Jump to content

"नागेश भोंसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: नागेश भोसले हे एक मराठी नाट्य-चित्रपट अभिनेते आहेत. त्यांच्या खल...
खूणपताका: असभ्यता ?
(काही फरक नाही)

२३:२१, २२ जुलै २०१६ ची आवृत्ती

नागेश भोसले हे एक मराठी नाट्य-चित्रपट अभिनेते आहेत. त्यांच्या खलनायकांच्या भूमिकेबरोबरच अन्य भूमिकाही गाजल्या.

नागेश भोसले यांनी मराठी रंगभूमीपासून त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. सत्यदेव दुबे आणि विजया मेहता यांच्या तालमीत ते तयार झाले. ‘चंद्रलेखा’, ‘कलावैभव’ अशा काही संस्थांच्या नाटकांमध्ये त्यांनी काम केले. ‘कलावैभव’च्या ‘वन रूम किचन’ नाटकातली हणम्याची भूमिका चांगलीच गाजली. मराठी रंगभूमीबरोबरच हिंदी व इंग्लिश रंगभूमीवर आणि प्रायोगिक रंगभूमीवरही त्यांनी काम केले.

नागेश भोसले त्यानंतर चित्रपटांकडे आणि दूरचित्रवाणी मालिकांकडे वळले.

अजय सिन्हा यांच्या ‘चूल आणि मूल’ या एका माहितीपटात नागेश भोसले यांनी मुलीच्या वडिलांची भूमिका केली. लहान वयात मुलींचे लग्न लावू नका...वयात आल्यानंतरच लावा...अशा प्रकारचा संदेश त्या माहितीपटाद्वारे देण्यात आला होता. त्यानंतर अजय सिन्हा यांनी भोसलेंना त्यांच्या ‘हसरतें’ या हिंदी दूरचित्र वाहिनींवरील मालिकेत काम दिले. या मालिकेतील यशस्वी कामामुळे त्यांना लोकप्रियता मिळाली आणि हिंदी मालिकांबरोबरच हिंदी चित्रपटही मिळू लागले.

नागेश भोसले याछी भूमिका असलेली नाटके, चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिका (आणि त्यांतील पात्राचे नाव)

  • Cotton 56 Polyester 84 (इंग्रजी/hiMdee नाटक; गिरणी कामगार)
  • चिमणी पाखरं (मराठी दूरचित्रवाणी मालिका; पतंगराव कुराडे)
  • चल धरपकड (मराठी चित्रपट; )
  • चूल आणि मूल( माहितीपट; मुलीचे वडील)
  • छोटी गोष्ट डोंगराएवढी (मराठी चित्रपट; )
  • दामिनी (मराठी दूरचित्रवाणी मालिका; पक्या)
  • देवयानी (मराठी दूरचित्रवाणी मालिका; सर्जेराव पाटील अर्थात आबासाहेब)
  • नातीखेळ (मराठी चित्रपट; खाशाबा)
  • धग (मराठी चित्रपट; )
  • बनगरवाडी (मराठी चित्रपट; )
  • मनातलं ऊन (मराठी चित्रपट; )
  • वन रूम किचन (मराठी नाटक; हणम्या)
  • Sex Morality and Censorship (इंग्रजी नाटक
  • हसरतें (हिंदी दूरचित्रवाणी मालिका; किशन मुरारी)