ना.शं. जमदग्नी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ना.शं. ऊर्फ नानासाहेब जमदग्नी (१९१७ - ) हे पुण्यातील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या एमईएस कॉलेजचे प्राचार्य होते. मूळचे कुरुंदवाडचे असलेले जमदग्नी एमईएस कॉलेजचा विकास केला.

त्यांनी १९४६ पासून ते १९७८ पर्यंत या संस्थेत नोकरी केली. ते प्रथम भावे स्कूलमध्ये इंग्लिश विषयाचे शिक्षक म्हणून रुजू झाले. नंतर एमईएस कॉलेजात प्राध्यापक आणि नंतर १९६२ ते १९७७ या काळात प्राचार्य म्हणून त्यांनी काम केले. १९७८ पर्यंत ते संस्थेचे कार्यवाह होते.

कॉलेजच्या रौप्यमहोत्सवी वर्षात उद्योगपती डॉ. एस.बी. गोगटे यांच्यासारख्या सहकार्यांच्या मदतीने जमदग्नींनी आबासाहेब गरवारे यांच्याकडून लाखो रुपयांची देणगी मिळवली व महाविद्यालयाचे नाव आबासाहेब गरवारे कॉलेज केले.

त्यांनी गोंदवलेकर महाराज यांच्या १२ महिन्यांच्या ३६५ प्रश्नोत्तरांसह अनेक इंग्लिश ग्रंथांचे संपादन केले आहे.