Jump to content

"राम पुनियानी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: धर्मनिरपेक्षवादी कार्यकर्ते - लेखक प्रा. राम पुनियानी हे इ.स. २००...
(काही फरक नाही)

०४:५८, १८ मे २०१६ ची आवृत्ती

धर्मनिरपेक्षवादी कार्यकर्ते - लेखक प्रा. राम पुनियानी हे इ.स. २००० सालापासून भारतात धर्मनिरपेक्षवादी विचारांची प्रभावी मांडणी करीत आहेत. धार्मिक अल्पसंख्याकांवर झालेल्या हिंसात्मक हल्ल्याच्या चौकशी समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. जातीयवादी हिंसात्मक राजकारणाविषयी सातत्याने विचारांची मांडणी करणाऱ्या पुनियानी यांच्यावर गांधीवादी विचारांचा प्रभाव आहे. संघाच्या हुकुमशाही विचारांवर त्यांनी सडेतोड विचार मांडले आहेत. इंदिरा गांधी नॅशनल इंटिग्रेशन अ‍ॅवॉर्ड आणि नॅशनल कम्युनल हार्मनी अ‍ॅवॉर्ड या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.

त्यांची पुण्यात २१ आणि २२ मे २०१६ रोजी होणार्‍या १४ व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

१४व्या विद्रोही साहित्य संमेलनातील परिसंवादांचे विषय :

  • असहिष्णू साहित्य संस्कृतीचा भूतकाळ आणि आजचे वास्तव
  • भारतीय राष्ट्रवादाचा पाया - बौद्ध तत्त्वज्ञान
  • कृषी संस्कृती उद्ध्वस्त होत आहे
  • समरसता, सामाजिक समता आणि जातिअंत