"वसंत आजगावकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: वसंतराव आजगावकर हे एक मराठी भावगीत गायक आणि संगीतकार आहेत. ते डो... |
(काही फरक नाही)
|
१२:३६, ११ एप्रिल २०१६ ची आवृत्ती
वसंतराव आजगावकर हे एक मराठी भावगीत गायक आणि संगीतकार आहेत. ते डोंबिवलीत राहतात. त्यांचे सुपुत्र निनाद आजगावकर हेही गायक आहेत.
वसंतराव आजगावकर यांची गाजलेली गाणी
- आली कुठूनशी कानी, टाळ मृदुंगाचि धून (कवी - सोपानदेव चौधरी; गायक/संगीतकार - वसंत आजगावकर)
- चांदणे निळे टिपूर (कवी- गुरुनाथ शेणई; संगीत - भानुकांत लुकतुके; गायक - वसंत आजगावकर)
- पाषाणातुनी वेड्या का तू बघसी रे श्रीराम, अंतरी आहे आत्माराम (कवी - मधुकर जोशी; संगीत - वसंत आजगावकर; गायिका - माणिक वर्मा)
- भुलविलेस साजणी (कवी - सुधांशु; गायक/संगीतकार - वसंत आजगावकर)
- मनीं माझिया नटले गोकुळ (कवी - सुधांशु; संगीत - वसंत आजगावकर; गायिका - माणिक वर्मा)
- या पाण्याची ओढ भयानक (कवी - वसंत बापट; गायक/संगीतकार - वसंत आजगावकर)
- स्मरा स्मरा हो (कवी - सुधांशु; गायक/संगीतकार - वसंत आजगावकर)
- हात दिला ग हाती (कवी - गुरुनाथ शेणई; गायक/संगीतकार - वसंत आजगावकर)
- हात धरी रे हरी पहा पण, करांत माझ्या वाजे कंकण (कवी - मधुकर जोशी; संगीत - वसंत आजगावकर; गायिका - माणिक वर्मा)
- हिरवे-पिवळे तुरे उन्हाचे (कवी - सुधांशु; गायक/संगीतकार - वसंत आजगावकर)
वसंतराव आजगावकर यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार
- डोंबिवलीच्या टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळातर्फे दिला गेलेला 'डोंबिवली सेवा‘ पुरस्कार (१-२-२०१२)
- वसंत आजगावकरांचे संगीत, मधुकर जोशी यांची रचना आणि माणिक वर्मांचे गायन असे संगीतप्रेमींसाठी त्रिवेणी संगम असलेली पहिली ध्वनिमुद्रिका इ.स. १९६२ साली निघाली होती. यातील हात धरी रे हरी पहा पण, करात माझ्या वाजे कंकण, आणि आहे आत्माराम अंतरी या गाण्यांनी लोकप्रियतेचे शिखरही गाठले होते. या घटनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त डोंबिवलीच्या स्वरतीर्थ सुधीर फडके स्मृती समितीतर्फे २९ जुलै २०१२ रोजी 'करात माझ्या वाजे कंकण' या सांगीतिक मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कवी मंगेश पाडगावकर यांच्या हस्ते वसंत आजगावकर आणि मधुकर जोशी यांना सुलश्री पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार केला गेला.
- २०१६ सालचा चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार.