"ग्रंथाली" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: ग्रंथाली ही पुस्तक प्रकाशन संस्था अशॊक जैन आणि दिनकर गांगल या... |
(काही फरक नाही)
|
१२:२४, ८ मार्च २०१६ ची आवृत्ती
ग्रंथाली ही पुस्तक प्रकाशन संस्था अशॊक जैन आणि दिनकर गांगल यांनी इ.स. १९७४मध्ये स्थापन केली. स्थापनकर्त्या १४ सदस्यांच्या प्रत्यॆकी २५ रुपये भांडवलावर ही संस्था सुरू झाली. ही संस्था सुरुवातीला स्वयंसेवक चालवीत.
दुर्गा भागवतांचा 'डूब' हा ललितनिबंध संग्रह हे ग्रंथालीने प्रकाशित केलेले पहिले पुस्तक. ते पुस्तक 'ना नफा ना तोटा' या तत्त्वावर विकले गेले. १९७८मध्ये ग्रंथालीने दया पवार यांचे 'बलुतं' नावाचे आत्मचरित्र प्रकाशित केले. या पुस्तकाने महाराष्ट्रात खळबळ माजली. ग्रंथालीने ४० वर्षांत ४००हून अधिक पुस्तके प्रसिद्ध केली आहेत. त्यांपैकी १३०हून अधिक पुस्तकांना पुरस्कार मिळालॆे आहेत.
'ग्रंथाली' ही वाचकांची चळवळ समजली जाते. तिची पुस्तके सदस्यांना बाजारभावापॆक्षा कमी किमतीत दिली जातात.
'ग्रंथाली' कार्यालय मुंबईत ग्रॅंट रोड भागातील एका महापालिका शाळेच्या इमारतीत आहे