Jump to content

"रेने बोर्जेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: रेने मारिया बोर्जेस (Renee Borges) (जन्म : २५ फेब्रुवारी, इ.स. १९५९) या एक मरा...
(काही फरक नाही)

१६:२५, २४ एप्रिल २०१६ ची आवृत्ती

रेने मारिया बोर्जेस (Renee Borges) (जन्म : २५ फेब्रुवारी, इ.स. १९५९) या एक मराठी शास्त्रज्ञ आहेत. बंगलोरमधील भारतीय विज्ञान संस्थेतील पर्यावरण शास्त्राभ्यास अध्यासनाच्या त्या प्राध्यापक-अधीक्षक आहेत.

शिक्षण

रेनी बोर्जेस यांनी मुंबईच्या सेंट झेव्हियर्स कॉलेजमधून बारावी केल्यानंतर त्या मुंबईतीलच भारतीय विज्ञान संस्थेत दाखल झाल्या प्राणिशास्त्र आणि सूक्ष्मजीवशास्त्र हे विषय घेऊन त्या बी.एस्‌सी. आणि नंतर प्राणि-शरीरशास्त्र या विषयात एम.एस्‌सी. झाल्या. पुढे मायामी विद्यापीठातून त्यांनी शेकरू या प्राण्याच्या वैविध्यावर प्रबंध लिहून पीएच्‌डी मिळवली.

भीमाशंकरी शॆकरूवरील संशोधन

१९८५ च्या आसपास रेने बोर्जेस यांनी आपल्या संशोधनाची सुरुवातीची पाच वर्षे भीमाशंकरच्या अभयारण्यात व्यतीत केली होती. पीएच.डी.साठी निवडलेला प्रकल्प हा शेकरू (जायंट स्क्विरल) होता. त्यासाठी त्यांनी भारतात गोव्यातील नागोड आणि महाराष्ट्रातील भीमाशंकर या दोन ठिकाणांची निवड केली. या दोन्ही जंगलांमध्ये त्या एक एक वर्ष तळ ठोकून होत्या. त्यांच्या पीएच.डी.च्या अभ्यासाच्या काळातच भीमाशंकर अभयारण्य घोषित होण्याच्या हालचाली सुरू होत्या. ज्या शेकरूमुळे या अभयारण्याचे नाव गाजत होते, त्या शेकरूच्या संवर्धनासाठी ठोस उपाययोजना असणे गरजेचे होते. त्या वेळी रेने बोर्जेस यांनी पुढील पाच वर्षे भीमाशंकरचं जंगल पिंजून काढले. शेकरूचे अधिवास, त्याला लागणारं खाद्य पुरवणाऱ्या वनस्पती आणि त्या अनुषंगाने एकूणच भीमाशंकरची जैवविविधता याच्या र्सवकष नोंदी त्यांच्या अभ्यासातून झाल्या. आजही त्यांच्या अभ्यासाचा आधार भीमाशंकरच्या संवर्धनासाठी महत्त्वाचा मानला जातो.

त्यानंतरच्या काळात रेने बोर्जेस या बंगलोरच्या इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेस येथे पुढील संशोधनात व्यग्र झाल्या. ‘संवर्धन संशोधन’ ही शाखा तेव्हा आजच्या इतकी वेगाने वाढीस लागली नव्हती. त्यामुळे तसा मर्यादितच वाव होता. पण त्यांनी नेटाने या क्षेत्रात काम केले. नंतरच्या काळात पर्यावरणाशी निगडित अनेक संशोधन संस्था, भारत सरकारची पर्यावरण सल्लागार समिती अशी अनेक महत्त्वाची पदे त्यांनी भूषवली आहेत, आजदेखील भूषवत आहेत. तीन वर्षांपूर्वी जेव्हा पश्चिम घाटासाठी माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती नेमण्यात आली तेव्हा त्यामध्ये रेने बोर्जेस या एकमेव स्त्री-सदस्य होत्या.

मानसन्मान

  • रेनी बोर्जेस या गोवा येथील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था चालविणाऱ्या भारतीय विज्ञान अकादमीच्या संचालक मंडळाच्या सभासद आहेत.
  • पश्चिम घाट पर्यावरण संरक्षणासाठी स्थापन झालेल्या तज्ज्ञमंडळाच्या त्या सदस्या आहेत.
  • बंगलोरमधील भारतीय विज्ञान अकदमीच्या त्या फेलो आहेत.


{{DEFAULTSORT:बोर्जेस, रेने मारिया