"माक्स म्युलर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: फ्रेडरिक मॅक्समुल्लर (जन्म : जर्मनी, ६ डिसेंबर, इ.स. १८२३; मृत्यू : २... |
(काही फरक नाही)
|
१३:३८, ११ मे २०१६ ची आवृत्ती
फ्रेडरिक मॅक्समुल्लर (जन्म : जर्मनी, ६ डिसेंबर, इ.स. १८२३; मृत्यू : २८ ऑक्टोबर, इ.स. १९००) हे एक संस्कृत पंडित होते. वयाच्या १८व्या वर्षी त्यांनी संस्कृतमधील ‘हितोपदेश]]ा’चा इंग्रजी अनुवाद केला. त्यांचे शिक्षण जर्मनीच्या लिप्झिक विद्यापीठात झाले. तेथे ते अरबी, ग्रीक, फार्सी, लॅटिन आणि संस्कृत भाषा शिकले.
लिप्झिक, बर्लिन, तसेंच पॅरिसमधील अनेक विद्वानांनीं मॅक्समुल्लर यांना संस्कृत वाङ्मय व तत्संबंधीं तुलनात्मक भाषाशास्त्र, तुलनात्मक धर्म, भारतीय तत्त्वज्ञान इत्यादि विषयांचा अभ्यास करण्याबद्दल प्रोत्साहन दिलें. १८४८ सालीं मुल्लर के कायमसाठी ऑक्सफोर्डला आले.
इ.स. १८४९च्या दरम्यान मॅक्समुल्लर यांनी पूर्ण केलेली ऋग्वेदाची संशोधित व प्रमाणित देवनागरी प्रत छापण्यासाठी त्यांना मुद्रक मिळत नव्हता. ऑक्सफर्ड विद्यापीठात राहून मॅक्समुल्लर यांनी तीन वर्षांच्या खटपटीने हे हस्तलिखित तयार केले होते. देवनागरी लिपीत लिहिलेला मजकूर छापू शकेल असा एकही छापखाना त्यावेळी युरोपात नव्हता. मॅक्समुल्लर यांनी देवनागरी लिपीत अक्षरे लिहून त्यांचे खिळे तयार केले आणि प्रचंड मेहनतीने भारतीय ऋग्वेदाची पहिली प्रत ऑक्सफर्ड विद्यापीठाने प्रकाशित केली.
भारतीय संस्कृत ऋग्वेदाचे संशोधन करण्यापूर्वी मॅक्समुल्लर यांनी भारतीय वाङ्मय, संस्कृती, ऋषिमुनी, ऋचा, मंत्र यांचाच अभ्यास केला होता. उभ्या आयुष्यात कधीही भारतात न आलेल्या मॅक्समुल्लर यांची भारताची आणि संस्कृत वाङ्मयाची ओढ आणि आणि भारतीय संस्कृतीवरचे प्रेम केवळ अद्वितीय होते.
मॅक्समुल्लरने किंवा त्यांच्या देखरेखीखाली लिहिले गेलेले ग्रंथ
- The Sacred Books of the East (५०-खंडी ग्रंथ)