Jump to content

"डॅम इट अनू गोरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: ‘डॅम इट अनू गोरे’ हे प्रेमानंद गज्वी यांनी लिहिलेले एक मराठी ना...
(काही फरक नाही)

१४:१६, ८ मे २०१६ ची आवृत्ती

‘डॅम इट अनू गोरे’ हे प्रेमानंद गज्वी यांनी लिहिलेले एक मराठी नाटक आहे.

नाटकाचे कथानक

भारत सरकार सह्य़ाद्रीच्या खोऱ्यात ‘सह्य़ाद्री जल प्रकल्प’ या नावाचे एक धरण बांधू इच्छिते. हा प्रकल्प पूर्ण करण्याचं काम भारतीय कंपनी ‘गंगोत्री’ करणार असते, पण नेहमीप्रमाणेच माशी शिंकते आणि ते काम ‘कोलंबस वॉटर प्रोजेक्ट’ नावाच्या अमेरिकन कंपनीला दिले जाते. या धरणासोबतच भारतातील सर्व नद्या कालवे काढून एकमेकींना जोडल्या जाणार होत्या. असे केल्यामुळे एखाद्या भागात पाऊस पडला नाही तर या कालव्यातून त्या पाणीग्रस्त भागाला पाणी पोहोचवता येईल, अशी कल्पना होती.

धरणाचे भूमिपूजन ठरते आणि नेमके त्याच वेळी ‘जनराज्य गण परिषद’ हा चळवळ्या पक्ष अनू गोरेच्या नेतृत्वाखाली धरणग्रस्त आदिवासींच्या हितासाठीधरणाला विरोध सुरू करतो. प्रकरण न्यायालयात जाते, न्यायालय धरण बांधायला परवानगी देते. तरीही अनू गोरेचा विरोध, मोर्चे निदर्शनांच्या रूपात सुरूच असतो. धरणाची उंची वाढवू नये म्हणून ती पुन्हा पुन्हा न्यायालयात जाते, पण दर वेळी कोर्ट ‘कोलंबस वॉटर प्रोजेक्ट’ला धरणाची उंची वाढविण्याची परवानगी देते. दरम्यान विरोध करणाऱ्या अनू गोरेला अटक होते. खटला चालतो आणि न्यायालय अनू गोरेला धरणकामात अडथळा आणते म्हणून देशद्रोही ठरवते व तुरुंगामध्ये पाठवते.