"यंग झिंगारो ट्रेकर्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: यंग झिंगारो ट्रेकर्स हा सह्याद्री पर्वतामध्ये डोंगरभ्रमंती कर... |
(काही फरक नाही)
|
२३:१५, २ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती
यंग झिंगारो ट्रेकर्स हा सह्याद्री पर्वतामध्ये डोंगरभ्रमंती करणारा मुंबईतील एक क्लब आहे. याची स्थापना हृषीकेश यादव नावाच्या तरुणाने १९८२ साली केली. त्यापूर्वी पुण्यात युथ हॉस्टेलमध्ये राहत असताना हृषीकेश यादव १९७४पासून सह्याद्रीच्या दर्या आणि सह्याद्रीची खोरी पालथी घालीत होते.
यंग झिंगारो ट्रेकर्सने अनेक उपक्रम राबवले. अनेक तरुणांना गड-किल्ल्यांची सफर घडवून आणली. त्यांना गिर्यारोहण शिकवले. हा क्लब दरवर्षी १५ ऑगस्टला अंध-अपंगांना ट्रेकवर घेऊन जातो. त्याहीपुढे जाऊन त्यांना हिमालयावर गिर्यारोहण करण्याचा आनंद मिळवून दिला.
तीन वर्षे सह्याद्रीच्या कान्याकोपर्यात भटकून यंग झिंगारोच्या ५० सदस्यांनी २२५ किल्ल्यांची माहिती जमवून १०० सुळके, अनेक लेणी आणि पशुपक्षी याची छायाचित्रे जमवली. या माहितीवर आधारलेली ‘सांगाती सह्याद्रीचा’ आणि ‘सह्याद्री कम्पॅनियन’ अशी दोन पुस्तके काढली.
हृषीकेश यादव हे अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे गेली २० वर्षे कार्याध्यक्ष आहेत. या महासंघाद्वारे त्यांनी माउंट एव्हरेस्ट-चढाईची पहिली नागरी मोहीम आखली आणि यशस्वी करून दाखवली.
यंग झिंगारोच्या या संस्थापकाला १५व्या गिरिमित्र संमेलनात ‘गिरिमित्र जीवनगौरव’ पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.