"सारंगखेडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: सारंगखेडा हे महाराष्ट्रातल्या नंदुरबार जिल्ह्यातील शहाडा तालु... |
(काही फरक नाही)
|
११:१९, १३ जून २०१६ ची आवृत्ती
सारंगखेडा हे महाराष्ट्रातल्या नंदुरबार जिल्ह्यातील शहाडा तालुक्यातील तापी नदीच्या किनार्यावरील एक गाव आहे.
सारंगखेडा हे तेथे १८व्या शतकापासून दरवर्षी भरणार्या घोड्यांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे. 'शोले' पासून 'बाजीराव-मस्तानी'पर्यंतच्या चित्रपटांसाठी घोडे आणि घोडदळ पुरवणारा आणि अवघ्या पंधरा दिवसांत दहा ते पंधरा कोटींची उलाढाल करणारा खानदेशातील हा घोडेबाजार आहे.
आधी राजस्थानातील पुष्करला, मग पंढरपूरला, तिथून मग सारंगखेड्याला हा बाजार येतो. इथून पुढे हा बाजार हलतो नांदेडच्या माळेगावला आणि तिथून पुन्हा उत्तर महाराष्ट्रातल्या शिरपुरात येतो.
सारंगखेड्याला एकमुखी दत्ताचे एक देऊळ आहे. दत्त जयंतीच्या निमित्ताने येथे यात्रा भरते. यात्रेदरम्यानच हा घोडेबाजार असतो. येथील घोडे बाजाराने पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश, तामिळनाडू येथील घोड्याच्या व्यापार्यांना चांगलेच आकर्षित केले आहे. याचे कारण या बाजारात पंजाब, मारवाड, काठियावाड, सिंध, गावठी अशा नस्लीचे १५००हून अधिक घोडे विक्रीसाठी येतात, व त्यांना चांगले दाम मिळते याची खात्री असते.. त्यामुळे दरवर्षी उत्तमोत्तम घोडे घेऊन येथील बाजारात व्यापारी हजेरी लावतात. एकेक अस्सल जातिवंत घोडा निरखून, पारखून घेतला जातो. ५० हजारांपासून २१ लाखांपर्यंत घोड्यांच्या किंमती असतात.
मारवाडी जातीचे घोडे उंच असतात; त्यांची उंची पाच ते पाच ते साडेपाच फूट असते. ते दिसायलाही आकर्षक असतात. त्यांचे कान उंच असून, त्यांची टोके एकमेकांशी जुळतात. काठेवाडी घोडे दिसायला तजेलदार असतात. त्यांचे कान कमी उंच असतात. पण चेहरा पसरट असतो. त्यामुळे ते भारदस्त दिसतात. तर पंजाबी घोडे अधिकतर शुभ्र आणि तेजस्वी असतात. त्यांच्या पांढर्या वर्णावर किंचित डाग आढळतो. ते शुभ्रवर्णी पंजाबी घोडे 'नुकरा' नावाने प्रसिद्ध आहेत. अश्वशौकिनांची या घोड्यांना विशेष मागणी असते.
सिनेसृष्टीतील कलाकारांपासून ते देशाच्या कोनाकोपऱ्यातून घोडेशौकीन खरेदीसाठी येत आहेत. लग्नकार्यात भाड्यानं देण्यासाठी आणि पर्यटनस्थळी सवारीचा व्यवसाय करण्यासाठी लागणारे घोडे या यात्रेत मोठ्या प्रमाणात आहेत. भव्य प्रासादापुढं बांधण्यासाठी, मनात येईल तेव्हा रपेट मारण्यासाठी घोडे खरेदी करणारे नवश्रीमंत, चित्रपट निर्माते, अभिनेतेही इथं खरेदीसाठी येताहेत.
रेससाठी वापरल्या जाणाऱ्या घोड्यांची जात वेगळीच असते. असे घोडे या यात्रेत क्वचितच पाहायला मिळतात.
या बाजाराचे संपूर्ण व्यवस्थापन शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीकडून केले जाते. वेगवेगळ्या राज्यातील व्यापारी येथील पटांगणात भव्य शामियाना ठोकतात. घोड्यावरून रपेट करण्यासाठी जागा उपलब्ध करण्यात आलेली असते. असतो.घोड्यांना दुखापत झाल्यास उपचारासाठी पशुसंवर्धन विभाग कार्यरत असतो.