Jump to content

"विल्यम जोन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: ‘ नाईट ’ ही बहुमानाची पदवी मिळवून इ. स. १७९३ मध्ये इंग्लंडहून भारत...
(काही फरक नाही)

१७:०४, १ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती

‘ नाईट ’ ही बहुमानाची पदवी मिळवून इ. स. १७९३ मध्ये इंग्लंडहून भारतात आलेला सर विल्यम जोन्स हा एशियाटिक सोसायटीचा संस्थापक आणि अध्यक्ष होता. रामलोचन पंडिताच्या सर्व अपमानास्पद अटी मान्य करून तो पौर्वात्य पद्धतीने संस्कृत शिकला. डायजेस्ट ऑफ हिंदू अॅन्ड मोहमडन लॉज, एशियाटिक मिसेलेनी, हिंदूंची कालगणना, हिंदूंचे राशिचक्र, पर्शियन भाषेचे व्याकरण, पौर्वात्य हस्तलिखित ग्रंथांची सूची इत्यादी अनेक विद्वन्मान्य ग्रंथ त्याने लिहिले आहेत. भगवद्‌गीता, गरूडपुराण, मनुस्मृती, शाकुंतल, ऋतुसंहार, गीतगोविंद, हितोपदेश इत्यादी साहित्यकृतींचा हा पहिला भाषांतरकार आहे. भारतीय संस्कृतीची माहिती जगाला करून देणारा हा थोर पंडित होता.