"यशवंतराव भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: यशवंतराव गणपतराव तथा वाय.जी. भोसले (जन्म : इ.स. १९२६. मृत्यू : ४ जुलै,... |
(काही फरक नाही)
|
०३:०९, १३ जुलै २०१६ ची आवृत्ती
यशवंतराव गणपतराव तथा वाय.जी. भोसले (जन्म : इ.स. १९२६. मृत्यू : ४ जुलै, इ.स.२०१६) हे एक मराठी चित्रपट व नाट्य सृष्टीतील दिग्दर्शक होते. त्यांच्या आयुष्यात त्यांनी ७०० हून अधिक हौशी नाटकांचे दिग्दर्शन केले.
भोसले हे मास्टर विनायक यांच्या कंपनीमध्ये सहायक म्हणून रुजू झाले. बाबुराव पेंढारकर यांच्या सूचनेनुसार ते रंगभूमीकडे वळले, आणि या क्षेत्रातील सैनिक बनून त्यांनी रंगभूमीची अखंडपणे प्रदीर्घ सेवा केली. रंगभूमीच्या माध्यमातून तरुण व हौशी कलावंताचे जीवन व कलाजीवन घडविण्यामध्ये त्यांनी संपूर्ण आयुष्य खर्च केले. या व्यवसायातून पसे मिळविणे यापेक्षा चित्रपट व नाटय़ क्षेत्रासाठी नवोदित कलाकारांमधून कसदार अभिनयाचे कलावंत घडविणे याचा त्यांनी ध्यास घेतला.
वाय.जी. भोसले यांनी ‘स्वप्नगंधा थिएटर’ नावाची संस्था स्थापन करून या संस्थेतर्फे शंकर खंडू पाटील यांच्या कांदबरीवर ‘भल्या घरची कामिनी’ हे नाटक रंगभूमीवर आणले. अनेक संस्थांची नाटके रंगभूमीवर आणत असताना केवळ नारळ व शाल एवढेच मानधन म्हणून ते स्वीकारत असत.