"मसूद अझर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: मौलाना मसूद अझर (जन्म : बहवालपूर (पंजाब); १० जुलै किंवा ७ ऑगस्ट इ.स. १... |
(काही फरक नाही)
|
१३:३०, १० एप्रिल २०१६ ची आवृत्ती
मौलाना मसूद अझर (जन्म : बहवालपूर (पंजाब); १० जुलै किंवा ७ ऑगस्ट इ.स. १९६८) हा एक कुख्यात पाकिस्तामी दहशतवादी आहे. ह्याला ९ किंवा १० भावंडे आहेत.
मसूद अझरच्या वडलांचे नाव अल्ला बख्श शब्बीर. ते एका सरकारी शाळेत मुख्याध्यापक होते. त्याशिवाय ते एक पोल्ट्री आणि डेअरी फार्म चालवीत. मसूद अझरचे जिहादी शिक्षण कराचीतल्या बिनोरी मदरशात झालं. हा मदरसा देवबंदी गटाचा आहे. बिनोरी मदरशाचे मुख्य कामच जिहादी तयार करणे हे होतं. तय्यार झालेला अझर अफगाणिस्तानात रशियाविरोधात लढायला गेला. अफगाणिस्तानातली जिहादींची लढाई आयएसआयने उभारली होती. जिहादींचे खाजगी सैन्य उभारून. त्यासाठी आयेसआयने हर्कत-उल-मुजाहिद्दीन नावाची संघटना उभारली होती. अफगाणिस्तानच्या लढाईत जखमी होऊन आलेला अझर त्या संघटनेत १९८५ साली सामील झाला. संघटनेचा प्रमुख म्हणून निवडला गेलेला अझर 'साद-ए-मुजाहिदीन' या उर्दू नियतकालिकाचा आणि सवते कश्मिर' या अरबी वृत्तपत्राचा संपादक झाला.
१९९० नंतर अफगाणिस्तानातली लढाई संपल्यानंतर आयएसआयने आझर काश्मीरमधे कामी लावले. काश्मीरमधे घातपात करायचे, काश्मीर भारतातून हिसकावूनन घ्यायचे या कामी त्याची नेमणूक करण्यात आली.