Jump to content

"रेडिओ तरंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ७५: ओळ ७५:
|align="center"| ९
|align="center"| ९
|align="center" style="white-space: nowrap;"| ३००–३००० [[मेगाहर्ट्‌झ|MHz]]<br />१ मी – १०० [[मिलीमीटर|मिमी]]
|align="center" style="white-space: nowrap;"| ३००–३००० [[मेगाहर्ट्‌झ|MHz]]<br />१ मी – १०० [[मिलीमीटर|मिमी]]
|align="center"| [[दूरचित्रवाणी]] प्रसारण, मायक्रोवेव्ह ओव्हन, मोबाईल फोन, बिनतारी लॅन, ब्ल्यूटूथ, [[जी.पी.एस]] (ग्लॊबल पोझिशनिंग सिस्टिम) आणि द्विमार्गी रेडिओ उदा. एफ.आर.एस. (फॅमिली रेडिओ सर्व्हिस) आणि जी.एम.आर.एस.(जनरल मोबाईल रेडिओ सर्व्हिस)
|align="center"| [[दूरचित्रवाणी]] प्रसारण, मायक्रोवेव्ह ओव्हन, मोबाईल फोन, बिनतारी लॅन (लोकल एरिया नेटवर्क), ब्ल्यूटूथ, [[जी.पी.एस]] (ग्लॊबल पोझिशनिंग सिस्टिम) आणि द्विमार्गी रेडिओ उदा. एफ.आर.एस. (फॅमिली रेडिओ सर्व्हिस) आणि जी.एम.आर.एस.(जनरल मोबाईल रेडिओ सर्व्हिस)
|-
|-
| [[परम उच्च वारंवारता (SHF)]]
| [[परम उच्च वारंवारता (SHF)]]
ओळ ८१: ओळ ८१:
|align="center"| १०
|align="center"| १०
|align="center" style="white-space: nowrap;"| ३–३० [[गिगाहर्ट्‌झ|GHz]]<br />१०० मिमी – १० मिमी
|align="center" style="white-space: nowrap;"| ३–३० [[गिगाहर्ट्‌झ|GHz]]<br />१०० मिमी – १० मिमी
|align="center"| [[सूक्ष्मलहर]] उपकरणे, [[बिनतारी लॅन]], अत्याधुनिक [[रडार]]
|align="center"| [[सूक्ष्मलहर|सूक्ष्मलहरी वापरणारी]] उपकरणे, [[बिनतारी लॅन]] (लोकल एरिया नेटवर्क), अत्याधुनिक [[रडार]]
|-
|-
| [[अत्याधिक उच्च वारंवारता (EHF)]]
| [[अत्याधिक उच्च वारंवारता (EHF)]]

१९:०५, ५ मार्च २०१६ ची आवृत्ती

रेडिओ तरंग किंवा रेडिओ लहर विद्युतचुंबकीय प्रारणाचा एक प्रकार आहे ज्यांची वारंवारता अवरक्त किरणांपेक्षा कमी असते, म्हणजेच त्यांची तरंगलांबी अवरक्त किरणांच्या तरंगलांबीपेक्षा जास्त असते. रेडिओ लहरींची वारंवारता ३०० गिगाहर्ट्‌झ ते ३ किलोहर्ट्‌झ या दरम्यान असून, तरंगलांबी १ मिलीमीटर ते १०० किलोमीटर या दरम्यान असते. सर्व विद्युतचुंबकीय लहरींप्रमाणे या लहरी प्रकाशाच्या वेगाने प्रवास करतात.

नैसर्गिकरीत्या आढळणाऱ्या रेडिओ लहरी आकाशात चमकणाऱ्या विजांमुळे तयार होतात किंवा खगोलीय वस्तूंमधून येतात. कृत्रिम रेडिओ लहरींचा वापर रेडिओ संदेशवहन, रडार, संदेशवहनाचे उपग्रह यांसारख्या अनेक गोष्टींमध्ये केला जातो.

