"ना.शं. जमदग्नी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: ना.शं. ऊर्फ नानासाहेब जमदग्नी (जन्म : इ.स. १९१७) हे पुण्यातील ...
(काही फरक नाही)

१३:१२, १० जून २०१६ ची आवृत्ती

ना.शं. ऊर्फ नानासाहेब जमदग्नी (जन्म : इ.स. १९१७) हे पुण्यातील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या एमईएस कॉलेजचे प्राचार्य होते. मूळचे कुरुंदवाडचे असलेले जमदग्नी यांनी आपले शिक्षण निष्ठेने करून पुण्यातील एका शिक्षणसंस्थेच्या रोपाचे महावृक्षात रूपांतर केले.

महाराष्ट्र एज्युकेशन संस्थेत जमदग्नी यांचा कालखंड इ.स. १९४६ पासून ते १९७८ पर्यंत होता. इंग्रजी विषयाचे शिक्षक म्हणून ते प्रथम संस्थेच्याच भावे स्कूलमध्ये लागले. पुढे एमईएस कॉलेजात आधी प्राध्यापक म्हणून आणि पुढे इ.स. १९६२ ते १९७७ या काळात प्राचार्य म्हणून त्यांनी काम केले. १९७८ पर्यंत ते संस्थेचे कार्यवाह होते.

कॉलेजच्या रौप्यमहोत्सवी वर्षात उद्योगपती डॉ. एस.बी. गोगटे यांच्यासारख्या सहकार्यांची मदतीने जमदग्नींनी आबासाहेब गरवारे यांच्याकडून लाखो रुपयांची देणगी मिळवली; तेव्हापासून कॉलेजचे नाव ‘आबासाहेब गरवारे कॉलेज’ झाले.

आपल्या महाविद्यालयीन सेवाकाळात त्यांनी अनेक इंग्रजी ग्रंथांचे संपादन केले. गोंदवलेकर महाराज यांच्या १२ महिन्यांच्या ३६५ प्रश्नोत्तरांचे त्यांनी सरस इंग्रजीत भाषांतर केले.