Jump to content

"चंपारणचा लढा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १५: ओळ १५:
==भरमसाठ शेतसारा==
==भरमसाठ शेतसारा==
एखाद्या शेतकऱ्याने निळीऐवजी अन्नधान्याच्या गटातल्या पिकाचे उत्पन्न घेतले तर त्याला दंडात्मक कर भरावा लागत असे. पुढे युरोपात कृत्रिम रंगांचा शोध लागला आणि कारखान्यामध्ये त्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू झाल्यावर नैसर्गिक रंगांची मागणी जवळपास बंद झाली. ‘निळे सोने’ असलेले निळीचे पीक बिनकामाचे गवत बनले. आता या जमीनदारांचा उत्पन्नातील नफा ओसरू लागल्यावर ते बेसुमार कर आकारणीकडे वळले. त्यांची शेती कसणार्‍या शेतकर्‍यांना उत्पन्नाच्या तीन चतुर्थांश भाग भाडे म्हणून भरावा लागू लागला. निळीच्या उत्पादनामुळे जमिनीचा पोत गेला होता अशा स्थितीत दुसर्‍या नगदी किंवा अन्नधान्याच्या गटातल्या पिकांचे उत्पन्न घेणे शेतकर्‍यांना अवघड झाले आणि त्यातच हा इतका शेतसारा भरणे म्हणजे मरणप्राय संकटच होते. जमीनदारांनी या भागात दहशत बसवली होती. जमीनदारांनी स्वैरपणे ठरवलेला आणि ब्रिटिश सरकारने मान्य केलेला हा शेतसारा किंवा दंड देऊ न शकलेल्या वाटेकरी, शेतकर्‍यांची घरे जवळ असलेली संपत्ती, पशुधन आणि अगदी कपडेसुद्धा जप्त करण्यात आले. या सगळ्या त्रासामुळे शेतकर्‍यांची स्थिती दयनीय झाली. अनेकजण मृत्युमुखी पडले होते, तर काहीजणांना जमीनदार आणि त्यांच्या समर्थकांनी मारले होते.

==शेतकर्‍यांची आंदोलने आणि गांधींचा चंपारण लढा==
चंपारणातल्या शेतकर्‍यांनी यापूर्वी पिंपरामध्ये १९१४ आणि तुर्कौलिया इथं १९१६ मध्ये सक्तीच्या नीळ उत्पादनाविरोधात आवाज उठवला होता.

दोन्ही प्रसंगांत जमीनदाराने आणि ब्रिटिश पोलिसांनी त्यांची आंदोलने दडपून टाकली होती. चंपारणातील शेतकर्‍यांवर ओढवलेली ही स्थिती आणि जमीनदारांची पाशवी कृत्ये समजल्यावर महात्मा गांधी शेतकर्‍यांसाठी उभे राहिले.

आश्रमापासून [[मोतीहारी]]पर्यंत गांधींनी पदयात्रा काढली. यात त्यांच्यासोबत [[कस्तुरबा गांधी]] आणि आश्रमातील इतर सोबती, [[महादेवभाई देसाई|महादेव देसाई]], त्यांचे आफ्रिकेहून आलेले सी. एफ. अँड्य्रू आणि एच.एस. पोलॉक हे मित्र सहभागी झाले होते. [[मोतीहारी]]ला जाताना ते मध्ये वाटेत [[पाटणा|पाटण्याला]] थांबले. इथं उच्चभ्रू वर्गातील काही वकील आणि पदवीधर तरुण त्यांना येऊन मिळाले.

०६:०१, ३ जून २०१६ ची आवृत्ती

बिहारमधल्या चंपारण जिल्ह्यातल्या नीळ - उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी महात्मा गांधीजींनी १४ मे १९१७ रोजी फुंकलेला लढा चंपारण लढा म्हणून ओळ्खला जातो. गांधीजींनी या पहिल्याच लढ्यात यश मिळवलें आणि आपलं नेतृत्व देशपातळीवर प्रस्थापित केले.

गांधींची भारत भ्रमंती

महात्मा गांधी १९१५ मध्ये दक्षिण आफ्रिकेवरून भारतात परत आले. त्यांचे राजकीय गुरू, गोपाळकृष्ण गोखले यांना शब्द दिल्याप्रमाणे ते राजकारणापासून दूर राहिले आणि हा काळ त्यांनी भारत समजून घेण्याासाठी वर्षभर देशभ्रमंती केली. नंतर अहमदाबादला आल्यावर ते साबरमती नदीकाठी स्मशानभूमी आणि तुरुंगाच्या मधल्या भागात असलेल्या आश्रमात रहायला गेले.

चंपारणच्या लढ्याचा बेत

एकदा बिहारमधल्या चंपारण भागातील मोतीहारी येथील नीळ उत्पादक आणि सावकार राज कुमार शुक्‍ला महात्मा गांधींना भेटायला आले. त्यांनी चंपारणातल्या नीळ उत्पादकांवर ओढवलेली परिस्थिती गांधींना सांगितली आणि तेथेच चंपारण सत्याग्रहाचा बेत ठरला.

