Jump to content

तेमसुला आओ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तेमसुला आओ या इंग्लिश साहित्यिक आहेत.

मूळच्या नागालॅंडच्या असलेल्या तेमसुला आओ यांच्या कविता आणि अन्य साहित्याचे भाषांतर आसामी, बंगाली आणि हिंदी या भारतीय भाषांमध्ये झालेले आहे. तर काही साहित्याचा जर्मनफ्रेंच भाषेत अनुवाद करण्यात आला आहे. याशिवाय अनेक कविता आणि लघुकथा नागालॅंड विद्यापीठ व देशभरातील महाविद्यालये आणि विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात आहेत.

आदिवासींचा प्रदेश असलेल्या नागालॅंडमधील सोळा आदिवासी जमातींना एकत्र आणण्यात त्यांची महत्त्वाचे योगदान केले. २०१५ साली त्या कोहिमा येथील नागालॅंड राज्य महिला आयोगाच्या सन्माननीय अध्यक्षा होत्या.

तेमसुला आओ यांनी लिहिलेली पुस्तके

[संपादन]
  • ऑन बिईंग अ नागा (नागा संस्कृतीवरील मानववंशशास्त्रीय संदर्भ ग्रंथ)
  • दीज हिल्स कॉल्ड होम (लघुकथासंग्रह)
  • बुक ऑफ सॉंग्स (काव्यसंग्रह)
  • लॅंबरल फॉर माय हेड (लघुकथासंग्रह)
  • सॉंग्स ऑफ मेनी मूड्‌स (काव्यसंग्रह)
  • सॉंग्स दॅट टेल (काव्यसंग्रह)
  • सॉंग्स दट ट्राय टू से (काव्यसंग्रह)
  • सॉंग्स फ्रॉम द अदर लाईफ (काव्यसंग्रह)
  • स्टोरीज फ्रॉम अ वॉर झोन (लघुकथासंग्रह)

पुरस्कार

[संपादन]