"पु.श्री. काळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: पुरुषोत्तम श्री. काळे हे एक मराठी चित्रकार आणि नाटकांचे नेपथ्यक...
(काही फरक नाही)

१४:११, २४ जुलै २०१६ ची आवृत्ती

पुरुषोत्तम श्री. काळे हे एक मराठी चित्रकार आणि नाटकांचे नेपथ्यकार होते. १९२१ साली ते ललितकलादर्श नाटक कंपनी (स्थापना - हुबळी, १ जानेवारी, १९०८) पडदे रंगवायले जे आले ते १९३७ साली ती कंपनी बंद होईपर्यंत तेथेच होते. मराठी लेखक व.पु. काळे यांचे हे वडील होत.

१९२२ सालीच त्यांनी बा.वि. वरेरेकर यांच्या ‘सत्तेचे गुलाम’ या नाटकाकाच्या रंगमंंच सजावटीत स्टेजच्या आतल्या पडद्यांऐवजी ‘बॉक्स सेट’ चा वापर केला हा अशा प्रकारचा वापर मराठी रंगभूमीवर पहिल्यांदाच झाला होता.

रंगमंचावर घोड्याची रेस आणि विहीर

श्री या नाटकामध्ये रंगमंचावर चलत्‌‍चित्रपटाच्या साहाय्याने घोड्यांची रेस दाखवण्याची करामत पु.श्री. काळेंची होती.

वधूपरीक्षा नाटकातील त्रिवेणी ही नायिका विहिरीत उडी घेते आणि पाण्याच्या आवाजाबरोबर पाणी वर उडण्याची योजना केली होती. त्यानंतर नायक धुरंधर विहिरीत उडी मारताना तसाच आवाज होऊन पाणी परत वर उडते. शेवटी ओले चिंब झालेले धुरंधर आणि त्रिवेणी पायर्‍या चढून विहिरीबाहेर येतात. रंगमंचावरील ही सर्व कमाल पु.श्री काळे यांच्या नेपथ्यामुळे शक्य झाली होती.

पु.श्री. काळे याचे नेपथ्य असलेली नाटकेे

  • जय जय गौरीशंकर
  • तुरुंगाच्या दारात (१९२३)
  • दुरितांचे तिमिर जावो
  • पडछाया
  • पंडितराज जगन्‍नाथ
  • परि तू जागा चुकलासी
  • मदनाची मंजिरी
  • राक्षसीमत्त्वाकांक्षा
  • वधूपरीक्षा
  • शहाशिवाजी
  • श्री
  • सत्तेचे गुलाम
  • संयुक्त मानापमान (१९२१)

चित्रपट

  • अमर भूपाळी (कलादिग्दर्शक)
  • झनक झनक पायल बाजे (सह कलादिग्दर्शक)
  • दो आँखेे बारा हाथ (कलादिग्दर्शक)

(अपूर्ण)