Jump to content

"चिंतामण गणेश कोल्हटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४१: ओळ ४१:
कोल्हटकरांनी [[मराठी]]बरोबरच [[हिंदी]] आणि [[उर्दू]] नाटकांतही भूमिका केल्या. पुण्यप्रभाव या नाटकातील त्यांच्या भूमिकेबद्दल त्यांचा [[मुंबई]]च्या पोलीस आयुक्तांनी सत्कार केला होता. त्यांचे विविधढंगी काम पाहून [[जवाहरलाल नेहरू|जवाहरलाल नेहरूंनी]] त्यांना बहुरूपी म्हणून नावाजले होते.{{संदर्भ हवा}} त्यामुळेच चिंतामणरावांनी आपल्या आत्मचरित्राला [[बहुरूपी (पुस्तक)|बहुरूपी]] हे नाव दिले आहे. त्यांनी लिहिलेल्या [[माझे नाटककार (पुस्तक)|माझे नाटककार]] या पुस्तकात तत्कालीन नाट्यलेखकांच्या व्यक्तिरेखा वर्णिल्या आहेत. त्यांनी लिहिलेले पुण्यावतार हे पाच-अंकी नाटक [[इ. स. १९६६]] मध्ये मुंबईच्या [[आंतरनाट्य]] या संस्थेने रंगमंचावर आणले होते. जवळजवळ ५० वर्षे त्यांचा रंगभूमीवरील कलाकारांशी कधी नाटककार म्हणून, कधी नट म्हणून तर कधी दिग्दर्शक म्हणून संबंध येत गेला.
कोल्हटकरांनी [[मराठी]]बरोबरच [[हिंदी]] आणि [[उर्दू]] नाटकांतही भूमिका केल्या. पुण्यप्रभाव या नाटकातील त्यांच्या भूमिकेबद्दल त्यांचा [[मुंबई]]च्या पोलीस आयुक्तांनी सत्कार केला होता. त्यांचे विविधढंगी काम पाहून [[जवाहरलाल नेहरू|जवाहरलाल नेहरूंनी]] त्यांना बहुरूपी म्हणून नावाजले होते.{{संदर्भ हवा}} त्यामुळेच चिंतामणरावांनी आपल्या आत्मचरित्राला [[बहुरूपी (पुस्तक)|बहुरूपी]] हे नाव दिले आहे. त्यांनी लिहिलेल्या [[माझे नाटककार (पुस्तक)|माझे नाटककार]] या पुस्तकात तत्कालीन नाट्यलेखकांच्या व्यक्तिरेखा वर्णिल्या आहेत. त्यांनी लिहिलेले पुण्यावतार हे पाच-अंकी नाटक [[इ. स. १९६६]] मध्ये मुंबईच्या [[आंतरनाट्य]] या संस्थेने रंगमंचावर आणले होते. जवळजवळ ५० वर्षे त्यांचा रंगभूमीवरील कलाकारांशी कधी नाटककार म्हणून, कधी नट म्हणून तर कधी दिग्दर्शक म्हणून संबंध येत गेला.


त्यांचा मुलगा [[चित्तरंजन कोल्हटकर]] हेसुद्धा नाट्यअभिनेते होते.
त्यांचा मुलगा [[चित्तरंजन कोल्हटकर]] हेसुद्धा नाट्यअभिनेते होते. त्यांची नात विनीता करमरकर यांनी चिंतामणरावांचे चरित्र लिहिले आहे.


==नाट्यसंमेलनांचे अध्यक्ष==
==नाट्यसंमेलनांचे अध्यक्ष==

१७:३९, १ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती

चिंतामण गणेश कोल्हटकर
जन्म चिंतामण गणेश कोल्हटकर
मार्च १२ इ.स. १८९१
रत्‍नागिरी, महाराष्ट्र
मृत्यू २३ नोव्हेंबर १९५९
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय, वृत्तपत्रलेखन, अन्य लेखन आणि नाट्यनिर्मिती
कारकीर्दीचा काळ इ.स. १९१४-इ.स. १९५९
भाषा मराठी
प्रमुख नाटके पुण्यप्रभाव
राजसंन्यास
भावबंधन
पुरस्कार रंगभूमीच्या सेवेबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदक
अपत्ये चित्तरंजन कोल्हटकर

चिंतामणराव गणेश कोल्हटकर (जन्म : मार्च १२ इ.स. १८९१ मृत्यू : नोव्हेंबर २३ इ.स. १९५९ ) हे मराठी गद्यनट आणि नाट्यनिर्माते होते.

बालपण

चिंतामणराव कोल्हटकर यांचे घराणे नेवरे या रत्‍नागिरी जिल्ह्यातील गावचे होते. त्यांचा जन्म तेथेच १२ मार्च, इ.स. १८९१ रोजी झाला. त्यांचे वडील हे वर्तमानपत्र लेखक आणि वक्ते होते. चिंतामण कोल्हटकरांच्या वयाच्या सातव्या वर्षीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. लहानपणी अभ्यासात अधिक गती नसल्याचे पाहून काही वर्षे त्यांनी पिढीजात असलेली शेती केली.

कारकीर्द

कोल्हटकर इ.स. १९११मध्ये महाराष्ट्र नाटक मंडळीत दाखल झाले आणि पुढच्याच वर्षी ते भरत नाटक मंडळीत गेले. इ.स. १९१४ मध्ये ते किर्लोस्कर नाटक मंडळी. तेथे त्यांना प्रसिद्धी मिळाली. १९१८मध्ये त्यांनी दीनानाथ मंगेशकरांच्या भागीदारीत त्यांनी बलवंत नाटक कंपनी काढली. त्यानंतर त्यांनी नाट्यक्षेत्रात प्रकारची कामे केली.

