"एम.ओ.पी. अय्यंगार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: प्रा.. मंड्यम ओसूरी पार्थसारथी अय्यंगार (जन्म : गिप्लिकन-तमिळनाडू... |
(काही फरक नाही)
|
११:१६, २१ मे २०१६ ची आवृत्ती
प्रा.. मंड्यम ओसूरी पार्थसारथी अय्यंगार (जन्म : गिप्लिकन-तमिळनाडू, १५ डिसेंबर इ.स. १८८६; मृत्यू : १९६३) हे एक भारतीय शैवाल-वैज्ञानिक (Phycologist) होते.
एम.ओ.पी. अय्यंगार यांनी वनस्पतिशास्त्रात शैवाल हा प्रमुख विषय घेऊन एम.ए.ची पदवी मिळवली आणि लगेच सरकारी संग्रहालयात वनस्पतिशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून काम पत्करले. त्यानंतर ते मद्रास येथील अय्यंगार शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्राकृतिक विज्ञान या विभागाचे प्रमुख झाले. पुढील शिक्षणासाठी ते लंडनला गेले आणि तेथे त्यांनी १९३२ साली प्रो. फ्रिश (Fritsch) यांच्या मार्गदर्शनाखाली लंडन विद्यापीठाची पीएच.डी. प्राप्त केली.
भारतात परतल्यावर त्यांनी दक्षिण भारतातील गोड्या आणि खार्या पाण्यातील शैवालांचा अभ्यास केला. त्यांनी आणि त्यांच्या बालकृष्णन, देसिकाचारी, सुब्रमण्यम या विद्यार्थ्यांनी शैवालाच्या अनेक नवीन प्रजाती शोधून काढल्या. हे शैवालविश्वात मोठे कार्य समजले जाते. म्हणूनच प्रा. अयंगार यांना फॉयकॉलॉजी विषयातील भारतातील पितामह म्हटले जाते. त्यांच्यामुळेच मद्रास विद्यापीठ हे भारतातील शैवाल विज्ञानाचे अग्रगण्य केंद्र बनले.
डॅनिश शैवालतज्ज्ञ डॉ. बोर्जेसेन्स यांच्याबरोबर त्यांनी भारताच्या किनार्यालगतच्या शैवालांचा अभ्यास केला. त्यांचे हे कार्य त्या क्षेत्रातील अग्रणी स्वरूपाचे आणि महत्त्वाचे गणले जाते.
सन्मान
- अमेरिकन असोसिएशन फॉर अॅडव्हान्सेस इन सायन्सचे फेलो
- आंतरराष्ट्रीय फायकोलॉजिकल सोसायटीचे अध्यक्षपद
- इंडियन बॉटनिकल सोसायटीच्या बिरबल सहानी पदकाचे मानकरी
- इंडियन बॉटनिकल सोसायटीच्या पत्रिकेचे संपादकत्व
- १९२७ साली झालेल्या इंडियन सायन्स कॉग्रेसच्या वनस्पतिशास्त्र विभागाचे अध्यक्षपद