Jump to content

"चंपारणचा लढा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: बिहारमधल्या चंपारण जिल्ह्यातल्या नीळ - उत्पादक शेतकऱ्यांच्या न...
(काही फरक नाही)

०५:२७, ३ जून २०१६ ची आवृत्ती

बिहारमधल्या चंपारण जिल्ह्यातल्या नीळ - उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी महात्मा गांधीजींनी १४ मे १९१७ रोजी फुंकलेला लढा चंपारण लढा म्हणून ओळ्खला जातो. गांधीजींनी या पहिल्याच लढ्यात यश मिळवलें आणि आपलं नेतृत्व देशपातळीवर प्रस्थापित केले.

गांधींची भारत भ्रमंती

महात्मा गांधी १९१५ मध्ये दक्षिण आफ्रिकेवरून भारतात परत आले. त्यांचे राजकीय गुरू, गोपाळकृष्ण गोखले यांना शब्द दिल्याप्रमाणे ते राजकारणापासून दूर राहिले आणि हा काळ त्यांनी भारत समजून घेण्याासाठी वर्षभर देशभ्रमंती केली. नंत्र अहमदाबादला आल्यावर ते साबरमती नदीकाठी स्मशानभूमी आणि तुरुंगाच्या मध्ये असलेल्या आश्रमात रहायला गेले.

चंपरणच्या लढ्याचा बेत

एकदा बिहारमधल्या चंपारण भागातील मोतीहारी येथील नीळ उत्पादक आणि सावकार राज कुमार शुक्‍ला बापूंना भेटायला आले. गांधींना भेटून त्यांनी चंपारणातल्या नीळ उत्पादकांवर ओढवलेली परिस्थिती सांगितली आणि तेथेच चंपारण सत्याग्रहाचा बेत ठरला.

निळीच्या पिकाची सक्ती

कापड गिरण्यांच्या व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात म्हणजे शेकडो टनांमध्ये रंगांची गरज भासत असे. चंपारणातील बहुतांश जमीनदार हे ब्रिटिश होते. या जमीनदारांनी मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या निळीची लागवड करून नफा कमवण्याचा मार्ग शोधला. या जमीनदारांची जमीन कसणारे शेतकरी नगदी आणि अन्नधान्याची गरज भागणाऱ्या पिकांचे उत्पादन घेत असत. निळीची शेती करून नीळ इंग्लंडला पाठवून त्यातून खूप नफा कमावता येऊ शकतो, हे जमीनदारांच्या लक्षात आल्यावर त्यांनी या शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांना इतर पिके सोडून त्याकाळी नगदी पिकांमधील सर्वात जास्त उत्पन्‍न देणार्‍या निळीचे उत्पादन घेण्याची सक्ती केली.


(अपूर्ण)