असलूब अहमद अन्सारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

डॉ. असलूब अहमद अन्सारी (इ.स. १९२५:सहारणपूर, उत्तर प्रदेश, भारत - ४ मे, इ.स. २०१६:अलीगढ, उत्तर प्रदेश) हे एक उर्दू कवी होते. त्यांनी इंग्लिश साहित्यात एमए केले होते. अलीगड विद्यापीठात ते १९८५ साली निवृत्त होईपर्यंत इंग्लिश विषयाचे प्राध्यापक होते. त्यांनी शेक्सपिअर आणि विल्यम ब्लेक यांच्या साहित्याचा त्यांनी अभ्यास केला. ब्रिटनमधील स्ट्रॅटफर्ड येथे भरणाऱ्या वर्ल्ड शेक्सपिअर कॉन्फरन्समध्ये ते अनेक वेळा सहभागी झाले होते. शेक्सपिअरवर वेळोवेळी लिहिलेले त्यांचे लेख साहित्याच्या अभ्यासकांना साहाय्यभूत ठरतात.

विल्यम ब्लेकच्या साहित्यावरील अ‍ॅरोज ऑफ इंटलेक्ट हे अन्सारी यांचे पहिले समीक्षात्मक पुस्तक १९६५ मध्ये प्रसिद्ध झाले. १९७० मध्ये ते अमेरिकेत पुनर्मुद्रित करण्यात आले.

डॉ. अन्सारी हे अलीगड क्रिटिकल मिसलेनीनक्द-ओ-नज्मर या नामांकित अभ्यासपत्रिकांचे संपादक होते.

यांचीची ४० हून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांपैकी काही :

  • Arrows of intellect : A Study in William Blake's Gospel of the Imagination अ‍ॅरोज ऑफ इंटलेक्ट (इंग्रजी, समीक्षा, १९६५) - १९७८पयंत १५ आवृत्त्या
  • Atraf-i Rashid Ahmad Siddiqui (१९९८ साली पाकिस्तातून प्रकाशित).
  • Essays on John Donne : A Quater Centenary Tribute (१९७४पर्यंत २ आवृत्त्या)
  • Essays on John Milton : A Tercentenary Tribute (१९७६पर्यंत २ आवृत्त्या)
  • Essays on Wordsworth; A Bi-centenary Tribute (१९७३पर्यंत २ आवृत्त्या)
  • The Existential Dramaturgy of William Shakespeare : Character Created through Crisis (२०१० पर्यंत ४ आवृत्त्या)
  • Iqbal : essays and studies (१९७८) - २००४ पर्यंत ४ आवृत्त्या
  • इक्बाल की तेरह नज्में (१९७७). आजवर ५हून अधिक आवृत्त्या
  • विल्यम ब्लेक्स मायनर प्रोफेसीज (२००१)
  • Sir Syed Ahmad Khan : A Centenary Tribute (२००१पर्यंत २ आवृत्त्या)

सन्मानार्थ लिहिली गेलेली पुस्तके[संपादन]

  • Essays on Shakespeare : in Honour of A.A. Ansari (लेखक - Festschrift, १९८६पर्यंत ३ आवृत्त्या)

पुरस्कार[संपादन]