Jump to content

"कन्यागत महापर्वकाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: महापर्वकाल म्हणजे महान पुण्य काळ. गुरू कन्या राशीत गेल्यावर कृष...
(काही फरक नाही)

००:५१, १२ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती

महापर्वकाल म्हणजे महान पुण्य काळ. गुरू कन्या राशीत गेल्यावर कृष्णा नदीच्या तीरावर होणार्‍या महापर्वकालाला कन्यागत महापर्वकाल म्हणतात.

हे महापर्वकाल भारतभरात वेगवेगळ्या नदीकिनारी होत असतात. गुरू कुंभ राशीत गेला, की गंगा नदीच्या तीरावर कुंभमेळा साजरा होतो. गुरू सिंह राशीत गेला की सिंहस्थ मेळा होतो.

भारतात दरवर्षी नद्यांचे लहान-मोठे उत्सव सुरू असतात. त्यातील सुमारे २५० उत्सव प्रसिद्ध आहेत. गुरू ग्रहाचा प्रत्येक राशीमध्ये वर्षभर मुक्काम असतो. त्या वेळी देशाच्या विविध भागांमध्ये नद्यांच्या किनारी जे उत्सव सुरू असतात त्यांनाच महापर्वकाल म्हणतात. महापर्वकालाच्या ठिकाणच्या नदीमध्ये गंगा नदी अवतरते अशी श्रद्धा असते. संपूर्ण वर्षभर या स्थानिक नदीच्या सान्निध्यामध्ये गंगा नदी राहते अशी महापर्वकालाची संकल्पना आहे.