"अब्दुल अझीझ रायबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो ज ने लेख अब्दुल अझिझ रायबा वरुन अब्दुल अझीझ रायबा ला हलविला |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''ए.ए. रायबा''' तथा '''अब्दुल |
'''ए.ए. रायबा''' तथा '''अब्दुल अझीझ रायबा''' (जन्म : [[१० जुलै]], [[इ.स. १९२२]]:[[मुंबई]], [[महाराष्ट्र]], [[भारत]] - मृत्यू : नालासोपारा (मुंबई), १५ एप्रिल, इ.स. २०१६)) हे एक मराठी चित्रकार हॊते. |
||
ते मूळचे कोकणी असून त्यांचे वडील शिंपीकाम करीत असत. |
ते मूळचे कोकणी असून त्यांचे वडील शिंपीकाम करीत असत. रायबांचे बालपण मुंबई सेंट्रलच्या टेमकर स्ट्रीटवर कोकणी मुस्लिम कुटुंबात गेले. ते सुरुवातीला [[गुजराती]] शाळेत गेले आणि नंतर मुंबईच्या [[अंजुमन-इ-इस्लाम]]मध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले. तिथे रायबांनी [[उर्दू]]वर प्रभुत्व मिळवले. ते पाहून त्यांच्या शिक्षकांनी त्यांना लेखन करण्यास उद्युक्त केले. रायबांनी काही काव्यलेखनही केले व [[अल्लामा इक्बाल]] यांचे लिखाण इंग्लिशमध्ये भाषांतरित करायला सुरुवात केली. |
||
टेमकर स्ट्रीटवरली इमारत डळमळीत होऊन पडल्यावर रायबा कुटुंबीय नालासोपाऱ्याला गेले आणि रायबा केवळ प्रदर्शनांपुरतेच मुंबईत दिसू लागले. |
|||
{{बदल}} |
{{बदल}} |
||
ओळ ८: | ओळ १०: | ||
जे.जे.मध्ये रायबा १९४२ ते ४६ या काळात शिकले. तिथे चार्लस जेरार्ड व जगन्नाथ अहिवासी हे दोन शिक्षक त्यांना लाभले. जगन्नाथ अहिवासी हे भारतीय चित्रशैलीपरंपरेचे शिक्षण देत. रायबांनी, भारतीय लघुचित्रांची पद्धती, तंत्र व शैली अहिवासींकडूनच शिकून आत्मसात केली. तर तैलरंग, त्यांची हाताळणी जेरार्ड यांच्याकडून. या दोन्ही गोष्टींचे मिश्रण रायबांच्या चित्रशैलीत दिसून येते. |
जे.जे.मध्ये रायबा १९४२ ते ४६ या काळात शिकले. तिथे चार्लस जेरार्ड व जगन्नाथ अहिवासी हे दोन शिक्षक त्यांना लाभले. जगन्नाथ अहिवासी हे भारतीय चित्रशैलीपरंपरेचे शिक्षण देत. रायबांनी, भारतीय लघुचित्रांची पद्धती, तंत्र व शैली अहिवासींकडूनच शिकून आत्मसात केली. तर तैलरंग, त्यांची हाताळणी जेरार्ड यांच्याकडून. या दोन्ही गोष्टींचे मिश्रण रायबांच्या चित्रशैलीत दिसून येते. |
||
शिक्षण झाल्यानंतर रायबांनी टाइम्स ऑफ इंडियाच्या वॉल्टर लँगहॅमर यांच्याशी संपर्क साधला. लँगहॅमर यांच्या सांगण्यावरूनच ते काश्मीरला गेले. तेथे पाच वर्षें राहिले. या पाच वर्षांच्या कालावधीचा परिणाम म्हणून |
शिक्षण झाल्यानंतर रायबांनी टाइम्स ऑफ इंडियाच्या वॉल्टर लँगहॅमर यांच्याशी संपर्क साधला. वयाच्या पंचविशीत ‘प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रुप’ची त्यांना संगत लाभली. या चित्रकारसमूहातील रूडी व्हॉन लायडन आणि वॉल्टर लँगहॅमर यांच्या सांगण्यावरूनच ते काश्मीरला गेले. तेथे पाच वर्षें राहिले. या पाच वर्षांच्या कालावधीचा परिणाम म्हणून रायबांमधील कवी त्यांच्या चित्रांत कायमचा उतरला. |
||
मुंबईत आल्यावर उपजीविकचे साधन शोधताना रायबांनी चित्रकार [[एम.एफ. हुसेन]] यांच्या ओळखीने चित्रपट दिग्दर्शक [[के.आसिफ]] यांच्याकडे थोडे दिवस काम केले. नंतर हुसेन आरा यांच्यासोबत फर्निचर डिझाइनचेही काम केले. |
मुंबईत आल्यावर उपजीविकचे साधन शोधताना रायबांनी चित्रकार [[एम.एफ. हुसेन]] यांच्या ओळखीने चित्रपट दिग्दर्शक [[के.आसिफ]] यांच्याकडे थोडे दिवस काम केले. नंतर हुसेन आरा यांच्यासोबत फर्निचर डिझाइनचेही काम केले. |
