"असलूब अहमद अन्सारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: डॉ. असलूब अहमद अन्सारी (जन्म : सहारणपूर-उत्तर प्रदेश, इ.स.१९२५; मृत्... |
(काही फरक नाही)
|
०६:१५, ८ मे २०१६ ची आवृत्ती
डॉ. असलूब अहमद अन्सारी (जन्म : सहारणपूर-उत्तर प्रदेश, इ.स.१९२५; मृत्यू : अलीगड, ४ मे, इ.स.२०१६) हे एक उर्दू कवी होते. त्यांनी इंग्रजी साहित्यातच एमए केले होते. अलीगड विद्यापीठात ते इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. उर्दू ही मातृभाषा असल्याने उर्दू भाषेचाही त्यांचा व्यासंग होता. शेक्सपिअरसोबतच इंग्रजी कवी विल्यम ब्लेक त्यांच्या अभ्यासाचे विषय होते. शेक्सपिअर व ब्लेक यांच्यावर अधिकारवाणीने बोलणारा वक्ता म्हणून ते पाश्चात्त्य जगातही ओळखले जात. ब्रिटनमधील स्ट्रॅटफर्ड येथे भरणाऱ्या वर्ल्ड शेक्सपिअर कॉन्फरन्समध्ये ते अनेक वेळा सहभागी झाले होते. शेक्सपिअरवर वेळोवेळी लिहिलेले त्यांचे लेख साहित्याच्या अभ्यासकांना साहाय्यभूत ठरतात.
विल्यम ब्लेकच्या साहित्यावरील ‘अॅरोज ऑफ इंटलेक्ट’ हे अन्सारी यांचे पहिले समीक्षात्मक पुस्तक १९६५ मध्ये प्रसिद्ध झाले. साहित्य क्षेत्रात त्याची दखल घेतली गेल्याने अमेरिकेतही १९७० मध्ये ते पुनर्मुद्रित करण्यात आले.
आयुष्यभर केवळ लेखन आणि वाचन याकडेच लक्ष देणाऱ्या या साहित्यिकाची ४० हून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांपैकी काही ही :
- अॅरोज ऑफ इंटलेक्ट (इंग्रजी, समीक्षा, १९६५)
- इक्बाल की तेरह नज्में (१९८०)
- विल्यम ब्लेक्स मायनर प्रोफेसीज (२००१), वगैरे.
पुरस्कार
- उत्तर प्रदेश उर्दू अकादमीचा पुरस्कार
- गालिब पुरस्कार
- बहादूरशहा जफर पुरस्कार
- मीर तकी पुरस्कार
- दिल्लीच्या साहित्य अकादमी पुरस्कार
- गोरखपूर विद्यापीठाने डी.लिट. (२००६)
(अपूर्ण)
[[वर्ग:उर्दू कवी)