Jump to content

"सूर्यकांत जोग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सूर्यकांत जोग (जन्म : इ.स. १९२७;मृत्यू : १७ जून, इ.स. २०१६) हे इ.स. १९८५ त...
(काही फरक नाही)

००:१३, २३ जून २०१६ ची आवृत्ती

सूर्यकांत जोग (जन्म : इ.स. १९२७;मृत्यू : १७ जून, इ.स. २०१६) हे इ.स. १९८५ ते १९८७ या काळात महाराष्ट्राचे पोल‌िस महासंचालक होते.

जोग यांचे शालेय शिक्षण अमरावतीतील न्यू हायस्कूल येथे झाले. तर उच्च शिक्षण विदर्भ महाविद्यालयात झाले. पुढे ते आय.पी.एस. झाले आणि पोलीस अधीक्षक झाले. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत काम करून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला.

दिल्ली येथे विशेष पोलिस महानिरीक्षक असताना जोगांकडेे १९८२ सालच्या आश‌ियाड क्रीडा स्पर्धेची विशेष जबाबदारी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी दिली होती.

सूर्यकांत जोग हे अमृतसर येथील सुवर्ण मंद‌िरात झालेल्या ऑपरेशन ब्ल्यू स्टार ऑपरेशनमध्ये सहभागी होते.

जोग हे चांगले क्रिकेटपटू होते. मुंबई क्रिकेट संघाचे ते कर्णधार होते.