||
जुनी मुंबई व आजूबाजूचा परिसर, त्यातील पोर्तुगीज इमारती, कोळीवाडे, त्यांचे रूप, समुद्र , जहाजे, कोळिणी, काश्मिरातील व्यक्ती, निसर्ग अशा अनेक गोष्टी रायबा |
जुनी मुंबई व आजूबाजूचा परिसर, त्यातील पोर्तुगीज इमारती, कोळीवाडे, त्यांचे रूप, समुद्र , जहाजे, कोळिणी, काश्मिरातील व्यक्ती, निसर्ग अशा अनेक गोष्टी रायबा चितारत. परंतु चित्रकलेचे मूलभूत धडे जिथे गिरवले ते नूतन कलामंदिर व विशेषेकरून तेथील थिऑसॉफीचे तत्त्वज्ञान यांचा रायबांच्या व्यक्तिमत्त्वावर जो प्रभाव पडला, तो कायमचा. त्यांच्या चित्रांतून तो जाणवल्याशिवाय रहात नाही. |
||
तागाच्या (तरटासारख्या जाड) कापडाला फेव्हिकॉल पातळ करून, त्यात टेक्श्चरव्हाइट पावडर मिसळून या मिश्रणाचे थर लावल्यास तागाचा शोषकपणा थोडा बुजतो, मग त्यावर तैलरंगांतही चित्रे करता येतात, हे तंत्र रायबांनी शोधले. एक सुकल्यावर दुसरा, असे १५-१६ थर लावून रायबांनी ‘तागाचा कॅनव्हास’ हे दृश्यवैशिष्टय़ सांभाळले. काश्मीर, पोर्तुगीज वसाहती, वसई, मुंबईचे कोळीवाडे अशा जनजीवनांतील स्वप्नवत् सृष्टी टिपणारे रायबा तंत्राचा सतत विचार करीत. १९८०च्या दशकात ते मुद्राचित्रण शिकले, त्यानंतर त्यांनी केलेली मुद्राचित्रे आजही नावाजली जातात. |
|||
==ए.ए. रायबा यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान== |
==ए.ए. रायबा यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान== |
||
* बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनांमध्ये रायबांना दोनदा रौप्यपदके (१९४७, १९५१) मिळाली, आणि काश्मीरहून परत आल्यानंतर सन १९५६ मध्ये त्यांना सुवर्णपदक मिळाले. |
|||
* दि बॉम्बे आर्ट सोसायटी'चा २०१५ सालचा |
* दि बॉम्बे आर्ट सोसायटी'चा २०१५ सालचा रूपधर' पुरस्कार |
||
* 'ललित कला अकादमी' या सांस्कृतिक व कलाक्षेत्रातील नामवंत संस्थेतर्फे इ.स. १९५६ साली केलेल्या नामनिर्देशनांत सर्वोत्कृष्ट १० भारतीय चित्रकारांमध्ये रायबांचा समावेश करण्यात आला होता. |
* 'ललित कला अकादमी' या सांस्कृतिक व कलाक्षेत्रातील नामवंत संस्थेतर्फे इ.स. १९५६ साली केलेल्या नामनिर्देशनांत सर्वोत्कृष्ट १० भारतीय चित्रकारांमध्ये रायबांचा समावेश करण्यात आला होता. |
||
ओळ २५: | ओळ ३०: | ||
[[वर्ग:मराठी चित्रकार]] |
[[वर्ग:मराठी चित्रकार]] |
||
[[वर्ग:इ.स. १९२२ मधील जन्म]] |
[[वर्ग:इ.स. १९२२ मधील जन्म]] |
||
[[वर्ग:इ.स. २०१६ मधील मृत्यू]] |
१६:५६, १९ एप्रिल २०१६ ची आवृत्ती
ए.ए. रायबा तथा अब्दुल अझीझ रायबा (जन्म : १० जुलै, इ.स. १९२२:मुंबई, महाराष्ट्र, भारत - मृत्यू : नालासोपारा (मुंबई), १५ एप्रिल, इ.स. २०१६)) हे एक मराठी चित्रकार हॊते.
ते मूळचे कोकणी असून त्यांचे वडील शिंपीकाम करीत असत. रायबांचे बालपण मुंबई सेंट्रलच्या टेमकर स्ट्रीटवर कोकणी मुस्लिम कुटुंबात गेले. ते सुरुवातीला गुजराती शाळेत गेले आणि नंतर मुंबईच्या अंजुमन-इ-इस्लाममध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले. तिथे रायबांनी उर्दूवर प्रभुत्व मिळवले. ते पाहून त्यांच्या शिक्षकांनी त्यांना लेखन करण्यास उद्युक्त केले. रायबांनी काही काव्यलेखनही केले व अल्लामा इक्बाल यांचे लिखाण इंग्लिशमध्ये भाषांतरित करायला सुरुवात केली.
