Jump to content

"राजू तुलालवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: राजू तुलालवार मराठी बालरंगभूमीवर श्री .राजू तुलालवार हे गेली ३७...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
राजू तुलालवार

मराठी बालरंगभूमीवर श्री .राजू तुलालवार हे गेली ३७ वर्षे कार्यरत आहेत .व्यावसायिक मराठी बालरंगभूमीवर सर्वाधिक काल कार्यरत असणारे रंगकर्मी म्हणून राजू सरांचे नाव आदराने घेतले जाते.१९७९ साली शालेय रंगभूमीवर 'अशी कार्टी नक्को रे बाप्पा 'ही बालनाटिका लिहून त्यांनी बालनाट्यशी नाते जोडले.पुढील पाच वर्ष शालेय रंगभूमीवर विविध बालनाटिका लिहून ,बसवून,पुरस्कार घेऊन अंतर शालेय स्पर्धेत आपला ठसा उमटवला.१९८५ साली 'चिंगु चिंगम बबली बबलगम 'हे बालनाट्य दिग्दर्शित करून त्यांनी व्यावसायिक बालरंगभूमी चे धडे गिरवण्यास सुरुवात केली.त्यात अपेक्षित यश मिळताच १९८८ साली स्वतःची "चिल्ड्रेन्स थियेटर" ही बालनाट्य संस्था काढून बालनाट्य निर्मितीस सुरवात केली.गेल्या 27 वर्षात या संस्थेद्वारे राजू तुलालवार यांनी 80 च्या वर बालनाट्य लिहून,बसवून,त्याचे २००० च्या वर प्रयोग व्यावसायिक बालरंगभूमीवर केलेत.यात ५००० पेक्षा जास्त बालकलाकारांनी काम केले आणि महाराष्ट्रातील लाखो बालप्रेक्षकांनी विविध नाट्यगृहातून या बालनाट्यांचा आनंद घेतला.
राजू तुलालवार हे सन १९७९ सालापासून मराठी बालरंगभूमीवर कार्यरत आहेत .व्यावसायिक मराठी बालरंगभूमीवर सर्वाधिक काल कार्यरत असणारे रंगकर्मी म्हणून त्यांचे नाव आदराने घेतले जाते.
एकाच तिकीटात ३ बालनाटिका सादर करण्याचा प्रयोग राजू सरांनी केला आणि तो यशस्वी झाला.बालनाट्य दोन अंकांवरून एकांकिकेवर आणण्यास राजू तुलालवारांचे प्रयत्न कारणीभूत ठरले.सुट्टीत मनोरंजक बालनाटिका सादर करून दोन पिढ्यांचे मनोरंजन राजू सरांच्या बालनाटिकानी केले.मुलांना आवडतील असेच विषय ,विनोदी पद्धतीने सादर करतांना, दर्जेदार नेपथ्य,वेशभूषा,रंगभूषा,प्रकाश योजना व संगीत यांच्या वापरामुळे त्यांचे बालनाट्य नेहमीच प्रेक्षणीय आणि मनोरंजक ठरले आहे.गेली 27 वर्षे त्यांच्या बालनाट्याना होणारी गर्दी त्यांच्या लोकप्रियतेची साक्ष देते.भित्रे भूत ,जोकर आणि जादुगार ,फुग्यातला राक्षस ,फटाक्यांना घाबरणारे डॉक्टर,मिकीमाउस हरवला,आई बाबा हरले,करामती रोबो,जादूची खेळणी -ही त्यांच्या काही बालनाट्याची नावे मुलांना आकर्षित करतील अशीच आहेत.तुलाल्वारांच्या बालनाट्याचे आणखीन एक वैशिष्ट सांगता येईल ते म्हणजे -प्राणीनाट्य....वाघोबाची दिवाळी,ससोबा काढतोय सिनेमा,चॉकलेटखाऊ सिंहोबा,टीवी वेडा वाघोबा,हत्तीचे लग्न,गाढवाचा दवाखाना,नापासघोडे उंदीरमामा...ही काही त्यांची लोकप्रिय बालनाट्य.

