"मेंदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
ओळ १३: | ओळ १३: | ||
==मेंदीच्या झाडाचा आढळ आणि त्याची लागवड== |
==मेंदीच्या झाडाचा आढळ आणि त्याची लागवड== |
||
शास्त्रीयदृष्टय़ा मेंदीचा समावेश लिथ्रेसी (Lythranceae) कुळामध्ये होतो. |
|||
मेंदीचे झाड मूळचे आफ्रिकेतले असले तरी ऑस्ट्रेलिया, युरोप, कॅनडा, पाकिस्तान, इजिप्तपासून आखाती देशापर्यंत प्रसिद्ध आहे. वाळवंटी प्रदेशातले हे झाड भारतात महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान या भागांत आढळते. मेंदीची रोपे बियांपासून तसेच छाट कलमांद्वारेही तयार करतात. ती कोणत्याही प्रकारच्या जमिनीत वाढू शकतात. वाळवंटी प्रदेशातले झाड असले तरी ते समुद्रकिनारीही छान वाढते. कोरड्या, उष्ण किंवा थंड हवामानातही तग धरू शकते. मुळे बर्यापकी खोलवर जात असल्यामुळे पूर्ण वाढलेल्या झाडाला पाणीही फारसे घालावे लागत नाही. |

मेंदीची झाडे काटेरी असतात आणि गुरे या झाडाची पाने कडू असल्याने खात नाहीत, त्यासाठी ही कुंपणासाठी लावतात. मेंदीची झुडपे दीड ते तीन मीटर उंच वाढतात. पाने साधी समोरासमोर असतात. या झुडपांना पांढर्या रंगाची सुवासिक फुले येतात. |

==उपयोग== |
==उपयोग== |
१५:३१, ८ जुलै २०१६ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
मेंदी ही ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. स्त्रिया या वनस्पतीचा उपयोग फार पुरातन काळापासून सौंदर्यप्रसाधनासाठी करत आहेत. अनेक सणांमध्ये/धार्मिक कार्यक्रमात मेंदीची कलाकुसर हातावर काढण्यात येते. हिचा वापर करून पांढरे केसही रंगविले जातात. मेंदीचा लेप बनवताना त्यात लिंबू पिळतात, म्हणजे हातावरच्या नक्षीला छान लाल रंग येतो.
मेंदीची नावे:-
- हिंदी - मेहँदी
- इंग्रजी - Henna., Egyptian Private किंवा Turry Mignonette
- शास्त्रीय नाव - ‘लॉसोनिया अल्बा’ आणि ‘लॉसोनिया इनरमिस (Lawsonia inermis)
- कानडी - कोरांत, मदरंगा
- संस्कृत - चमेदिका, नखरंजक, रागांगी, यवनेष्टा
हात किंवा केस रंगवायला वापरण्यात येणारी मेंदीची पावडर ही मेंदीच्या पानांपासून बनविली जाते.
मेंदीच्या झाडाचा आढळ आणि त्याची लागवड
शास्त्रीयदृष्टय़ा मेंदीचा समावेश लिथ्रेसी (Lythranceae) कुळामध्ये होतो. मेंदीचे झाड मूळचे आफ्रिकेतले असले तरी ऑस्ट्रेलिया, युरोप, कॅनडा, पाकिस्तान, इजिप्तपासून आखाती देशापर्यंत प्रसिद्ध आहे. वाळवंटी प्रदेशातले हे झाड भारतात महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान या भागांत आढळते. मेंदीची रोपे बियांपासून तसेच छाट कलमांद्वारेही तयार करतात. ती कोणत्याही प्रकारच्या जमिनीत वाढू शकतात. वाळवंटी प्रदेशातले झाड असले तरी ते समुद्रकिनारीही छान वाढते. कोरड्या, उष्ण किंवा थंड हवामानातही तग धरू शकते. मुळे बर्यापकी खोलवर जात असल्यामुळे पूर्ण वाढलेल्या झाडाला पाणीही फारसे घालावे लागत नाही.
मेंदीची झाडे काटेरी असतात आणि गुरे या झाडाची पाने कडू असल्याने खात नाहीत, त्यासाठी ही कुंपणासाठी लावतात. मेंदीची झुडपे दीड ते तीन मीटर उंच वाढतात. पाने साधी समोरासमोर असतात. या झुडपांना पांढर्या रंगाची सुवासिक फुले येतात.
उपयोग
मेंदीचा वापर सौंदर्यप्रसाधनाबरोबरच वस्त्रोद्योगात कापड रंगविण्यासाठीही करतात. पिवळा, तांबडा, पगट, शेंदरी असे रंग विविध पदार्थाच्या मिश्रणाने तयार करून वापरले जातात. पानांमध्ये ‘लॉसोन’ हे रसायन असते ज्याला ‘हेन्नोटॅनिक आम्ल’ असेही म्हणतात. हेन्नोटॅनिक आम्लामुळे त्वचेला किंवा केसांना रंग येतो.
पानातील सेल्युलोजमधून रंगद्रव्ये विरघळून पसरण्यासाठी काही अवधी लागतो. त्यासाठी त्वचा चांगली रंगण्यासाठी मेंदीचा लेप ६ ते १२ तास व्यवस्थित राहणे आवश्यक असते. लॉसोनची प्रथिनांबरोबर रासायनिक अभिक्रिया घडून येते. त्यामुळे प्रथिने असणारे पदार्थ मेंदीमुळे चांगले व पक्के रंगतात. मानवी त्वचा, नखे आणि केसांमध्ये केराटिन नावाचे प्रथिन असते. याशिवाय चामड्याच्या वस्तू, रेशीम आणि लोकर रंगवण्यासाठीही मेंदीचा वापर होतो. आम्लाबरोबर मेंदीचा रंग आणखी गडद होतो म्हणूनच मेंदीचा वापर करताना लिंबू रस, चहा यांचा वापर केला जातो.
मेंदीच्या फुलांपासून हीना नावाचे अत्तर बनते. मेंदीची पेस्ट भाजले, कापले, खरचटले, कीटकदंश आदींनी त्वचेवर आलेल्या सुजेवर गुणकारी असते.