपरोधिक शैलीतून घेतलेला वेध)

रविमुकुल यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान

  • प्रबोधनकार ठाकरे विचार साहित्य संमेलनातर्फे मिळालेला कलागौरव पुरस्कार
  • चित्रकार-मुखपृष्ठकार रविमुकुल यांचा महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्यातर्फे जाहीर मुलाखतींचा कार्यक्रम झाला. साहित्य परिषदेच्या इतिहासात एखाद्या चित्रकाराचा असा सन्मान होण्याची ही पहिलीच वेळ होती. (११ मे, २०१६)