बालनाट्य अभ्यासक व प्रशिक्षक म्हणूनही तुलालवार सरांचा नावलौकिक आहे.त्यांनी विविध अंतर शालेय स्पर्धांचे आयोजन केलेले आहे.अनेक स्पर्धात परीक्षक म्हणून उपस्थित राहतात.तसेच बालरंगभूमीवर माहिती देणारे अनेक लेख नामवंत मासिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. सध्या ते बालरंगभूमी विकास मंडळाचे अध्यक्ष आहेत.अखिल भारतीय नाट्य परिषदेने १९९७ साली त्यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मान केला आहे.बालनाट्य गुरु , ठाणे नवरत्न पुरस्कार असे मान सन्मानही त्यांच्या वाट्याला आलेले आहेत.
१९७९ साली शालेय रंगभूमीवर 'अशी कार्टी नक्को रे बाप्पा 'ही बालनाटिका लिहून राजू तुलालवार यांनी बालनाट्याशी नाते जोडले. पुढील पाच वर्ष शालेय रंगभूमीवर विविध बालनाटिका लिहून, बसवून, पुरस्कार घेऊन आंतरशालेय स्पर्धांत आपला ठसा उमटवला.१९८५ साली 'चिंगू चिंगम बबली बबलगम 'हे बालनाट्य दिग्दर्शित करून त्यांनी व्यावसायिक बालरंगभूमीवर पदार्पण केले. त्यात अपेक्षित यश मिळताच १९८८ साली स्वतःची "चिल्ड्रेन्स थिएटर" ही बालनाट्य संस्था काढून बालनाट्य निर्मितीस सुरुवात केली. पुढील २७ वर्षात या संस्थेद्वारे राजू तुलालवार यांनी ८०हून अधिक बालनाट्ये लिहून,बसवून,त्यांचे व्यावसायिक बालरंगभूमीवर २००० च्या वर प्रयोग केले. या प्रयोगांत ५००० पेक्षा जास्त बालकलाकारांनी काम केले. महाराष्ट्रातील लाखो बालप्रेक्षकांनी विविध नाट्यगृहातून या बालनाट्यांचा आनंद घेतला.
मराठी बालरंगभूमी बरोबरच राजू सरांनी हिंदी व इंग्रजी बालनाट्य करण्यास सुरवात केली आहे.१३ नोव्हेंबर २०१५ रोजी दुबई मध्ये व्यावसायिक इंग्रजी बालनाट्य सादर करून बालनाट्याला परदेशाचे द्वार उघडे करून दिले .

राजू तुलालवारांनी एकाच तिकीटात ३ बालनाटिका सादर करण्याचा प्रयोग केला आणि तो यशस्वी झाला. बालनाट्य दोन अंकांवरून एकांकिकेवर आणण्यास राजू तुलालवारांचे प्रयत्न कारणीभूत ठरले. सुट्टीत मनोरंजक बालनाटिका सादर करून त्यांनी दोन पिढ्यांचे मनोरंजन केले.

मुलांना आवडतील असेच विषय, विनोदी पद्धतीने सादर करतांना, दर्जेदार नेपथ्य,वेशभूषा,रंगभूषा,प्रकाश योजना व संगीत यांच्या वापरामुळे तुलालवारांचे बालनाट्य नेहमीच प्रेक्षणीय आणि मनोरंजक ठरले आहे. त्यांच्या बालनाट्याना होणारी गर्दी त्यांच्या लोकप्रियतेची साक्ष देते.

आई बाबा हरले, करामती रोबो, जादूची खेळणी, जोकर आणि जादुगार, फटाक्यांना घाबरणारे डॉक्टर, फुग्यातला राक्षस, भित्रे भूत, मिकीमाउस हरवला, -ही त्यांच्या काही बालनाट्याची नावे मुलांना आकर्षित करतील अशीच आहेत.

तुलालवारांच्या बालनाट्यांमध्ये अनेकदा फक्त प्राणी असतात. गाढवाचा दवाखाना, चॉकलेटखाऊ सिंहोबा, टीव्ही वेडा वाघोबा, नापासघोडे उंदीरमामा.वाघोबाची दिवाळी, ससोबा काढतोय सिनेमा, हत्तीचे लग्न, ही काही त्यांची लोकप्रिय बालनाट्ये आहेत.

बालनाट्य अभ्यासक व प्रशिक्षक म्हणूनही तुलालवारांचा नावलौकिक आहे. त्यांनी विविध आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन केलेले आहे. अनेक स्पर्धात ते परीक्षक असतात. तसेच बालरंगभूमीवर माहिती देणारे अनेक लेख नामवंत मासिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

मराठी बालरंगभूमीबरोबरच तुलालवारांनी हिंदी व इंग्रजी बालनाट्ये करण्यास सुरवात केली आहे. १३ नोव्हेंबर २०१५ रोजी दुबईमध्ये व्यावसायिक इंग्रजी बालनाट्य सादर करून त्यांनी त्यांच्या बालनाट्याला परदेशाचे द्वार उघडे करून दिले .

==राजू तुलालवार यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार==
* राजू तुलालकर हे बालरंगभूमी विकास मंडळाचे अध्यक्ष आहेत.
* अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने १९९७ साली त्यांना विशेष पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला आहे.
* बालनाट्य गुरु, ठाणे नवरत्न पुरस्कार असे मानसन्मानही त्यांच्या वाट्याला आलेले आहेत.

[[वर्ग:नाटक]]
[[वर्ग:मराठी नाटककार]]

२२:०५, १४ मार्च २०१६ ची आवृत्ती

राजू तुलालवार हे सन १९७९ सालापासून मराठी बालरंगभूमीवर कार्यरत आहेत .व्यावसायिक मराठी बालरंगभूमीवर सर्वाधिक काल कार्यरत असणारे रंगकर्मी म्हणून त्यांचे नाव आदराने घेतले जाते.

१९७९ साली शालेय रंगभूमीवर 'अशी कार्टी नक्को रे बाप्पा 'ही बालनाटिका लिहून राजू तुलालवार यांनी बालनाट्याशी नाते जोडले. पुढील पाच वर्ष शालेय रंगभूमीवर विविध बालनाटिका लिहून, बसवून, पुरस्कार घेऊन आंतरशालेय स्पर्धांत आपला ठसा उमटवला.१९८५ साली 'चिंगू चिंगम बबली बबलगम 'हे बालनाट्य दिग्दर्शित करून त्यांनी व्यावसायिक बालरंगभूमीवर पदार्पण केले. त्यात अपेक्षित यश मिळताच १९८८ साली स्वतःची "चिल्ड्रेन्स थिएटर" ही बालनाट्य संस्था काढून बालनाट्य निर्मितीस सुरुवात केली. पुढील २७ वर्षात या संस्थेद्वारे राजू तुलालवार यांनी ८०हून अधिक बालनाट्ये लिहून,बसवून,त्यांचे व्यावसायिक बालरंगभूमीवर २००० च्या वर प्रयोग केले. या प्रयोगांत ५००० पेक्षा जास्त बालकलाकारांनी काम केले. महाराष्ट्रातील लाखो बालप्रेक्षकांनी विविध नाट्यगृहातून या बालनाट्यांचा आनंद घेतला.

राजू तुलालवारांनी एकाच तिकीटात ३ बालनाटिका सादर करण्याचा प्रयोग केला आणि तो यशस्वी झाला. बालनाट्य दोन अंकांवरून एकांकिकेवर आणण्यास राजू तुलालवारांचे प्रयत्न कारणीभूत ठरले. सुट्टीत मनोरंजक बालनाटिका सादर करून त्यांनी दोन पिढ्यांचे मनोरंजन केले.

मुलांना आवडतील असेच विषय, विनोदी पद्धतीने सादर करतांना, दर्जेदार नेपथ्य,वेशभूषा,रंगभूषा,प्रकाश योजना व संगीत यांच्या वापरामुळे तुलालवारांचे बालनाट्य नेहमीच प्रेक्षणीय आणि मनोरंजक ठरले आहे. त्यांच्या बालनाट्याना होणारी गर्दी त्यांच्या लोकप्रियतेची साक्ष देते.

आई बाबा हरले, करामती रोबो, जादूची खेळणी, जोकर आणि जादुगार, फटाक्यांना घाबरणारे डॉक्टर, फुग्यातला राक्षस, भित्रे भूत, मिकीमाउस हरवला, -ही त्यांच्या काही बालनाट्याची नावे मुलांना आकर्षित करतील अशीच आहेत. 

तुलालवारांच्या बालनाट्यांमध्ये अनेकदा फक्त प्राणी असतात. गाढवाचा दवाखाना, चॉकलेटखाऊ सिंहोबा, टीव्ही वेडा वाघोबा, नापासघोडे उंदीरमामा.वाघोबाची दिवाळी, ससोबा काढतोय सिनेमा, हत्तीचे लग्न, ही काही त्यांची लोकप्रिय बालनाट्ये आहेत.

बालनाट्य अभ्यासक व प्रशिक्षक म्हणूनही तुलालवारांचा नावलौकिक आहे. त्यांनी विविध आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन केलेले आहे. अनेक स्पर्धात ते परीक्षक असतात. तसेच बालरंगभूमीवर माहिती देणारे अनेक लेख नामवंत मासिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

मराठी बालरंगभूमीबरोबरच तुलालवारांनी हिंदी व इंग्रजी बालनाट्ये करण्यास सुरवात केली आहे. १३ नोव्हेंबर २०१५ रोजी दुबईमध्ये व्यावसायिक इंग्रजी बालनाट्य सादर करून त्यांनी त्यांच्या बालनाट्याला परदेशाचे द्वार उघडे करून दिले .

राजू तुलालवार यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार

  • राजू तुलालकर हे बालरंगभूमी विकास मंडळाचे अध्यक्ष आहेत.
  • अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने १९९७ साली त्यांना विशेष पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला आहे.
  • बालनाट्य गुरु, ठाणे नवरत्न पुरस्कार असे मानसन्मानही त्यांच्या वाट्याला आलेले आहेत.