टेमकर स्ट्रीटवरली इमारत डळमळीत होऊन पडल्यावर रायबा कुटुंबीय नालासोपाऱ्याला गेले आणि रायबा केवळ प्रदर्शनांपुरतेच मुंबईत दिसू लागले.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
रायबा उर्दूबरोबर अरेबिक कॅलिग्राफीही शिकले. त्यांची कॅलिग्राफी पाहूनच त्यांच्या एका शिक्षकाच्या लक्षात आलेकी, ते उत्तम चित्रे काढू शकतात. त्यांनी दंडवती मठ यांच्याशी त्यांची भेट घडवून आणली. दंडवती मठ यांनी श्री. राव यांच्यासह थिऑसॉफी सोसायटीच्या ब्लाव्हिटस्की लॉज मध्ये नूतन कलामंदिर स्थापन केले होते. ’नूतन कलामंदिरा'त शिकून, रायबा जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये आले.
जे.जे.मध्ये रायबा १९४२ ते ४६ या काळात शिकले. तिथे चार्लस जेरार्ड व जगन्नाथ अहिवासी हे दोन शिक्षक त्यांना लाभले. जगन्नाथ अहिवासी हे भारतीय चित्रशैलीपरंपरेचे शिक्षण देत. रायबांनी, भारतीय लघुचित्रांची पद्धती, तंत्र व शैली अहिवासींकडूनच शिकून आत्मसात केली. तर तैलरंग, त्यांची हाताळणी जेरार्ड यांच्याकडून. या दोन्ही गोष्टींचे मिश्रण रायबांच्या चित्रशैलीत दिसून येते.
शिक्षण झाल्यानंतर रायबांनी टाइम्स ऑफ इंडियाच्या वॉल्टर लँगहॅमर यांच्याशी संपर्क साधला. वयाच्या पंचविशीत ‘प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रुप’ची त्यांना संगत लाभली. या चित्रकारसमूहातील रूडी व्हॉन लायडन आणि वॉल्टर लँगहॅमर यांच्या सांगण्यावरूनच ते काश्मीरला गेले. तेथे पाच वर्षें राहिले. या पाच वर्षांच्या कालावधीचा परिणाम म्हणून रायबांमधील कवी त्यांच्या चित्रांत कायमचा उतरला.
मुंबईत आल्यावर उपजीविकचे साधन शोधताना रायबांनी चित्रकार एम.एफ. हुसेन यांच्या ओळखीने चित्रपट दिग्दर्शक के.आसिफ यांच्याकडे थोडे दिवस काम केले. नंतर हुसेन आरा यांच्यासोबत फर्निचर डिझाइनचेही काम केले.
जुनी मुंबई व आजूबाजूचा परिसर, त्यातील पोर्तुगीज इमारती, कोळीवाडे, त्यांचे रूप, समुद्र , जहाजे, कोळिणी, काश्मिरातील व्यक्ती, निसर्ग अशा अनेक गोष्टी रायबा चितारत. परंतु चित्रकलेचे मूलभूत धडे जिथे गिरवले ते नूतन कलामंदिर व विशेषेकरून तेथील थिऑसॉफीचे तत्त्वज्ञान यांचा रायबांच्या व्यक्तिमत्त्वावर जो प्रभाव पडला, तो कायमचा. त्यांच्या चित्रांतून तो जाणवल्याशिवाय रहात नाही.
तागाच्या (तरटासारख्या जाड) कापडाला फेव्हिकॉल पातळ करून, त्यात टेक्श्चरव्हाइट पावडर मिसळून या मिश्रणाचे थर लावल्यास तागाचा शोषकपणा थोडा बुजतो, मग त्यावर तैलरंगांतही चित्रे करता येतात, हे तंत्र रायबांनी शोधले. एक सुकल्यावर दुसरा, असे १५-१६ थर लावून रायबांनी ‘तागाचा कॅनव्हास’ हे दृश्यवैशिष्टय़ सांभाळले. काश्मीर, पोर्तुगीज वसाहती, वसई, मुंबईचे कोळीवाडे अशा जनजीवनांतील स्वप्नवत् सृष्टी टिपणारे रायबा तंत्राचा सतत विचार करीत. १९८०च्या दशकात ते मुद्राचित्रण शिकले, त्यानंतर त्यांनी केलेली मुद्राचित्रे आजही नावाजली जातात.
ए.ए. रायबा यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान
- बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनांमध्ये रायबांना दोनदा रौप्यपदके (१९४७, १९५१) मिळाली, आणि काश्मीरहून परत आल्यानंतर सन १९५६ मध्ये त्यांना सुवर्णपदक मिळाले.
- दि बॉम्बे आर्ट सोसायटी'चा २०१५ सालचा रूपधर' पुरस्कार
- 'ललित कला अकादमी' या सांस्कृतिक व कलाक्षेत्रातील नामवंत संस्थेतर्फे इ.स. १९५६ साली केलेल्या नामनिर्देशनांत सर्वोत्कृष्ट १० भारतीय चित्रकारांमध्ये रायबांचा समावेश करण्यात आला होता.