"शुभांगी भडभडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो added Category:मराठी साहित्यिक using HotCat |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
अभ्यासू लेखिका म्हणून '''शुभांगी भडभडे''' महाराष्ट्रातच नव्हे, तर महाराष्ट्राबाहेरही प्रसिद्ध आहेत. थोरामोठ्यांच्या जीवनावर आधारित साहित्य हे त्यांच्या लिखाणाचे खास वैशिष्ट्य आहे. |
अभ्यासू लेखिका म्हणून '''शुभांगी भडभडे''' महाराष्ट्रातच नव्हे, तर महाराष्ट्राबाहेरही प्रसिद्ध आहेत. थोरामोठ्यांच्या जीवनावर आधारित साहित्य हे त्यांच्या लिखाणाचे खास वैशिष्ट्य आहे. |
||
शुभांगी भडभडे यांनी लिहिलेल्या |
शुभांगी भडभडे यांनी लिहिलेल्या कादंबर्यांपैकी त्यांच्या ११ चरित्रात्मक कादंबर्यांचा हिंदी अनुवाद झाला आहे. याशिवाय त्यांच्या नावावर १७ सामाजिक कादंबर्या, १० लघुकथासंग्रह आणि सहा दोन-अंकी नाटके आहेत. |
||
शुभांगी भडभडे यांच्या काही |
शुभांगी भडभडे यांच्या काही कादंबर्यांची नाट्यरूपांतरे झाली आहेत. ’इदं न मम' या नाटकाचे अंदमान, उत्तर प्रदेश, कर्नाटक, काश्मीर, गोवा, तमिळनाडू, पंजाब, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा, हिमाचल प्रदेश आदी राज्यांत मिळून (नोव्हेंबर २०१२पर्यंत) २५८ प्रयोग झाले आहेत. लडाखमधील लेह या समुद्रसपाटीपासून १८.८३२ फुटांवरील लेह या गावीही ’इदं न मम’चा नाट्यप्रयोग झाला आहे. |
||
’इदं न मम' या नाटकाचे हिंदी आणि कानडी भाषेत अनुवाद झाले आहेत. हिंदी अनुवाद ’युगांतरकारी' नावाने आहे. तत्कालीन उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या हस्ते त्याचे प्रकाशन दिल्लीत झाले होते.तेव्हा शुभांगी सौ. भडभडे यांचा उल्लेख अडवाणींनी ’राष्ट्रीय चरित्र उपन्यासकार' असा केला होता. |

स्वामी विवेकानंद या नाटकाचा २५वा प्रयोग गुजरातेत मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झाला होता. |
त्यांनी लिहिलेल्या स्वामी विवेकानंद या नाटकाचा २५वा प्रयोग गुजरातेत मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झाला होता. |
||
==शुभांगी भडभडे यांनी लिहिलेली पुस्तके== |
==शुभांगी भडभडे यांनी लिहिलेली पुस्तके== |
||
* आनंदवनभुवनी (समर्थ [[रामदास]] यांच्या जीवनावरील कादंबरी) |
* आनंदवनभुवनी (समर्थ [[रामदास]] यांच्या जीवनावरील कादंबरी) |
||
* आकाशवेध (गोळवलकर गुरुजी यांच्या जीवनावर आधारित) |
* आकाशवेध (गोळवलकर गुरुजी यांच्या जीवनावर आधारित) |
||
* इदं न मम (सुरक्षा सल्लागार श्री. देवपुजारी यांच्या जीवनावर आधारित नाटक) हिंदीत |
* इदं न मम (सुरक्षा सल्लागार श्री. देवपुजारी यांच्या जीवनावर आधारित नाटक) हिंदीत ‘युगांतरकारी’. |
||
* कृतार्थ (डॉ. हेडगेवार यांच्या जीवनावर आधारित) - हिंदीत ’पारसमणि’ |
* कृतार्थ (डॉ. हेडगेवार यांच्या जीवनावर आधारित) - हिंदीत ’पारसमणि’ |
||
* कैवल्याचं लेणं (कुष्ठसेवक डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांच्या जीवनावर आधारित) |
* कैवल्याचं लेणं (कुष्ठसेवक डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांच्या जीवनावर आधारित) |
||
ओळ २७: | ओळ २७: | ||
* शिवप्रिया (शंकर-पार्वतीच्या जीवनावर आधारित हिंदी-मराठी कादंबरी} |
* शिवप्रिया (शंकर-पार्वतीच्या जीवनावर आधारित हिंदी-मराठी कादंबरी} |
||
* सार्थक (संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावर आधारित) |
* सार्थक (संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावर आधारित) |
||
* स्वयंभू(श्रीरामाच्या जीवनावरील कादंबरी) |
* स्वयंभू (श्रीरामाच्या जीवनावरील कादंबरी) |
||
* स्वामिनी (सिद्धार्थ आणि यशोधरा यांच्या जीवनावरील कादंबरी) |
* स्वामिनी (सिद्धार्थ आणि यशोधरा यांच्या जीवनावरील कादंबरी) |
||
* स्वामी विवेकानंद (नाटक). हिंदीतही अनुवादित. |
|||
==अन्य== |
==अन्य== |
||
शुभांगी भडभडे यांनीच स्थापिलेल्या विदर्भातील पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठानच्या त्या इ.स. १९९४पासून अध्यक्षा आहेत. |
शुभांगी भडभडे यांनीच स्थापिलेल्या विदर्भातील पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठानच्या त्या इ.स. १९९४पासून अध्यक्षा आहेत. |
||
शुभांगी भडभडे याच्या स्वामी विवेकानंद या दोन अंकी नाटकाचे प्रयोग राधिका क्रिएशन्स ही संस्था राज्यांराज्यांतून करत असते. १७-७-२०१६ रोजी पुण्यात या नाटकाचा १३९वा प्रयोग झाला. |
|||
==पुरस्कार आणि सन्मान== |
==पुरस्कार आणि सन्मान== |
||
* १५ मोठे साहित्य पुरस्कार |
* १५ मोठे साहित्य पुरस्कार |
||
* |
* कर्हाडला २४-२५ नोव्हेंबर २०१२ला भरलेल्या ५१व्या [[अंकुर साहित्य संमेलन|संमेलनाच्या]] त्या संमेलनाध्यक्ष होत्या.. |
||
[[वर्ग:मराठी साहित्यिक]] |
[[वर्ग:मराठी साहित्यिक]] |
००:२०, ८ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती
अभ्यासू लेखिका म्हणून शुभांगी भडभडे महाराष्ट्रातच नव्हे, तर महाराष्ट्राबाहेरही प्रसिद्ध आहेत. थोरामोठ्यांच्या जीवनावर आधारित साहित्य हे त्यांच्या लिखाणाचे खास वैशिष्ट्य आहे.
शुभांगी भडभडे यांनी लिहिलेल्या कादंबर्यांपैकी त्यांच्या ११ चरित्रात्मक कादंबर्यांचा हिंदी अनुवाद झाला आहे. याशिवाय त्यांच्या नावावर १७ सामाजिक कादंबर्या, १० लघुकथासंग्रह आणि सहा दोन-अंकी नाटके आहेत.
शुभांगी भडभडे यांच्या काही कादंबर्यांची नाट्यरूपांतरे झाली आहेत. ’इदं न मम' या नाटकाचे अंदमान, उत्तर प्रदेश, कर्नाटक, काश्मीर, गोवा, तमिळनाडू, पंजाब, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा, हिमाचल प्रदेश आदी राज्यांत मिळून (नोव्हेंबर २०१२पर्यंत) २५८ प्रयोग झाले आहेत. लडाखमधील लेह या समुद्रसपाटीपासून १८.८३२ फुटांवरील लेह या गावीही ’इदं न मम’चा नाट्यप्रयोग झाला आहे.
’इदं न मम' या नाटकाचे हिंदी आणि कानडी भाषेत अनुवाद झाले आहेत. हिंदी अनुवाद ’युगांतरकारी' नावाने आहे. तत्कालीन उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या हस्ते त्याचे प्रकाशन दिल्लीत झाले होते.तेव्हा शुभांगी सौ. भडभडे यांचा उल्लेख अडवाणींनी ’राष्ट्रीय चरित्र उपन्यासकार' असा केला होता.
त्यांनी लिहिलेल्या स्वामी विवेकानंद या नाटकाचा २५वा प्रयोग गुजरातेत मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झाला होता.
शुभांगी भडभडे यांनी लिहिलेली पुस्तके
- आनंदवनभुवनी (समर्थ रामदास यांच्या जीवनावरील कादंबरी)
- आकाशवेध (गोळवलकर गुरुजी यांच्या जीवनावर आधारित)
- इदं न मम (सुरक्षा सल्लागार श्री. देवपुजारी यांच्या जीवनावर आधारित नाटक) हिंदीत ‘युगांतरकारी’.
- कृतार्थ (डॉ. हेडगेवार यांच्या जीवनावर आधारित) - हिंदीत ’पारसमणि’
- कैवल्याचं लेणं (कुष्ठसेवक डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांच्या जीवनावर आधारित)
- तपोवन (स्वामी विवेकानंदांवरीले हिंदी-मराठी कादंबरी)
- नागनिका (सातवाहन वंशाची राणी नागनिका हिच्या जीवनावर आधारित)
- पद्मगंधा (दुष्यंत आणि शकुंतला यांच्या जीवनावरची कादंबरी)
- परमहंस फिर आओ (रामकृष्ण परमहंस यांच्या जीवनावरील हिंदी कादंबरी)
- पूर्णविराम (श्रीकृष्ण-गांधारीच्या जीवनावर आधारित)
- भौमर्षी (आचार्य विनोबा भावे यांच्या जीवनावर आधारित हिंदी-मराठी कादंबरी)
- महकती बगिया (हिंदी कथासंग्रह)
- राज्यमंत्री (यशोधरादेवी बजाज यांच्या जीवनावर आधारित
- राजवधू (राणी मीराबाईच्या जीवनावर आधारित कादंबरी)
- विळखा (शेंबाळपिंप्रीच्या जमीनदार घराण्यावर आधारित)
- शिवप्रिया (शंकर-पार्वतीच्या जीवनावर आधारित हिंदी-मराठी कादंबरी}
- सार्थक (संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावर आधारित)
- स्वयंभू (श्रीरामाच्या जीवनावरील कादंबरी)
- स्वामिनी (सिद्धार्थ आणि यशोधरा यांच्या जीवनावरील कादंबरी)
- स्वामी विवेकानंद (नाटक). हिंदीतही अनुवादित.
अन्य
शुभांगी भडभडे यांनीच स्थापिलेल्या विदर्भातील पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठानच्या त्या इ.स. १९९४पासून अध्यक्षा आहेत.
शुभांगी भडभडे याच्या स्वामी विवेकानंद या दोन अंकी नाटकाचे प्रयोग राधिका क्रिएशन्स ही संस्था राज्यांराज्यांतून करत असते. १७-७-२०१६ रोजी पुण्यात या नाटकाचा १३९वा प्रयोग झाला.
पुरस्कार आणि सन्मान
- १५ मोठे साहित्य पुरस्कार
- कर्हाडला २४-२५ नोव्हेंबर २०१२ला भरलेल्या ५१व्या संमेलनाच्या त्या संमेलनाध्यक्ष होत्या..