Jump to content

"पुष्पा पागधरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(...संपादनासाठीसंदर्भ संहीता वापरली)
(चर्चा | योगदान)
ओळ ४: ओळ ४:


==मुंबईत आगमन==
==मुंबईत आगमन==
[[सातपाटी]]च्या शाळेतील एक शिक्षक भिकाजी नाईक यांच्या सेवानिवृत्तीच्या समारंभात पुष्पाताई ‘जो आवडतो सर्वाना तोचि आवडे देवाला’ हे गाणे गायल्या. कार्यक्रमाला मुंबईचे तत्कालीन महापौर [[बाबासाहेब वरळीकर]] आले होते. गाणे ऐकून ते खूश झाले. त्यांनी पुष्पाताईंना मुंबईला यायला सांगितले. वडिलांबरोबर त्या मुंबईला संगीतकार [[वसंत देसाई]] यांच्याकडे गेल्या. त्या वेळी आकाशवाणीवर [[बडे गुलाम अली खाँ]], अख्तरी बेगम (बेगम अख्तर) यांच्या ठुमरी, गझल लागत असत. त्या सतत ऐकत असल्याने पुष्पाताईंना पाठ झाल्या होत्या. देसाई यांना त्यांनी त्या म्हणून दाखविल्या. त्यांना गाणे आवडले. त्यांनी पुष्पा पागधरे यांची अब्दुल रहेमान खाँसाहेब यांची भेट घडवून दिली.
[[सातपाटी]]च्या शाळेतील एक शिक्षक भिकाजी नाईक यांच्या सेवानिवृत्तीच्या समारंभात पुष्पाताई ‘जो आवडतो सर्वाना तोचि आवडे देवाला’ हे गाणे गायल्या. कार्यक्रमाला मुंबईचे तत्कालीन महापौर [[बाबासाहेब वरळीकर]] आले होते. गाणे ऐकून ते खूश झाले. त्यांनी पुष्पाताईंना मुंबईला यायला सांगितले. वडिलांबरोबर त्या मुंबईला संगीतकार [[वसंत देसाई]] यांच्याकडे गेल्या. त्या वेळी आकाशवाणीवर [[बडे गुलाम अली खाँ]], अख्तरी बेगम (बेगम अख्तर) यांच्या ठुमरी, गझल लागत असत. त्या सतत ऐकत असल्याने पुष्पाताईंना पाठ झाल्या होत्या. देसाई यांना त्यांनी त्या म्हणून दाखविल्या. त्यांना गाणे आवडले. त्यांनी पुष्पा पागधरे यांची अब्दुल रहेमान खाँसाहेब यांची भेट घडवून दिली. त्यांच्याकडे त्यांनी गझल, ठुमरीचे धडे गिरविले

==सुगम संगीताचे शिक्षण==
पुषाताई या नंतर गायक [[आर.एन. पराडकर]] यांच्याकडून भजने व भक्तिगीते आणि [[गोविंद पोवळे]] यांच्याकडून अन्य प्रकारचे सुमग संगीत शिकल्या. सातपाटी गावात स्थानिक मंडळी नाटक करायची. त्यांनी बसविलेल्या ‘मंगळसूत्र’ या नाटकातील काही गाणी पुष्पाताईंनी संगीतबद्ध केली. या नाटकात चंद्रकांत पागधरे हे नायकाचे काम करत असत. त्यांनी मागणी घातल्यावर लग्नानंतर पुष्पा चामरे या पुष्पा पागधरे झाल्या.


== संदर्भ आणि नोंदी ==
== संदर्भ आणि नोंदी ==

२३:११, १८ जुलै २०१६ ची आवृत्ती

पुष्पा पागधरे (माहेरच्या पुष्पा चामरे) या एक मराठी गायिका आहेत.

पुष्पाताईंचा जन्म मुंबईत प्रभादेवी येथील महापालिका रुग्णालयात झाला.[] त्यांचे मूळ गाव सातपाटी. त्यांचे वडील जनार्दन आणि आई जानकी चामरे. सातपाटीलाच त्यांचे शालेय शिक्षण झाले. वडील भजने गायचे. मनोर, वाडा येथे त्यांच्या भजनी मंडळाचे कार्यक्रम होत असत. पाच-सात वर्षांच्या असलेल्या पुष्पाताई वडिलांबरोबर भजनाच्या कार्यक्रमातून असायच्या. गाण्यासाठी सुरुवातीला शाळेतील आर. डी. बेंद्रे या शिक्षकांचे मार्गदर्शन पुष्पाताईंना मिळाले. बेंद्रे सरांना संगीताचे व गाण्याचे चांगले ज्ञान होते. पुष्पाताईंच्या कोळी समाजातील मुलींना त्या काळात गाण्याचे रीतसर शिक्षण घेणे ही दूरची गोष्ट होती. पण वडिलांमुळे बेंद्रे सरांकडे त्या गाणे शिकायला जाऊ लागल्या. बेंद्रे सरांनी त्यांना आवाज कसा लावायचा ते शिकविल; त्यांच्याकडून कोणतेही शुल्क न घेता गाण्याचा रियाज करून घेतला.

मुंबईत आगमन

सातपाटीच्या शाळेतील एक शिक्षक भिकाजी नाईक यांच्या सेवानिवृत्तीच्या समारंभात पुष्पाताई ‘जो आवडतो सर्वाना तोचि आवडे देवाला’ हे गाणे गायल्या. कार्यक्रमाला मुंबईचे तत्कालीन महापौर बाबासाहेब वरळीकर आले होते. गाणे ऐकून ते खूश झाले. त्यांनी पुष्पाताईंना मुंबईला यायला सांगितले. वडिलांबरोबर त्या मुंबईला संगीतकार वसंत देसाई यांच्याकडे गेल्या. त्या वेळी आकाशवाणीवर बडे गुलाम अली खाँ, अख्तरी बेगम (बेगम अख्तर) यांच्या ठुमरी, गझल लागत असत. त्या सतत ऐकत असल्याने पुष्पाताईंना पाठ झाल्या होत्या. देसाई यांना त्यांनी त्या म्हणून दाखविल्या. त्यांना गाणे आवडले. त्यांनी पुष्पा पागधरे यांची अब्दुल रहेमान खाँसाहेब यांची भेट घडवून दिली. त्यांच्याकडे त्यांनी गझल, ठुमरीचे धडे गिरविले

सुगम संगीताचे शिक्षण

पुषाताई या नंतर गायक आर.एन. पराडकर यांच्याकडून भजने व भक्तिगीते आणि गोविंद पोवळे यांच्याकडून अन्य प्रकारचे सुमग संगीत शिकल्या. सातपाटी गावात स्थानिक मंडळी नाटक करायची. त्यांनी बसविलेल्या ‘मंगळसूत्र’ या नाटकातील काही गाणी पुष्पाताईंनी संगीतबद्ध केली. या नाटकात चंद्रकांत पागधरे हे नायकाचे काम करत असत. त्यांनी मागणी घातल्यावर लग्नानंतर पुष्पा चामरे या पुष्पा पागधरे झाल्या.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ ‘स्वर’ पुष्पा!. लोकसत्ता. १० जुलै २०१६. १८ जुलै २०१६ रोजी पाहिले.