Jump to content

"अधिकमास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ६१: ओळ ६१:
==गेल्या काही वर्षांतील अधिक मास==
==गेल्या काही वर्षांतील अधिक मास==
अधिक मास साधारणपणे दर तीन हिंदू वर्षांनी येतो. गेल्या काही ग्रेगरियन वर्षांतील व पुढील वर्षांतील अधिक मास : -
अधिक मास साधारणपणे दर तीन हिंदू वर्षांनी येतो. गेल्या काही ग्रेगरियन वर्षांतील व पुढील वर्षांतील अधिक मास : -
* १९४२ : ज्येष्ठ
* १९७४ भाद्रपद
* १९४५ : चैत्र
* १९७७ श्रावण
* १९४७ : श्रावण
* १९८० ज्येष्ठ
* १९५० : आषाढ
* १९८२ आश्विन
* १९५३ : वैशाख
* १९८५ श्रावण
* १९५५ : भाद्रपद
* १९८८ ज्येष्ठ
* १९५८ : श्रावण
* १९९१ वैशाख
* १९६१ : ज्येष्ठ
* १९९३ भाद्रपद
* १९६३ : कार्तिक
* १९९६ आषाढ़
* १९६६ : श्रावण
* १९९९ ज्येष्ठ
* १९६९ : आषाढ
* २००१ आश्विन
* १९७२ : वैशाख
* २००४ श्रावण
* १९७४ : भाद्रपद
* २००७ ज्येष्ठ
* १९७७ : श्रावण
* २०१० वैशाख
* १९८० : ज्येष्ठ
* २०१२ भाद्रपद
* १९८२ : आश्विन
* २०१५ आषाढ़
* १९८५ : श्रावण
* २०१८ ज्येष्ठ
* १९८८ : ज्येष्ठ
* २०२० आश्विन
* १९९१ : वैशाख
* २०२३ श्रावण
* १९९३ : भाद्रपद
* २०२६ ज्येष्ठ
* १९९६ : आषाढ़
* २०२९ चैत्र
* १९९९ : ज्येष्ठ
* २०३१ भाद्रपद
* २००१ : आश्विन
* २००४ : श्रावण
* २००७ : ज्येष्ठ
* २०१० : वैशाख
* २०१२ : भाद्रपद
* २०१५ : आषाढ़
* २०१८ : ज्येष्ठ
* २०२० : आश्विन
* २०२३ : श्रावण
* २०२६ : ज्येष्ठ
* २०२९ : चैत्र
* २०३१ : भाद्रपद


ज्या वर्षी श्रावण, भाद्रपद किंवा आश्विन महिन्यात अधिक मास येतो, त्या वर्षी [[चातुर्मास]] पाच महिन्यांचा असतो.
ज्या वर्षी श्रावण, भाद्रपद किंवा आश्विन महिन्यात अधिक मास येतो, त्या वर्षी [[चातुर्मास]] पाच महिन्यांचा असतो.

१५:३७, २० एप्रिल २०१६ ची आवृत्ती

सूर्य हा बारा राशींमधून प्रवास करत कालचक्राचे एक वर्ष पूर्ण करतो, त्यास ३६५ दिवस, ५ तास ४८ मिनिटे आणि साडे ४७ सेकंद लागतात. त्या काळात इंग्रजी(ग्रेगरी) कॅलेंडरवरचे बारा महिने पूर्ण होतात. मात्र, चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्यावर आधारलेले १२ हिंदू चांद्र मास(महिने) मात्र ३५४ दिवसातच म्हणजे ११ दिवस आधीच पूर्ण होतात. महाराष्ट्र. गुजरात, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातील चांद्र मास हे अमान्त (अमावस्येला संपणारे) असतात. उत्तरेला ते पौर्णिमान्त असतात. ज्या हिंदू मासात सूर्य एकाही राशीचे संक्रमण करीत नाही, (रास बदलत नाही) तो अधिक मास होय. सौर मास व चांद्र मास यांची सांगड घालण्यासाठी व या अकरा दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी पंचांगात अधिक मासाची व क्षय मासाची योजना करण्यात आलेली आहे. तीन वर्षांत होणारा ३३ दिवसांचा फरक क्षय मास वा अधिक मास टाकून, ही कालगणना सूर्याधारित सौर वर्षाशी जुळवून घेण्यात येते.

सूर्याधरित पंचांग पाळणाऱ्या आसाम, ओरिसा, केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांत अधिक महिना नसतो, तो फक्त चांद्र पंचांग वापरणाऱ्या आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजराथ आणि मध्य प्रदेशांसारख्या राज्यांत पाळला जातो.

