"असलूब अहमद अन्सारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ २: | ओळ २: | ||
विल्यम ब्लेकच्या साहित्यावरील ‘अॅरोज ऑफ इंटलेक्ट’ हे अन्सारी यांचे पहिले समीक्षात्मक पुस्तक १९६५ मध्ये प्रसिद्ध झाले. साहित्य क्षेत्रात त्याची दखल घेतली गेल्याने अमेरिकेतही १९७० मध्ये ते पुनर्मुद्रित करण्यात आले. |

डॉ. अन्सारी हे ‘अलीगड क्रिटिकल मिसलेनी’ व ‘नक्द-ओ-नज्मर’ या नामांकित अभ्यासपत्रिकांचे संपादक होते. |
|||
आयुष्यभर केवळ लेखन आणि वाचन याकडेच लक्ष देणाऱ्या या साहित्यिकाची ४० हून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांपैकी काही ही : |
आयुष्यभर केवळ लेखन आणि वाचन याकडेच लक्ष देणाऱ्या या साहित्यिकाची ४० हून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांपैकी काही ही : |
||
* The Aligarh Critical Miscellany (संपादित) |
|||
* Arrows of intellect : A Study in William Blake's Gospel of the Imagination अॅरोज ऑफ इंटलेक्ट (इंग्रजी, समीक्षा, १९६५) - १९७८पयंत १५ आवृत्त्या |
* Arrows of intellect : A Study in William Blake's Gospel of the Imagination अॅरोज ऑफ इंटलेक्ट (इंग्रजी, समीक्षा, १९६५) - १९७८पयंत १५ आवृत्त्या |
||
* Atraf-i Rashid Ahmad Siddiqui (१९९८ साली पाकिस्तातून प्रकाशित). |
* Atraf-i Rashid Ahmad Siddiqui (१९९८ साली पाकिस्तातून प्रकाशित). |
११:२४, ८ मे २०१६ ची आवृत्ती
डॉ. असलूब अहमद अन्सारी (जन्म : सहारणपूर-उत्तर प्रदेश, इ.स.१९२५; मृत्यू : अलीगड, ४ मे, इ.स.२०१६) हे एक उर्दू कवी होते. त्यांनी इंग्रजी साहित्यातच एमए केले होते. अलीगड विद्यापीठात ते १९८५ साली निवृत्त होईपर्यंत इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. उर्दू ही मातृभाषा असल्याने उर्दू भाषेचाही त्यांचा व्यासंग होता. शेक्सपिअरसोबतच इंग्रजी कवी विल्यम ब्लेक त्यांच्या अभ्यासाचे विषय होते. शेक्सपिअर व ब्लेक यांच्यावर अधिकारवाणीने बोलणारा वक्ता म्हणून ते पाश्चात्त्य जगातही ओळखले जात. ब्रिटनमधील स्ट्रॅटफर्ड येथे भरणाऱ्या वर्ल्ड शेक्सपिअर कॉन्फरन्समध्ये ते अनेक वेळा सहभागी झाले होते. शेक्सपिअरवर वेळोवेळी लिहिलेले त्यांचे लेख साहित्याच्या अभ्यासकांना साहाय्यभूत ठरतात.
विल्यम ब्लेकच्या साहित्यावरील ‘अॅरोज ऑफ इंटलेक्ट’ हे अन्सारी यांचे पहिले समीक्षात्मक पुस्तक १९६५ मध्ये प्रसिद्ध झाले. साहित्य क्षेत्रात त्याची दखल घेतली गेल्याने अमेरिकेतही १९७० मध्ये ते पुनर्मुद्रित करण्यात आले.
डॉ. अन्सारी हे ‘अलीगड क्रिटिकल मिसलेनी’ व ‘नक्द-ओ-नज्मर’ या नामांकित अभ्यासपत्रिकांचे संपादक होते.
आयुष्यभर केवळ लेखन आणि वाचन याकडेच लक्ष देणाऱ्या या साहित्यिकाची ४० हून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांपैकी काही ही :
- Arrows of intellect : A Study in William Blake's Gospel of the Imagination अॅरोज ऑफ इंटलेक्ट (इंग्रजी, समीक्षा, १९६५) - १९७८पयंत १५ आवृत्त्या
- Atraf-i Rashid Ahmad Siddiqui (१९९८ साली पाकिस्तातून प्रकाशित).
- Essays on John Donne : A Quater Centenary Tribute (१९७४पर्यंत २ आवृत्त्या)
- Essays on John Milton : A Tercentenary Tribute (१९७६पर्यंत २ आवृत्त्या)
- Essays on Wordsworth; A Bi-centenary Tribute (१९७३पर्यंत २ आवृत्त्या)
- The Existential Dramaturgy of William Shakespeare : Character Created through Crisis (२०१० पर्यंत ४ आवृत्त्या)
- Iqbal : essays and studies (१९७८) - २००४ पर्यंत ४ आवृत्त्या
- इक्बाल की तेरह नज्में (१९७७). आजवर ५हून अधिक आवृत्त्या
- विल्यम ब्लेक्स मायनर प्रोफेसीज (२००१)
- Sir Syed Ahmad Khan : A Centenary Tribute (२००१पर्यंत २ आवृत्त्या)
डॉ.असलूब अन्सारींच्या सन्मानार्थ लिहिली गेलेली पुस्तके
- Essays on Shakespeare : in Honour of A.A. Ansari (लेखक - Festschrift, १९८६पर्यंत ३ आवृत्त्या)
पुरस्कार
- उत्तर प्रदेश उर्दू अकादमीचा पुरस्कार
- गालिब पुरस्कार
- दिल्ली उर्दू अकादमीचा बहादूरशहा जफर पुरस्कार (२००३)
- मीर तकी पुरस्कार
- दिल्लीच्या साहित्य अकादमीचा पुरस्कार
- गोरखपूर विद्यापीठाची डी.लिट. (२००६)
(अपूर्ण)
[[वर्ग:उर्दू कवी)