"तरुण तुर्क म्हातारे अर्क" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: तरुण तुर्क म्हातारे अर्क हे एक मराठी नाटक आहे. नाटकाचे लेखन व दिग... |
(काही फरक नाही)
|
०६:१३, १९ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती
तरुण तुर्क म्हातारे अर्क हे एक मराठी नाटक आहे. नाटकाचे लेखन व दिग्दर्शन मधुकर तोरडमल यांचे आहे. हे नाटक मधुकर तोरडमल यांनी रंगविलेल्या इरसाल ‘प्रा. बारटक्के’ या भूमिकेमुळे गाजले. त्यांच्या स्वतःच्याच ‘रसिकरंजन’ नाटय़सस्थेतर्फे त्यांनी हे नाटक रंगभूमीवर सादर केले होते. नाटकाने रंगभूमीवर ‘ह’च्या बाराखडीचा ‘हाऊसफुल्ल’ इतिहास निर्माण केला. ‘रसिकरंजन’तर्फे त्यांनी या नाटकाचे एक हजारांहून अधिक प्रयोग केले. त्यानंतर अन्य नाटय़संस्थांतर्फेही हे नाटक रंगभूमीवर सादर झाले. २०१४ साली या नाटकाचा संयुक्त पाच हजारांवा प्रयोग तोरडमल यांच्या उपस्थितीत साजरा झाला.
अहमदनगर येथील ‘अहमदनगर महाविद्यालया’त तोरडमल यांनी दहा वर्षे इंग्रजीचा प्राध्यापक म्हणून नोकरी केली. या काळात विद्यार्थ्यांशी त्यांचा खूप जवळून संबंध आला. विद्यार्थ्यांचे बोलणे, त्यांची प्रेमप्रकरणे, त्यांच्यातील चेष्टामस्करी, महाविद्यालयीन वातावरण हे सगळे त्यांना अनुभवायला मिळाले. त्या महाविद्यालयीन नोकरीत प्रत्यक्ष पाहायला मिळालेली पात्रे तोरडमलांनी या नाटकाद्वारे रंगवली. नाटकातील ‘प्रा. बारटक्के’ या पात्राच्या तोंडी ‘ह’ची बाराखडी आहे. अशा भाषेत बोलणारी व्यक्ती लेखकाने प्रत्यक्ष पाहिली होती. त्यामुळे नाटकात ती आली.