Jump to content

"वसुंधरा पेंडसे नाईक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''वसुंधरा पेंडसे नाईक''' (निधन : १५ जुलै, इ.स. २०१६) या एक मराठी लेखिका आणि पत्रकार होत्या. [[अप्पा पेंडसे (पत्रकार)|पत्रकार अप्पा पेंडसे]] हे त्यांचे वडील होत. भारताच्या संघातर्फे आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळणारे क्रिकेटपटू [[सुधीर सखाराम नाईक]] हे त्यांचे पती होत.
'''वसुंधरा पेंडसे नाईक''' (जन्म :२७ जून, इ.स.१९४६; निधन : मुंबई, १५ जुलै, इ.स. २०१६) या एक मराठी लेखिका आणि पत्रकार होत्या. [[अप्पा पेंडसे (पत्रकार)|पत्रकार अप्पा पेंडसे]] हे त्यांचे वडील होत. भारताच्या संघातर्फे आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळणारे क्रिकेटपटू [[सुधीर सखाराम नाईक]] हे त्यांचे पती होत.

वसुंधरा पेंडसे यांनी शालान्त परीक्षेत संस्कृतमध्ये सर्वाधिक गुण मिळवून जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती पटकावली. १९६८ मध्ये एमए झाल्यानंतर त्या विल्सन महाविद्यालयात प्राध्यापक झाल्या. पाच वर्षांनंतर त्याचा कंटाळा आल्याने मग त्या ‘लोकसत्ता’मध्ये उपसंपादक म्हणून रुजू झाल्या. रविवारीय पुरवणीचे काम त्या बघत. साहित्याची आवड आणि त्यांच्या कामाचा वकूब पाहून १९८०मध्ये ‘लोकप्रभा’ या साप्ताहिकाची धुरा त्यांच्यावर सोपवण्यात आली. काही काळातच ‘लोकप्रभा’ हे मराठी परिवारामध्ये लोकप्रिय बनले. ‘शेवटचे पान’ हे ‘लोकप्रभा’तील त्यांचे संपादकीय त्या काळातील अभिजन वर्गात आवर्जून वाचले जात असे. विविध घटनांवर त्या काळी ‘लोकप्रभा’चे काढलेले विशेषांकही गाजले. नंतर पेंडसेबाईंनी अल्पकाळ दैनिक नवशक्तीच्या पुरवणीच्या संयोजनाची जबाबदारी स्वीकारली.

मुंबई दूरदर्शनवर संस्कृत भाषेचे सौंदर्य स्पष्ट करणारा वसुंधरा पेंडसे नाईक यांचा ’अमृतमंथन’ हा साप्ताहिक कार्यक्रम विशेष लोकप्रिय होता. हा कार्यक्रम इ.स. १९७९ ते १९९२ असा १३ वर्षे चालू होता.

== पदे ==
== पदे ==
ओळ १६: ओळ २१:
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:मराठी पत्रकार]]
[[वर्ग:मराठी पत्रकार]]
[[वर्ग:इ.स. १९४६ मधील जन्म]]
९९वर्ग:इ.स. २०१६ मधील मृत्यू]]

२२:२५, १६ जुलै २०१६ ची आवृत्ती

वसुंधरा पेंडसे नाईक (जन्म :२७ जून, इ.स.१९४६; निधन : मुंबई, १५ जुलै, इ.स. २०१६) या एक मराठी लेखिका आणि पत्रकार होत्या. पत्रकार अप्पा पेंडसे हे त्यांचे वडील होत. भारताच्या संघातर्फे आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळणारे क्रिकेटपटू सुधीर सखाराम नाईक हे त्यांचे पती होत.

वसुंधरा पेंडसे यांनी शालान्त परीक्षेत संस्कृतमध्ये सर्वाधिक गुण मिळवून जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती पटकावली. १९६८ मध्ये एमए झाल्यानंतर त्या विल्सन महाविद्यालयात प्राध्यापक झाल्या. पाच वर्षांनंतर त्याचा कंटाळा आल्याने मग त्या ‘लोकसत्ता’मध्ये उपसंपादक म्हणून रुजू झाल्या. रविवारीय पुरवणीचे काम त्या बघत. साहित्याची आवड आणि त्यांच्या कामाचा वकूब पाहून १९८०मध्ये ‘लोकप्रभा’ या साप्ताहिकाची धुरा त्यांच्यावर सोपवण्यात आली. काही काळातच ‘लोकप्रभा’ हे मराठी परिवारामध्ये लोकप्रिय बनले. ‘शेवटचे पान’ हे ‘लोकप्रभा’तील त्यांचे संपादकीय त्या काळातील अभिजन वर्गात आवर्जून वाचले जात असे. विविध घटनांवर त्या काळी ‘लोकप्रभा’चे काढलेले विशेषांकही गाजले. नंतर पेंडसेबाईंनी अल्पकाळ दैनिक नवशक्तीच्या पुरवणीच्या संयोजनाची जबाबदारी स्वीकारली.

मुंबई दूरदर्शनवर संस्कृत भाषेचे सौंदर्य स्पष्ट करणारा वसुंधरा पेंडसे नाईक यांचा ’अमृतमंथन’ हा साप्ताहिक कार्यक्रम विशेष लोकप्रिय होता. हा कार्यक्रम इ.स. १९७९ ते १९९२ असा १३ वर्षे चालू होता.

पदे

  • अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्षपद
  • मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्षपद
  • लोकप्रभा साप्‍ताहिक आणि अन्य काही नियतकालिकांचे संपादकत्व
  • (महाराष्ट्र) राज्य मराठी विकास संस्थेच्या आणि शिवाय मराठी भाषा अभ्यास केंद्राच्या त्या संचालक होत्या.
  • भारत निर्माण या संस्थेच्या त्या १९९९ सालच्या टॅलेन्टड लेडीज अॅवॉर्डच्या मानकरी होत्या.

पुस्तके

  • कुटुंबकथा भाग १, २
  • कौटिल्यीय अर्थशास्त्र परिचय
  • मूल्याधार ((मूल्यशिक्षणावरील लेखसंग्रह)

९९वर्ग:इ.स. २०१६ मधील मृत्यू]]