चौसष्ट योगिनी मंदिर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.

भारतामध्ये अनेक ठिकाणी चौसष्ट योगिनी मंदिरे आहेत. त्यांपैकी ही काही मंदिरे :

  • चौसष्ट योगिनी मंदिर, जबलपूर : जबलपूर येथील प्रसिद्ध भेडाघाटजवळ हे मंदिर आहे. येथेच नर्मदा नदी संगमरवराचे डोंगर फोडून मधून वाहते. या मंदिराचे बांधकाम इसवी सन १०००च्या आसपास कलचुरी वंशातील राजांनी केले होते. मंदिराच्या सभामंडपात राणी दुर्गावतीच्या भेटीसंबंधी एक शिलालेख आहे. या मंदिराच्या आवारातून राणी दुर्गावतीच्या महालाकडे जाणारे एक भुयार आहे, असे सांगण्यात येते.

मंदिरात शंकराची पिंडी आहे व आजूबाजूला ६४ योगिनींचा घेराव आहे. एकूणएक मूर्ती भंगलेल्या अवस्थेत आहेत.

  • चौसष्ट योगिनी मंदिर, खजुराहो : इ.स. ८७५ ते ९०० या काळात बांधलेले हे मंदिर अनेक बाबतीत अनोखे आहे. हे मंदिर खजुराहो येथील मंदिरांच्या पश्चिम गटात येते. या मंदिराला किंवा त्यांच्या भिंतींवर कोणतीही खास सजावट नाही. या मंदिरात ६४ योगिनींसाठी कोनाडे असून शिवाय एक मोठे महिसासुरमर्दिनीचे देऊळ आहे आणि बाकी दोन कोनाड्यांत मत्रिका ब्राह्मणी आणि महेश्वरीच्या मूर्ती आहेत. ६४ योगिनींपैकी काही मूर्तींचे पाय तोडले आहेत, बाकी बहुतेक मूर्ती जवळपास अखंड आहेत.
  • चौसष्ट योगिनी मंदिर, मोरेना : महाराजा देवपालाने ८व्या शतकात बांधलेले हे मंदिर म्हणजे १७० फूट त्रिज्येची एक वर्तुळाकृती इमारत आहे. भारताच्या पार्लमेन्टची इमारत या मंदिराचीच प्रतिकृती आहे. मंदिराच्या भिंतीसलग ६४ खाने आहेत, त्यांत ६४ योगिनींच्या मूर्ती होत्या. वर्तुळाच्या मध्याला शंकराची पिंड आहे. मंदिराचे बांधकाम गुर्जर प्रतिहार शैलीमध्ये आहे.
  • चौसष्ट योगिनी मंदिर, उज्जैन :
  • चौसष्ट योगिनी मंदिर, हिरापूर[१] (ओरिसा) : हे भुवनेश्वरपासून २० किलोमीटर अंतरावर आहे. ९व्या शतकात हे मंदिर ब्रह्म राजवटीतील हिरादेवीने बांधले. ६४ कोनाड्यात स्थापिलेल्या ६४ योगिनींच्या मूर्ती ग्रेनाईट दगडातून घडवल्या आहेत.
  • चौसष्ट योगिनी मंदिर, राणीपूर झरिअल (ओरिसा) : या मंदिरात योगिनींच्या फक्त ६२ मूर्ती शिल्लक आहेत.
  • चौसठ योगिनी मंदिर, काशी. हे मंदिर गंगा नदीच्या चौसष्ठी घाटावरील एका उंच जागेवर आहे. मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या चढून जावे लागते. ६४ पैकी सध्या फत ६०च मूर्ती शिल्लक आहेत. चौसष्टी घाट हा दशाश्वमेध घाटाच्या दक्षिणेला दिक्‌पतिया घाटाच्या जवळ आहे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ आडवाटेवरची वारसास्थळे : चौसष्ट योगिनी मंदिर – हिरापूर. Loksatta (Marathi भाषेत). 07-04-2018 रोजी पाहिले. हिरापूर येथील ६४ योगिनी मंदिर वर्तुळाकार आहे. हे मंदिर इ.स.च्या ९ व्या शतकात ब्रह्म राजवटीमधील हिरादेवीने बांधल्याचे सांगतात. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)


Unbalanced scales.svg
या लेख/विभागाच्या नि:पक्षपातीपणाबद्दल वाद आहे.
कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहा.