"रमेश मुधोळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: रमेश मुधोळकर (जन्म : मलकापूर (बुलढाणा), १९ जुलै, इ.स. १९३५; मृत्यू : १३... |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
रमेश मुधोळकर (जन्म : मलकापूर |
रमेश मुधोळकर (जन्म : मलकापूर-बुलढाणा, १९ जुलै, इ.स. १९३५; मृत्यू : १३ मार्च, इ.स. २०१६) हे एक बालसाहित्यकार व चित्रकार होते. |
||
रमेश मुधोळकर यांचे प्राथमिक शिक्षण मलकापूर येथे आणि माध्यमिक शिक्षण मुंबईच्या छबिलदास हायस्कूलमध्ये झाले. मुंबईच्या जे.जे. कला महाविद्यालयातून त्यांनी कर्मिशयल आर्टचे शिक्षण घेतले होते. |
|||
⚫ | |||
⚫ | त्यांच्या वाङ्मयीन कार्याचा श्रीगणेशा अनुवादापासून झाला. १९७२ मध्ये त्यांनी केलेले अनुवादित पुस्तक कॉन्टिनेन्टल प्रकाशनने प्रकाशित केले होते. दोनच वर्षांनी त्यांनी शालापत्रक हे शालेय मुलांसाठीचे मासिक सुरू केले. लेखनाबरोबरच पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि आतील सजावट व चित्रे मुधोळकर यांचीच असत. बालकुमारांवर संस्कार करणारी सुमारे ३०० पुस्तके त्यांनी लिहिली. |
||
शिक्षण सुरू असतानाच मुधोळकारांनी जयको पॉकेट बुक्ससाठी चित्रांचे काम केले. 'अमर चित्रकथा' या गाजलेल्या चित्रकथा मालिकेचे काम त्यांनी केले आहे. |
|||
'[[अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलन]]' या संस्थेच्या स्थापनेत त्यांचा [[अमरेंद्र गाडगीळ]] यांच्याबरोबर सहभाग होता. या संस्थेचे ते संस्थापक-सदस्य होते. |
|||
२००९मध्ये मुधोळकरांच्या लेखनसंपदेच्या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली. |
२००९मध्ये मुधोळकरांच्या लेखनसंपदेच्या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली. |
२२:२०, २९ मार्च २०१६ ची आवृत्ती
रमेश मुधोळकर (जन्म : मलकापूर-बुलढाणा, १९ जुलै, इ.स. १९३५; मृत्यू : १३ मार्च, इ.स. २०१६) हे एक बालसाहित्यकार व चित्रकार होते.
रमेश मुधोळकर यांचे प्राथमिक शिक्षण मलकापूर येथे आणि माध्यमिक शिक्षण मुंबईच्या छबिलदास हायस्कूलमध्ये झाले. मुंबईच्या जे.जे. कला महाविद्यालयातून त्यांनी कर्मिशयल आर्टचे शिक्षण घेतले होते.
त्यांच्या वाङ्मयीन कार्याचा श्रीगणेशा अनुवादापासून झाला. १९७२ मध्ये त्यांनी केलेले अनुवादित पुस्तक कॉन्टिनेन्टल प्रकाशनने प्रकाशित केले होते. दोनच वर्षांनी त्यांनी शालापत्रक हे शालेय मुलांसाठीचे मासिक सुरू केले. लेखनाबरोबरच पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि आतील सजावट व चित्रे मुधोळकर यांचीच असत. बालकुमारांवर संस्कार करणारी सुमारे ३०० पुस्तके त्यांनी लिहिली.
शिक्षण सुरू असतानाच मुधोळकारांनी जयको पॉकेट बुक्ससाठी चित्रांचे काम केले. 'अमर चित्रकथा' या गाजलेल्या चित्रकथा मालिकेचे काम त्यांनी केले आहे.
'अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलन' या संस्थेच्या स्थापनेत त्यांचा अमरेंद्र गाडगीळ यांच्याबरोबर सहभाग होता. या संस्थेचे ते संस्थापक-सदस्य होते.
२००९मध्ये मुधोळकरांच्या लेखनसंपदेच्या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली.
रमेश मुधोळकरांनी लिहिलेली पुस्तके
- अंक ओळख १ ते १०
- श्री अक्कलकोटस्वामी महाराजांच्या गोष्टी
- The Ungrateful Dog
- अमृतपुलीन (बालकादंबरी)
- अरेबियन नाईट्स
- आचार्य विनोबा भावे
- आपले पक्षी
- आफ्रिकेतील साहस
- इसापनीतीच्या ५३० गोष्टी
- उंदराचं तुटलं शेपूट !
- काउन्टिंंग
- कालयंत्र
- The King Of Birds
- किती हसाल ?
- कोंबड्याचे शहाणपण
- खेळ खेळू या जमतीचे
- गणपतीच्या गोष्टी
- गाढवाला आली अक्कल
- The Greedy Young Fox
- चीनचा बिरबल आफंदी
- The Talking Conch - Shell
- श्री टेंबेस्वामी महाराज यांच्या गोष्टी
- Tales From Panchtantra
- The Tales Of Shri Balaji
- Tales Of Sambhaji
- Dick Whittington And His Cat
- द थर्टी-नाइन स्टेप्स (अनुवादित, मूळ लेखक - Authors:जॉन बुकानन )
- Three handfuls Of Rice
- दमास्कसचा बुटका
- देशोदेशीच्या लोककथा
- दोन ध्रुवांवर विजय
- नवनाथांच्या गोष्टी
- Nursary Rhymes
- पक्षी
- पूर्ण अक्षरचित्रांसह अंकलिपी
- प्राण्यांचे बंड
- The Prince And The Lions
- फंटूश संपावर जातो
- Fun With Counting 1 To 10
- फार फार वर्षांपूर्वी
- The Foolish Husband
- फ्रॅन्केन्स्टाईन
- The Fruit Of Greed
- बिरबल आणि बादशहाच्या १७५ गोष्टी
- बोधिसत्त्वाच्या बोधपर ९० गोष्टी
- बोलका शंख
- भारतरत्न
- भारतीय कलारत्न
- भारतीय विज्ञान सप्तर्षी
- महात्मा जोतीराव फुले (चरित्र)
- The Mouse's Cap
- मिठाचा शोध (लेखिका - अंजली अत्रे, संपादन व सजावट - रमेश मुधोळकर)
- मिठूमियां ! मिठूमियां !
- मुल्ला नसरुद्दीन एक वल्ली
- मुल्ला नसरुद्दीनचे अजब किस्से
- मोत्या आळंदीला जातो
- Shri Ramkrishna Paramhansa
- लबाड कोल्हा नि सवाई ससा
- लोभाचे फळ
- विश्वविख्यात बोधकथा
- The Wisdom Of The Cock
- विसराळूपणाची कमाल
- शहाणपणाची किंमत
- शेक्सपियरच्या नाट्यकथा
- शेखचिल्लीच्या गोष्टी
- शेरलॉक होम्सच्या साहसकथा
- सद्गुणांच्या गोष्टी
- सद्गुरू श्रीबाबामहाराज सहस्रबुद्धे
- सर्वधर्म समभाव
- सवाई जादूगार
- श्री साईबाबांच्या गोष्टी
- साता समुद्रापलीकडे
- The Silent Parrot
- सिलोनचा बिरबल
- स्कॅरॅमाऊश (अनुवादित, मूळ लेखक - रफाएल साबातिनी )
- Stories From Aesop
- Stories From Mahabharata
- Stories Of Nana Phadnis
- The Sleeping Princess
- स्वामी विवेकानंदांच्या गोष्टी
- 175 Stories Of Akbar And Birbal
- The Happy Man's Shirt
(अपूर्ण)
- हसत खेळत चित्रकला