कोल्हटकरांनी भूमिका केलेली पुण्यप्रभाव, राजसंन्यास, भावबंधन, इ. नाटके प्रसिद्ध झाली. वेड्यांचा बाजार हे राम गणेश गडकरी यांचे अपूर्ण नाटक त्यांनी पूर्ण केले.

इ.स. १९३३च्या सुमारास मराठी संगीत रंगभूमीला प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी झाला.[ दुजोरा हवा] तेव्हा चितामणरावांनी चित्रपटांत काम करायला सुरुवात केली. त्यांची वसंतसेना (इ.स. १९४२) या चित्रपटातली शकाराची भूमिका गाजली. पुढे त्यांनी गंगाधरपंत लोंढे यांच्या राजाराम संगीत मंडळीत प्रवेश केला आणि परत नाटकांतून कामे करायला सुरुवात केली. पुढे ते मो.ग. रांगणेकरांच्या नाट्यनिकेतनमध्ये गेले. अखेरीस त्यांनी ललित कला कुंज नावाची स्वतःची नाटक मंडळी काढली. या कंपनीनेच पु.ल. देशपांडे यांना उदयास आणले.[ दुजोरा हवा]

कोल्हटकरांनी मराठीबरोबरच हिंदी आणि उर्दू नाटकांतही भूमिका केल्या. पुण्यप्रभाव या नाटकातील त्यांच्या भूमिकेबद्दल त्यांचा मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी सत्कार केला होता. त्यांचे विविधढंगी काम पाहून जवाहरलाल नेहरूंनी त्यांना बहुरूपी म्हणून नावाजले होते.[ संदर्भ हवा ] त्यामुळेच चिंतामणरावांनी आपल्या आत्मचरित्राला बहुरूपी हे नाव दिले आहे. त्यांनी लिहिलेल्या माझे नाटककार या पुस्तकात तत्कालीन नाट्यलेखकांच्या व्यक्तिरेखा वर्णिल्या आहेत. त्यांनी लिहिलेले पुण्यावतार हे पाच-अंकी नाटक इ. स. १९६६ मध्ये मुंबईच्या आंतरनाट्य या संस्थेने रंगमंचावर आणले होते. जवळजवळ ५० वर्षे त्यांचा रंगभूमीवरील कलाकारांशी कधी नाटककार म्हणून, कधी नट म्हणून तर कधी दिग्दर्शक म्हणून संबंध येत गेला.

त्यांचा मुलगा चित्तरंजन कोल्हटकर हेसुद्धा नाट्यअभिनेते होते. त्यांची नात विनीता करमरकर यांनी चिंतामणरावांचे चरित्र लिहिले आहे.

नाट्यसंमेलनांचे अध्यक्ष

चिंतामणराव कोल्हटकर हे इ.स. १९४६ साली अहमदनगर येथे भरलेल्या ३५व्या, आणि इ. स. १९४९ मध्ये कोल्हापूर येथे भरलेल्या ३६व्या नाट्यसंमेलनांचे अध्यक्ष होते.

चिंतामणरावांची चरित्रे

  • बलवंत चिंतामणी (डॉ. विनीता वसंत करमरकर)

पुरस्कार

त्यांच्या या रंगभूमीच्या सेवेबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदक देऊन शासनाने त्यांचा सन्मान केला.

चिंतामणराव कोल्हटकर यांनी कामे केलेली नाटके आणि त्यांतील भूमिका

  • आंधळ्यांची शाळा (अण्णासाहेब)
  • आशीर्वाद (रावबहादुर)
  • एकच प्याला (सुधाकर)
  • कमला (नीलकंठराव)
  • काकाची शशी (मनहरलाल)
  • कांचनगडची मोहना (प्रतापराव)
  • जग काय म्हणेल ()दिवाकर)
  • झुंझारराव (झुंझारराव)
  • तानसेन (अकबर)
  • तुकाराम (मंबाजी)
  • तोतयाचे बंड ()
  • त्राटिका (धनाजीराव, प्रतापराव)
  • द्रौपदी (शकुनीमामा)
  • नेकजात मराठा (जगदेवराव, शिवाजी)
  • पाणिग्रहण (घोडके)
  • पुण्यप्रभाव (वृंदावन)
  • प्रेमध्वज (पहारेकरी)
  • बेबंदशाही (संभाजी)
  • ब्रह्मकुमारी (देवेंद्र)
  • भाऊबंदकी (राघोबा, सुमेरसिंग)
  • भाग्यवान (शिदबा)
  • भावबंधन (घनश्याम)
  • माते तुला काय हवंय ? (युधिष्ठिर)
  • मानाजीराव (मानाजीराव)
  • मानापमान (लक्ष्मीधर)
  • रणदुंदुभी (मातंग युवराज)
  • राजमुकुट (राजेश्वर)
  • राजसंन्यास ( कमलाकर, साबाजी)
  • विद्याहरण (शिष्यवर, शुक्राचार्य)
  • वैजयंती (रत्‍नाकर)
  • शिवसंभव (लखूजी जाधव)
  • संन्यस्त खड्ग (विक्रमसिंह)
  • संशयकल्लोळ ( फाल्गुनराव, भादव्या)
  • सोन्याचा कळस (बाबा शिगवण)
  • स्वयंसेवक (राघोजी राव)
  • हॅम्लेट (चंद्रसेन)
  • हाच मुलाचा बाप (वसंत)
  • हिरवा चुडा (पाटील)