चैत्रापासून आश्विन महिन्यांपर्यंतच्या कोणताही एक महिना अधिक मास म्हणून येऊ शकतो. कारण या महिन्यांतच सूर्याची गती मंद असते, व त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत जायला जास्त वेळ लागतो. क्वचित फाल्गुन महिन्यातही अधिक मास येतो, पण कार्तिक, मार्गशीर्ष, पौष आणि माघ या महिन्यांत अधिक मास कधीही येत नाही. त्या वर्षी एकाच नावाचे दोन चांद्रमहिने असतात, अगोदरचा अधिक महिना आणि नंतर लगेच येणारा महिना हा निजमास. एखादा विशिष्ट महिना अधिक मास आला की १९ वर्षांनंतर तोच महिना अधिक मास म्हणून येऊ शकतो.

केव्हाकेव्हा एकाच चांद्रमासात सूर्याच्या दोन संक्रांती येतात, म्हणजे सूर्य दोनदा रास बदलतो. अशा वेळी क्षयमास येतो.

स्पष्टीकरण

चांद्र वर्ष आणि सूर्य वर्ष यांच्यात मेळ घालण्याच्या उद्देशाने, पंचांगकर्त्यांनी कालगणनेसाठी जरी चंद्राचे भ्रमण प्रमाण मानले तरी महिन्यांची नावे मात्र सूर्याच्या भ्रमणाप्रमाणे ठेवली. म्हणजे मीनेत सूर्य असताना जेव्हा अमावास्या येऊन संपेल तेव्हा चैत्र महिन्याला सुरुवात होईल. मेषेत सूर्य असताना आलेल्या अमावास्येनंतर वैशाख सुरू होतो, वगैरे. एका महिन्यात सूर्य साधारणपणे एक महिना राहतो. साधारण १४ ते १७ तारखेला तो रास बदलतो. एका अमावास्येला सूर्य ज्या राशीत असतो, त्याच्या पुढच्या राशीत तो नंतरच्या अमावास्येला असतो. मात्र साधारण तीन वर्षांनी एक अशी अवस्था येते की एका अमावास्येला सूर्य ज्या राशीत असेल त्याच राशीत तो पुढच्या अमावस्येलाही असतो. नियमाप्रमाणे सूर्य अमावास्येला ज्या राशीत असेल त्या राशीप्रमाणे त्या महिन्याला नाव दिले जाते. पण दोन लागोपाठच्या अमावास्यांना सूर्य एकाच राशीत असेल तर, म्हणजे सूर्य रासच बदलत नसेल तर तर त्या दुसऱ्या अमावास्येनंतर सुरू होणाऱ्या महिन्याला नाव काय द्यायचे? अशा वेळी नाव 'रिपीट' करण्यात येते.

ज्या चांद्र महिन्यात सूर्याचे एका राशीतून पुढच्या राशीत संक्रमण होत नाही, तो महिना अधिक महिना मानतात आणि त्यानंतरचा निज महिना.

याच नियमाने ज्या चांद्र महिन्यात सूर्य दोन राशींनी पुढे सरकतो, त्या महिन्याला क्षयमास म्हणतात.

वेगवेगळी नावे

अधिक मासास, पुरुषोत्तम मास, मल मास, संसर्प मास असेही म्हणतात.

अधिक मासाबद्दल विशेष माहिती

दोन अधिक मासांत जास्तीत जास्त ३५ महिन्यांचे आणि कमीतकमी २७ महिन्यांचे अंतर असते. मार्गशीर्ष, पौष आणि माघ हे कधीही अधिक महिने असत नाहीत. अधिक मास जुलै ते ऑक्टोबर या महिन्यांतच येतो. त्या महिन्यांत सूर्याची गती किंचित मंद असते.

कोणता अधिक मास केव्हा येतो?

  • शकसंख्येतून १६६६ वजा करून येणाऱ्या उत्तराला १९ने भागावे. बाकी ३ उरल्यास चैत्र, ११ उरल्यास वैशाख, १० उरल्यास ज्येष्ठ, ८ उरल्यास अषाढ, १६ उरल्यास श्रावण, १३ किंवा ५ उरल्यास भाद्रपद आणि २ उरल्यास आश्विन महिना हा अधिकमास असतो, असे मकरंद ग्रंथात सांगितले आहे.
  • काहींच्या मते :- शकसंख्येतून ९२८ वजा करून मिळालेल्या उत्तराला १६ने भागितल्यावर जर ९ बाकी उरली तर चैत्र, शून्य उरली तर वैशाख, ११ उरली तर ज्येष्ठ, ६ उरली तर अाषाढ, ५ उरली तर श्रावण, १३ असेल तर भाद्रपद आणि २ उरली तर आश्विन महिना हा अधिकमास असतो.