वेगवेगळ्या वारंवारतेच्या रेडिओ लहरींचे पृथ्वीच्या वातावरणातील प्रसाराचे गुणधर्म वेगवेगळे आहेत. उदाहरणार्थ, लांब तरंगलांबीच्या रेडिओ लहरी डोंगरांसारख्या अडथळ्यांमुळे विवर्तित (डिफ्रॅक्ट) होतात, म्हणून त्या पृथ्वीच्या पृष्ठभागाशी समांतर प्रवास करू शकतात; कमी तरंगलांबीच्या रेडिओ लहरी आयनावरणापासून परावर्तित होऊन पृथ्वीवर क्षितिजापलीकडे परत येतात; अतिशय कमी तरंगलांबीच्या रेडिओ लहरी न वाकता दृश्य रेषेत सरळ प्रवास करतात.

रेडिओ लहरींचे पट्टे

रेडिओ लहरींना त्यांच्या वारंवारतेनुसार अनेक पट्ट्यांमध्ये (बँड्स) विभागण्यात आले आहे.

पट्टीचे नाव लघुरूप आय.टी.यू. (ITU) पट्टा वारंवारता
किंवा
तरंगलांबी
उदाहरण किंवा उपयोग
< ३ Hz
> १००,००० किमी
अत्याधिक कमी वारंवारता (ELF) ELF ३–३० Hz
१००,००० किमी – १०,००० किमी
पाणबुड्यांशी संपर्क साधण्यासाठी
परम कमी वारंवारता (SLF) SLF ३०–३०० Hz
१०,००० किमी – १००० किमी
पाणबुड्यांशी संपर्क साधण्यासाठी
अत्यंत कमी वारंवारता (ULF) ULF ३००–३००० Hz
१००० किमी – १०० किमी
पाणबुड्यांशी संपर्क साधण्यासाठी, खाणींमध्ये संवाद साधण्यासाठी
अति कमी वारंवारता (VLF) VLF ३–३० kHz
१०० किमी – १० किमी
पाणबुड्यांशी संपर्क साधण्यासाठी, हिमलोट इशाऱ्याचा दिवा, बिनतारी हृदय कंपन दर मॉनिटर, भूभौतिकी
कमी वारंवारता (LF) LF ३०–३०० kHz
१० किमी – १ किमी
रेडिओ मार्गनिर्देशन, रेडिओ घड्याळ, मोठ्या तरंगलांबीचे आयाम आपरिवर्तन (ॲम्प्लिट्यूड मॉड्यूलेशन) प्रसारण (एएम प्रसारण)
मध्यम वारंवारता (MF) MF ३००–३००० kHz
१ किमी – १०० मी
मध्य-लहरींचे एएम प्रसारण
उच्च वारंवारता (HF) HF ३–३० MHz
१०० मी – १० मी
छोट्या लहरींचे प्रसारण, प्राथमिक रेडिओ आणि क्षितिजापलीकडील विमानन संवाद (एव्हिएशन कम्युनिकेशन)
अत्युच्च वारंवारता (VHF) VHF ३०–३०० MHz
१० मी – १ मी
एफ.एम. रेडिओ, दूरचित्रवाणी प्रसारण आणि दृश्य रेषेतील जमीन-ते-विमान आणि विमान-ते-जमीन संवाद
अत्यंत उच्च वारंवारता (UHF) UHF ३००–३००० MHz
१ मी – १०० मिमी
दूरचित्रवाणी प्रसारण, मायक्रोवेव्ह ओव्हन, मोबाईल फोन, बिनतारी लॅन (लोकल एरिया नेटवर्क), ब्ल्यूटूथ, जी.पी.एस (ग्लॊबल पोझिशनिंग सिस्टिम) आणि द्विमार्गी रेडिओ उदा. एफ.आर.एस. (फॅमिली रेडिओ सर्व्हिस) आणि जी.एम.आर.एस.(जनरल मोबाईल रेडिओ सर्व्हिस)
परम उच्च वारंवारता (SHF) SHF १० ३–३० GHz
१०० मिमी – १० मिमी
सूक्ष्मलहरी वापरणारी उपकरणे, बिनतारी लॅन (लोकल एरिया नेटवर्क), अत्याधुनिक रडार
अत्याधिक उच्च वारंवारता (EHF) EHF ११ ३०–३०० GHz
१० मिमी – १ मिमी
रेडिओ खगोलशास्त्र, उच्च गतीचे सूक्ष्मतरंगाधिष्ठित रेडिओ रीले
३०० GHz पेक्षा जास्त
< १ मिमी

हेही पहा