Jump to content

"इरिना ग्लुश्कोव्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्रा. इरिना पेट्रोव्हना ग्लुश्कोव्हा (जन्म : ९ ऑगस्ट, इ.स. १९५२) या र...
(काही फरक नाही)

१७:०१, १८ जुलै २०१६ ची आवृत्ती

प्रा. इरिना पेट्रोव्हना ग्लुश्कोव्हा (जन्म : ९ ऑगस्ट, इ.स. १९५२) या रशियन विदुषीची १५ जुलै २०१६ रोजी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक दूत (ब्रँड अ‍ॅम्बेसिडर) म्हणून नियुक्ती करण्यात आली.

प्रा. ग्लुश्कोव्हा या मॉस्को येथील 'ओरिएन्टल रीसर्च इन्स्टिट्यूट'मध्ये मराठी भाषेच्या संशोधिका म्हणून काम करीत असून त्यांचा संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या रचनांचा अभ्यास आहे. १९७० पासून त्या पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेशी संबंधित आहेत. तेव्हापासून त्यांचे मराठी संस्कृतीशी ऋणानुबंध जोडले गेले आहेत.

महाराष्ट्रचे दैवत असणार्‍या विठ्ठलावर त्यांचे विशेष संशोधन आहे. प्रा. ग्लुश्कोव्हा यांनी महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेविषयी वाटणार्‍याया आस्थेमुळे आळंदी आणि देहू येथून निघणार्‍या पालखी परंपरेचा सखोल अभ्यास केला आहे. मराठ्यांचा इतिहास हाही त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. हा अभ्यास करण्याकरिता त्यांनी भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये मोडी लिपीचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.

भारत्विद्येच्या अभ्यासक प्रा. ग्लुश्कोव्हा या काही काळ मॉस्को विद्यापीठामध्ये हिंदीच्या प्राध्यापिका होत्या. संत तुकारामांच्या अभंगांचा अनुवाद करण्यासाठी १९८५ मध्ये त्या काही दिवस पुण्यात राहिल्या. या काळामध्ये त्या मराठी बोलण्यास शिकल्या. मॉरिशस येथील मराठी मंडळामध्ये १९८९ मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय रामायण परिषदेत त्यांनी मराठी भाषा आणि संस्कृतीचा गौरव केला होता.