निळीच्या पिकाची सक्ती

कापड गिरण्यांच्या व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात म्हणजे शेकडो टनांमध्ये रंगांची गरज भासत असे. चंपारणातील बहुतांश जमीनदार हे ब्रिटिश होते. या जमीनदारांनी मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या निळीची लागवड करून नफा कमवण्याचा मार्ग शोधला. निळीची शेती करून नीळ इंग्लंडला पाठवून खूप नफा कमावता येऊ शकतो, हे जमीनदारांच्या लक्षात आल्यावर त्यांनी शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांना इतर पिके सोडून त्याकाळी नगदी पिकांमधील सर्वात जास्त उत्पन्‍न देणार्‍या निळीचे उत्पादन घेण्याची सक्ती केली.

अन्‍नधान्याची टंचाई

निळीच्या पिकाला खूप पाणी लागे, शिवाय जमिनीतली मूलद्रव्ये जास्त शोषली जात असल्याने जमिनीची सुपीकता नंतर कमी होई. महत्त्वाचे म्हणजे, निळीच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांच्या त्याचे कुटुंब जगवण्यासाठी लागणाऱ्या अन्नधान्याची पिके घेण्यास मज्जाव करण्यात आला होता. जबरदस्तीने करायला लावलेल्या निळीच्या लागवडीने त्या भागात अन्नधान्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. अनेकांना उपासमारीला तोंड द्यावे लागले. त्यातून अनेकांचा मृत्यूही ओढवला.

भरमसाठ शेतसारा

एखाद्या शेतकऱ्याने निळीऐवजी अन्नधान्याच्या गटातल्या पिकाचे उत्पन्न घेतले तर त्याला दंडात्मक कर भरावा लागत असे. पुढे युरोपात कृत्रिम रंगांचा शोध लागला आणि कारखान्यामध्ये त्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू झाल्यावर नैसर्गिक रंगांची मागणी जवळपास बंद झाली. ‘निळे सोने’ असलेले निळीचे पीक बिनकामाचे गवत बनले. आता या जमीनदारांचा उत्पन्नातील नफा ओसरू लागल्यावर ते बेसुमार कर आकारणीकडे वळले. त्यांची शेती कसणार्‍या शेतकर्‍यांना उत्पन्नाच्या तीन चतुर्थांश भाग भाडे म्हणून भरावा लागू लागला. निळीच्या उत्पादनामुळे जमिनीचा पोत गेला होता अशा स्थितीत दुसर्‍या नगदी किंवा अन्नधान्याच्या गटातल्या पिकांचे उत्पन्न घेणे शेतकर्‍यांना अवघड झाले आणि त्यातच हा इतका शेतसारा भरणे म्हणजे मरणप्राय संकटच होते. जमीनदारांनी या भागात दहशत बसवली होती. जमीनदारांनी स्वैरपणे ठरवलेला आणि ब्रिटिश सरकारने मान्य केलेला हा शेतसारा किंवा दंड देऊ न शकलेल्या वाटेकरी, शेतकर्‍यांची घरे जवळ असलेली संपत्ती, पशुधन आणि अगदी कपडेसुद्धा जप्त करण्यात आले. या सगळ्या त्रासामुळे शेतकर्‍यांची स्थिती दयनीय झाली. अनेकजण मृत्युमुखी पडले होते, तर काहीजणांना जमीनदार आणि त्यांच्या समर्थकांनी मारले होते.

शेतकर्‍यांची आंदोलने आणि गांधींचा चंपारण लढा

चंपारणातल्या शेतकर्‍यांनी यापूर्वी पिंपरामध्ये १९१४ आणि तुर्कौलिया इथं १९१६ मध्ये सक्तीच्या नीळ उत्पादनाविरोधात आवाज उठवला होता.

दोन्ही प्रसंगांत जमीनदाराने आणि ब्रिटिश पोलिसांनी त्यांची आंदोलने दडपून टाकली होती. चंपारणातील शेतकर्‍यांवर ओढवलेली ही स्थिती आणि जमीनदारांची पाशवी कृत्ये समजल्यावर महात्मा गांधी शेतकर्‍यांसाठी उभे राहिले.

आश्रमापासून मोतीहारीपर्यंत गांधींनी पदयात्रा काढली. यात त्यांच्यासोबत कस्तुरबा गांधी आणि आश्रमातील इतर सोबती, महादेव देसाई, त्यांचे आफ्रिकेहून आलेले सी. एफ. अँड्य्रू आणि एच.एस. पोलॉक हे मित्र सहभागी झाले होते. मोतीहारीला जाताना ते मध्ये वाटेत पाटण्याला थांबले. इथं उच्चभ्रू वर्गातील काही वकील आणि पदवीधर तरुण त्यांना येऊन मिळाले.

(अपूर्ण)