Jump to content

"तेमसुला आओ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: तेमसुला आओ या नागालँड येथील कवयित्री आणि कादंबरीकार आहेत. त्या इ...
(काही फरक नाही)

००:२०, ५ मे २०१६ ची आवृत्ती

तेमसुला आओ या नागालँड येथील कवयित्री आणि कादंबरीकार आहेत. त्या इंग्रजीतून लेखन करतात.

तेमसुला आओ यांच्या कविता आणि अन्य साहित्याचे भाषांतर आसामी, बंगाली आणि हिंदी या भारतीय भाषांमध्ये झालेले आहे. तर काही साहित्याचा जर्मन व फ्रेंच भाषेत अनुवाद करण्यात आला आहे. याशिवाय अनेक कविता आणि लघुकथा नागालँड विद्यापीठ व देशभरातील महाविद्यालये आणि विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात आहेत. भारताच्या पूर्व-सीमा भागातून येणारा भारतीय इंग्रजी साहित्यातील महत्त्वाचा आवाज म्हणून आओ यांना मानाचे स्थान आहे.

आदिवासींचा प्रदेश असलेल्या नागालँडमधील सोळा आदिवासी जमातींना एकत्र आणण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली. सध्या (२०१५ साली) त्या कोहिमा येथील नागालँड राज्य महिला आयोगाच्या सन्माननीय अध्यक्षा आहेत.

तेमसुला आओ यांनी लिहिलेली पुस्तके

  • ऑन बिईंग अ नागा (नागा संस्कृतीवरील मानववंशशास्त्रीय संदर्भ ग्रंथ)
  • दीज हिल्स कॉल्ड होम (लघुकथासंग्रह)
  • बुक ऑफ सॉंग्स (काव्यसंग्रह)
  • लँबरल फॉर माय हेड (लघुकथासंग्रह)
  • सॉंग्स ऑफ मेनी मूड्‌स (काव्यसंग्रह)
  • सॉंग्स दॅट टेल (काव्यसंग्रह)
  • सॉंग्स दट ट्राय टू से (काव्यसंग्रह)
  • सॉंग्स फ्रॉम द अदर लाईफ (काव्यसंग्रह)
  • स्टोरीज फ्रॉम अ वॉर झोन (लघुकथासंग्रह)

पुरस्कार

  • यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार (२०१५)
  • नागालँड राज्यपालांचा साहित्यातील विशेष योगदानासाठीचा पुरस्कार
  • पद्मश्री
  • साहित्य अकादमी पुरस्कार