"प्रभाकर जठार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: डॉ. प्रभाकर जठार हे एक मराठी लेखक आहेत. संगीतक्षेत्र, नाटके आणि त्... |
(काही फरक नाही)
|
१५:५१, ४ जुलै २०१६ ची आवृत्ती
डॉ. प्रभाकर जठार हे एक मराठी लेखक आहेत. संगीतक्षेत्र, नाटके आणि त्यांतील कलावंत यावर त्यांचे बरेच लिखाण आहे.
मास्टर दीनानाथांच्या गायकीवर विलक्ष प्रेम करणारे प्रभाकर जठार यांनी दीनानाथांच्या आग्रहाखातर शंकरराव मोहिते यांजकडून संगीताचे प्रारंभिक शिक्षण घेतले. पुयाच्या मुक्कामाला आलेल्या दीनानाथांकडून गंडा बांधून त्यांनी पुढचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. दीनानाथांच्या निधनानंतरच हे शिक्षण थांबले, मात्र मिळालेल्या संगीतज्ञानावर ते सतत मनन-चिंतन करीत राहिले. जठारांनी आपली संगीत विद्या डॉ. वंदना रवींद्र घांगुर्डे ह्यांच्याकडे सोपविली.
प्रभाकर जठार यांची पुस्तके
- दिना दिसे मज दिनरजनी (दीनानाथ मंगेशकर या आपल्या गरूंचेे आत्मीयतेने काढलेले व्यक्तिचित्र आणि त्यांच्या गायकीचे निःपक्षपातीपणाने केलेले विश्लेषण)
- स्वरसौहार्द (संगीत क्षेत्रातील एकवीस विख्यात कलाकारांचा परिचय करून देण्यारे पुस्तक)