इसवी सनाच्या २०व्या शतकातील अधिकमास (यादी अपूर्ण)

  • १३ जून १९४२ पासून एक महिना : ज्येष्ठ शके १८६४
  • १५ मार्च १९४५ पासून एक महिना : चैत्र शके १८६७
  • १९ जुलै १९४७ पासून एक महिना : श्रावण शके १८६९
  • १६ जून १९५० पासून एक महिना : आषाढ शके १८७२
  • १४ एप्रिल १९५३ पासून एक महिना : वैशाख शके १८७५
  • १८ ऑगस्ट १९५५ पासून एक महिना : भाद्रपद शके १८७७
  • १७ जुलै १९५८ पासून एक महिना : श्रावण शके १८८०
  • १५ मे १९६१ पासून एक महिना : ज्येष्ठ शके १८८३
  • १८ ऑक्टोबर १९६३ पासून एक महिना : कार्तिक शके १८८५
  • १९ जुलै १९६६ पासून एक महिना : श्रावण शके १८८८
  • १ जून १९६९ पासून एक महिना : आषाढ शके १८९१
  • १४ एप्रिल १९७२ पासून एक महिना : वैशाख शके १८९४
  • १८ ऑगस्ट १९७४ पासून एक महिना : भाद्रपद शके १८९६
  • १७ जुलै १९७७ पासून एक महिना : श्रावण शके १८९९
  • १५ मे १९८० पासून एक महिना : ज्येष्ठ शके १९०२
  • १८ सप्टेंबर १९८२ पासून एक महिना : अाश्विन शके १९०४
  • १८ जुलै १९८५ पासून एक महिना : श्रावण शके १९०७
  • १६ मे १९८८ पासून एक महिना : ज्येष्ठ शके १९१०
  • १५ एप्रिल १९९१ पासून एक महिना : वैशाख शके १८१३

इसवी सनाच्या २१व्या शतकातील अधिकमास (यादी अपूर्ण)

  • १८ सप्टेंबर २००१ पासून एक महिना : अाश्विन शके १९२३
  • १८ जुलै २००४ पासून एक महिना : श्रावण शके १९२६
  • १७ मे २००७ पासून एक महिना : ज्येष्ठ शके १९२९
  • १५ एप्रिल २०१० पासून एक महिना : वैशाख शके १९३२
  • १८ ऑगस्ट २०१२ पासून एक महिना : भाद्रपद शके १९३४
  • १८ जून २०१५ पासून एक महिना : आषाढ शके १९३७
  • १६ मे २०१८ पासून एक महिना : ज्येष्ठ शके १९४०
  • १८ सप्टेंबर २०२० पासून एक महिना : अश्विन शके १९४२
  • १८ जुलै २०२३ पासून एक महिना : श्रावण शके १९४५

गेल्या काही वर्षांतील अधिक मास

अधिक मास साधारणपणे दर तीन हिंदू वर्षांनी येतो. गेल्या काही ग्रेगरियन वर्षांतील व पुढील वर्षांतील अधिक मास : -

  • १९४२ : ज्येष्ठ
  • १९४५ : चैत्र
  • १९४७ : श्रावण
  • १९५० : आषाढ
  • १९५३ : वैशाख
  • १९५५ : भाद्रपद
  • १९५८ : श्रावण
  • १९६१ : ज्येष्ठ
  • १९६३ : कार्तिक
  • १९६६ : श्रावण
  • १९६९ : आषाढ
  • १९७२ : वैशाख
  • १९७४ : भाद्रपद
  • १९७७ : श्रावण
  • १९८० : ज्येष्ठ
  • १९८२ : आश्विन
  • १९८५ : श्रावण
  • १९८८ : ज्येष्ठ
  • १९९१ : वैशाख
  • १९९३ : भाद्रपद
  • १९९६ : आषाढ़
  • १९९९ : ज्येष्ठ
  • २००१ : आश्विन
  • २००४ : श्रावण
  • २००७ : ज्येष्ठ
  • २०१० : वैशाख
  • २०१२ : भाद्रपद
  • २०१५ : आषाढ़
  • २०१८ : ज्येष्ठ
  • २०२० : आश्विन
  • २०२३ : श्रावण
  • २०२६ : ज्येष्ठ
  • २०२९ : चैत्र
  • २०३१ : भाद्रपद

ज्या वर्षी श्रावण, भाद्रपद किंवा आश्विन महिन्यात अधिक मास येतो, त्या वर्षी चातुर्मास पाच महिन्यांचा असतो.


पौराणिक कथा

या मासात मंगल कार्ये, काम्य व्रते इत्यादींचा त्याग करतात. त्यामुळे या मासास इहलोकात अनेक निर्भत्सनांना सामोरे जावे लागले. त्यामुळे व्यथित होऊन तो मास वैकुंठात वि़्णूकडे आपले गाऱ्हाणे घेऊन गेला. विष्णूने त्यास गोकुळात कृष्णाकडे पाठविले. तो कृष्णास शरण गेला. कृष्णाने त्या मासाचे नाव बदलून 'पुरुषोत्तम मास' असे ठेविले. या मासात जे श्रद्धाभक्तियुक्त राहून उपासना, कर्मे, व्रते व दाने करतील त्यांना पुण्य मिळेल असेही त्यास वचन दिले.

हेही बघा

बाह्यदुवे