"चौसष्ट योगिनी मंदिर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: योगिनी या शाक्त संप्रदायाच्या देवता. त्यांना आवरण देवता असेसुद्...
(काही फरक नाही)

२२:३९, ३१ जुलै २०१६ ची आवृत्ती

योगिनी या शाक्त संप्रदायाच्या देवता. त्यांना आवरण देवता असेसुद्धा म्हटले जाते. त्यांना पार्वतीच्या सख्या मानले गेले आहे. योगिनीतंत्रात त्यांची उत्पती, त्यांची शक्ती आणि त्यांच्या कथा दिलेल्या आहेत. दैत्य निर्दालनासाठी दुर्गेने ६४ रूपे घेतली आणि त्यांच्या सर्वाच्या शक्तिनिशी दैत्यांशी युद्ध केले आणि त्यात त्या दैत्यांचा पराभव केला. भारतामध्ये अनेक ठिकाणी चौसष्ट योगिनी मंदिरे आहेत. त्यांपैकी ही काही मंदिरे :

  • चौसष्ट योगिनी मंदिर, जबलपूर : जबलपूर येथील प्रसिद्ध भेडाघाटजवळ हे मंदिर आहे. येथेच नर्मदा नदी संगमरवराचे डोंगर फोडून मधून वाहते. या मंदिराचे बांधकाम इसवी सन १०००च्या आसपास कलचुरी वंशातील राजांनी केले होते. मंदिराच्या सभामंडपात राणी दुर्गावतीच्या भेटीसंबंधी एक शिलालेख आहे. या मंदिराच्या आवारातून राणी दुर्गावतीच्या महालाकडे जाणारे एक भुयार आहे, असे सांगण्यात येते.

मंदिरात शंकराची पिंडी आहे व आजूबाजूला ६४ योगिनींचा घेराव आहे. एकूणएक मूर्ती भंगलेल्या अवस्थेत आहेत.

  • चौसष्ट योगिनी मंदिर, खजुराहो : इ.स. ८७५ ते ९०० या काळात बांधलेले हे मंदिर अनेक बाबतीत अनोखे आहे. हे मंदिर खजुराहो येथील मंदिरांच्या पश्चिम गटात येते. या मंदिराला किंवा त्यांच्या भिंतींवर कोणतीही खास सजावट नाही. या मंदिरात ६४ योगिनींसाठी कोनाडे असून शिवाय एक मोठे महिसासुरमर्दिनीचे देऊळआहे आणि बाकी दोन कोनाड्यांत मत्रिका ब्राह्मणी आणि महेश्वरीच्या मूर्ती आहेत. ६४ योगिनींपैकी काही मूर्तींचे पाय तोडले आहेत, बाकी बहुतेक मूर्ती जवळपास अखंड आहेत.
  • चौसष्ट योगिनी मंदिर, मोरेना : महाराजा देवपालाने ८व्या शतकात बांधलेले हे मंदिर म्हणजे १७० फूट त्रिज्येची एक वर्तुळाकृती इमारत आहे. भारताच्या पार्लमेन्टची इमारत या मंदिराचीच प्रतिकृती आहे. मंदिराच्या भिंतीसलग ६४ खाने आहेत, त्यांत ६४ योगिनींच्या मूर्ती होत्या. वर्तुळाच्या मध्याला शंकराची पिंड आहे. मंदिराचे बांधकाम गुर्जर प्रतिहार शैलीमध्ये आहे.
  • चौसष्ट योगिनी मंदिर, उज्जैन :
  • चौसष्ट योगिनी मंदिर, हिरापूर (ओरिसा) : हे भुवनेश्वरपासून २० किलोमीटर अंतरावर आहे. ९व्या शतकात हे मंदिर ब्रह्म राजवटीतील हिरादेवीने बांधले. ६४ कोनाड्यात स्थापिलेल्या ६४ योगिनींच्या मूर्ती ग्रेनाईट दगडातून घडवल्या आहेत. मंदिराच्या मध्यभागी मनुष्याच्च्या डोक्यावर पाय देऊन उभी असलेली कालिकादेवीची मूर्ती आहे. बुद्धीच्या मनावरील विजयाचे हे प्रतीक समजले जाते. वालुकाश्मापासून तयार केलेले हे वर्तुळाकार मंदिर खास वैशिष्ट्यपूर्ण आहे. तिथेच एक मध्यवर्ती चौथरा असून त्याला चंडी मंडप असे म्हणतात.ओरिसा पर्यटनात हे ठिकाण अगदी न चुकता पाहावे असेच आहे.
  • चौसष्ट योगिनी मंदिर, राणीपूर झरिअल (ओरिसा) : या मंदिरात योगिनींच्या फक्त ६२ मूर्ती शिल्लक आहेत.
  • चौसठ योगिनी मंदिर, काशी. या मंदिरातील मूर्ती योगिनी घाटावरील एका भूमिगत जागेवर आहेत. मंदिरात जाण्यासाठी भुयारी मार्ग आहे. फक्त पुरोहितालाच मंदिरात जाण्याची परवानगी असल्याने या मूर्ती वर ठेवलेल्या छिद्रांमधूनच पहाव्या लागतात.



(अपूर्ण)